पुणे,4 जुलै 2024 : लंडन येथे मुख्यालय असलेल्या व व्हिज्युअल एंटरटेन्मेंट क्षेत्रात जगातील आघाडीची कंपनी असलेल्या डीएनईजी ग्रुप ने आज जाहीर केले की,आपल्या समोर युनायटेड अल साकर ग्रुप 200 दशलक्ष डॉलर्सची व्युहात्मक गुंतवणूक करणार आहे.व्हिज्युअल इफेक्टस (व्हीएफएक्स) क्षेत्रात डीएनईजी ग्रुप सातत्याने 25 वर्षे आघाडीवर आहे. डीएनईजी ग्रुप ज्या मिडिया ॲन्ड एंटरटेन्मेंट क्षेत्रातील भागात कार्यरत आहेत,तिथे झपाट्याने बदल होत आहे.युनायटेड अल साकर ग्रुपच्या गुंतवणूकीमुळे व्हिज्युअल इफेक्ट सेवा प्रदात्यापासून सेक्टर – ॲग्नॉस्टिक प्रॉडक्शन आणि एआय पॉवर्ड तंत्रज्ञान भागीदार पर्यंत विकसित होण्यासाठी डीएनईजी समुहाच्या नाविन्यपूर्ण आणि विस्तारीकरण धोरणाला गती मिळेल.


