Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedएनपीसीआय इंटरनॅशनलने नेटवर्क इंटरनॅशनलसोबत केली भागीदारी, यूपीआयक्यूआर पेमेंट सेवा यूएईमधील व्यापाऱ्यांमध्ये होईल...

एनपीसीआय इंटरनॅशनलने नेटवर्क इंटरनॅशनलसोबत केली भागीदारी, यूपीआयक्यूआर पेमेंट सेवा यूएईमधील व्यापाऱ्यांमध्ये होईल सुरू

● यूएईमध्ये विद्यमान यूपीआय मर्चंट स्वीकृती नेटवर्क मजबूत करण्यासाठी भागीदारी

 

 

 

● यूएईमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी अखंड आणि सुरक्षित सीमापार व्यापारी व्यवहार सुलभ

 

 

 

मुंबई, ३ जुलै, २०२४ : एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने (NIPL) मध्य पूर्व आणि आफ्रिका (MEA) प्रदेशात डिजिटल कॉमर्सला चालना देणारी कंपनी नेटवर्क इंटरनॅशनल (नेटवर्क) सोबत भागीदारी केली असून, त्याद्वारे नेटवर्कच्या यूएईमधील पॉइंट-ऑफ-सेल (पीओएस) टर्मिनल्सद्वारे क्यूआर कोड-आधारित युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) पेमेंट स्वीकारण्यास सक्षम केले आहे.

 

 

 

या उपक्रमामुळे भारतीय पर्यटक आणि अनिवासी भारतीयांना (NRIs) नेटवर्क इंटरनॅशनलच्या यूएईमधील विशाल व्यापारी नेटवर्कमध्ये अखंड आणि सुरक्षित व्यवहार करता येतील. नेटवर्कमध्ये रिटेल, हॉस्पिटॅलिटी, ट्रान्सपोर्ट आणि सुपरमार्केट यांसह इतर क्षेत्रातील ६०,०००+ व्यापाऱ्यांमध्ये २००,००० पेक्षा जास्त पीओएस टर्मिनल आहेत. किरकोळ स्टोअर्स आणि डायनिंग आउटलेट्स, तसेच दुबई मॉल आणि मॉल ऑफ द एमिरेट्ससह पर्यटन आणि विश्रांतीची ठिकाणे यांमधील आस्थापनांच्या विस्तृत श्रेणीचा समावेश करून यूपीआयस्वीकृती हळूहळू आणली जाईल.

 

 

 

गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) देशांमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या २०२४ मध्ये ९.८ दशलक्षपर्यंत वाढण्याचा अंदाज असून, यूएईने भारतातून ६.२९ दशलक्ष लोकांच्या आगमनाची अपेक्षा केली आहे. व्यवसाय आणि विश्रांतीसह विविध घटकांमुळे यात वाढ होते. पीओएस टर्मिनल्सद्वारे यूपीआय स्वीकृती सक्षम करून, नेटवर्क क्रॉस-बॉर्डर पेमेंट्स सुलभ करण्यासाठी क्यूआर-आधारित सुरक्षित आणि संरक्षित पद्धत प्रदान करेल. यामुळे भारतीय पर्यटक आणि भारतीय बँक खाती असलेल्या अनिवासी भारतीयांना यूएईमधील नेटवर्कच्या पीओएस टर्मिनलवर पेमेंटसाठी यूपीआय वापरण्याची परवानगी मिळेल.

 

 

 

एनपीसीआय इंटरनॅशनलचे सीईओ रितेश शुक्ला म्हणाले, “नेटवर्क इंटरनॅशनलसोबतची आमची भागीदारी यूएईमध्ये यूपीआयची उपस्थिती वाढवेल. यूएईमधील व्यापाऱ्यांमध्ये यूपीआय पेमेंटबाबत स्वीकृती वाढवून, आम्ही भारतीय प्रवाशांना केवळ अखंड आणि परिचित पेमेंट अनुभवच देत नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावीन्यपूर्ण डिजिटल पेमेंट सोल्युशन्सच्या वापरास प्रोत्साहनही देत आहोत. ही भागीदारी तांत्रिक प्रगती आणि अधिक कनेक्टेड जागतिक पेमेंट इकोसिस्टम तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे.”

 

 

 

नेटवर्क इंटरनॅशनलचे ग्रुप सीईओ नंदन मेर म्हणाले, “यूएईला भेट देणाऱ्या किंवा काम करणाऱ्या भारतीयांसाठी पेमेंट इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या पद्धतीनुसार पैसे देण्यास सक्षम करून, आम्ही आधुनिक पेमेंट तंत्रज्ञानासह व्यवसाय आणि व्यापाऱ्यांना समर्थ बनविण्याच्या आणि डिजिटल यूएईच्या दृष्टीला बळकटी देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाच्या एक पाऊल जवळ आलो आहोत. आम्हाला खात्री आहे की, ही भागीदारी देशात एक मजबूत डिजिटल पेमेंट इकोसिस्टम चालवेल आणि त्यामुळे कॅशलेस व्यवहार वाढतील.”

 

 

 

नेटवर्क इंटरनॅशनलमधील मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेसाठीचे मर्चंट सेवा विभागाचे ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर जमाल अल नसाई म्हणाले की : “या भागीदारीचा शुभारंभ आमच्या व्यापक व्यापारी नेटवर्कसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यातून नवीन पेमेंट पद्धतीचा खूप फायदा होणार आहे. या क्षेत्रातील अग्रगण्य अधिग्रहणकर्ता म्हणून नेटवर्क इंटरनॅशनल इंटरऑपरेबिलिटी चालविण्यासाठी त्याच्या व्यापाऱ्यांना यूपीआय-आधारित पेमेंट ॲप्सची स्वीकृती सक्षम करण्यासाठी त्याच्या ३० वर्षांच्या तांत्रिक नवकल्पनांचा लाभ घेईल.”

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments