Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedचौथ्या पूना क्लब रॅकेट लीग 2024 स्पर्धेत मानव ऍव्हेंजर्स, मनप्रीत...

चौथ्या पूना क्लब रॅकेट लीग 2024 स्पर्धेत मानव ऍव्हेंजर्स, मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघांचे विजय

पुणे, 6 जुलै 2024- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित चौथ्या पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत मानव ऍव्हेंजर्स, मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजय मिळवला.

 

पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत मानव ऍव्हेंजर्स संघाने कॉन्व्हेकस शार्क्स संघाचा 279-269 असा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये सनत परमार, अश्विन शहा, प्रकाश बूथरा, विकास सूद, योगेश ठुभे, कुणाल संघवी यांच्या विजयी खेळीच्या जोरावर मानव ऍव्हेंजर्स संघाने कॉन्व्हेकस शार्क्सचा 67-66 असा तर, स्क्वॅशमध्ये कुणाल संघवी, आनंद शर्मा, योगेश ठुभे यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर मानव ऍव्हेंजर्स संघाने कॉन्व्हेकस शार्क्सचा 63-27 असा पराभव करून भक्कम अशी अशी आघाडी घेतली. टेबल टेनिसमध्ये चुरशीच्या लढतीत मानव ऍव्हेंजर्सला कॉन्व्हेकस शार्क्सने 60-68असे तर, टेनिसमध्ये कॉन्व्हेकस शार्क्स संघाने मानव ऍव्हेंजर्सचा 61-55 असा पराभव केला. पिकल बॉलमध्ये देखील कॉन्व्हेकस शार्क्स संघाने मानव ऍव्हेंजर्सचा 47-34 असा पराभव केला. पण मानव ऍव्हेंजर्स संघाने कॉन्व्हेकस शार्क्स संघावर १० गुणांच्या फरकाने विजय मिळवला.

 

दुसऱ्या लढतीत मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने एचके पॉवर हाऊसचा 243-214 असा पराभव करून पहिला विजय नोंदवला. बॅडमिंटनमध्ये विमल हंसराज, अमित परमार, अर्णव सिंग घई, मनप्रीत उप्पल यांच्या विजयी खेळीच्या जोरावर मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने एचके पॉवर हाऊसचा 68-48 असा तर, स्क्वॅशमध्ये अर्णव सरीन, रवनीत सिंग, इशांत उप्पल यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर जॅग्वार्स संघाने एचके पॉवर हाऊसचा 63-06 असा पराभव करून विजयी आघाडी घेतली. टेबल टेनिसमध्ये मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्सला एचके पॉवर हाऊसने 51-59 असे तर, टेनिसमध्ये मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्सला एचके पॉवर हाऊसने 33-54 असे पराभूत केले. पिकल बॉलमध्ये मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाला एचके पॉवर हाऊसने 28-47 असे पराभूत केले.

 

अन्य लढतीत ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाने स्टॅश – प्रो ऑल स्टार्स संघाचा 277-235 असा पराभव करून तिसरा विजय मिळवला. बॅडमिंटनमध्ये आनंद शहा, प्रीती सप्रे, कुमार पोरवाल, अर्जुन मोटाडू, अमरजीत सिंग, ब्रिन्दा थॉमस यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाने स्टॅश – प्रो ऑल स्टार्सला 67-52 असे पराभूत केले. स्क्वॅशमध्ये क्रिश डेमला, आनंद शहा यांच्या खेळीच्या जोरावर ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाने स्टॅश – प्रो ऑल स्टार्ससंघावर 55-25 असा विजय मिळवला. टेबल टेनिसमध्ये ओबेरॉय अँड निल किंग्जला स्टॅश – प्रो ऑल स्टार्सने 51-68 असे पराभूत करून हि आघाडी कमी केली. टेनिसमध्ये ओबेरॉय अँड निल आर्यन कीर्तने, रियान मुजगुले. तुषार आसवानी, विनय राठी यांनी केलेल्या अफलातून खेळीच्या जोरावर किंग्ज संघाने ऑल स्टार्सचा 57-52 असा तर, पिकल बॉलमध्ये आर्यन कीर्तने, तुषार आसवानी, केदार नाडगोंडे, रियान मुजगुले यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर किंग्ज संघाने ऑल स्टार्सचा 47-38 असा पराभव केला.

 

निकाल: साखळी फेरी:

ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.स्टॅश – प्रो ऑल स्टार्स 277-235

बॅडमिंटन: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.स्टॅश – प्रो ऑल स्टार्स 67-52;

स्क्वॅश: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.स्टॅश – प्रो ऑल स्टार्स 55-25;

टेबल टेनिस: ओबेरॉय अँड निल किंग्ज पराभूत वि.स्टॅश – प्रो ऑल स्टार्स 51-68;

टेनिस: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.स्टॅश – प्रो ऑल स्टार्स 57-52;

पिकल बॉल: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.स्टॅश – प्रो ऑल स्टार्स 47-38;

 

मानव ऍव्हेंजर्स वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 279-269

बॅडमिंटन: मानव ऍव्हेंजर्स वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 67-66;

स्क्वॅश: मानव ऍव्हेंजर्स वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 63-27;

टेबल टेनिस: मानव ऍव्हेंजर्स पराभुत वि.कॉन्व्हेकस शार्क्स 60-68;

टेनिस: मानव ऍव्हेंजर्स पराभुत वि.कॉन्व्हेकस शार्क्स 55-61;

पिकल बॉल: मानव ऍव्हेंजर्स पराभुत वि.कॉन्व्हेकस शार्क्स 34-47;

 

मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स वि.वि.एचके पॉवर हाऊस 243-214

बॅडमिंटन: मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स वि.वि.एचके पॉवर हाऊस 68-48;

स्क्वॅश: मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स वि.वि.एचके पॉवर हाऊस 63-06;

टेबल टेनिस: मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स पराभुत वि.एचके पॉवर हाऊस 51-59;

टेनिस: मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स पराभुत वि.एचके पॉवर हाऊस 33-54;

पिकल बॉल: मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स पराभुत वि.एचके

पॉवर हाऊस 28-47;

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments