Saturday, September 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedथापर इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नोलॉजी (टीआयईटी) आणि एनव्हिडिया मध्ये सामंजस्य करार

थापर इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नोलॉजी (टीआयईटी) आणि एनव्हिडिया मध्ये सामंजस्य करार

नवी दिल्ली, 6 जुलै 2024 : थापर इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नोलॉजी (टीआयईटी) ने एनव्हिडिया सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली.या सहयोगाअंतर्गत एनव्हिडिया एआय युनिव्हर्सिटी प्रोग्रामच्या तांत्रिक साहाय्याने थापर स्कुल ऑफ ॲडव्हान्स्ड एआय आणि डेटा सायन्स (टीएसएएआय) ची स्थापना करण्यात येणार आहे.

 

आर्टिफिशियल इंटेलजिन्स (एआय) जगभरातील उद्योगांमध्ये क्रांती,अभिनवतेबरोबरच शिक्षणाच्या भविष्याला आकार देऊन जीवन बदलत आहे.टीआयईटी आणि एनव्हिडिया यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत, टीआयईटीच्या पाटियाला कॅम्पसमध्ये टीएसएएआयची स्थापना केली जाईल.या अभिनव उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थी व शिक्षकांना एआयचे कौशल्य आणि ज्ञानाने सक्षम करण्यासाठी सर्वसमावेशक शैक्षणिक कार्यक्रम,संशोधनाच्या संधी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदान करणे हे आहे. नॅव्हिगेशन प्रणाली ते फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानापर्यंत एआय आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.मात्र भारतात एआय कौशल्यामध्ये लक्षणीय दरी असून ती भरून काढण्यासाठी या क्षेत्रात कुशल व्यावसायिकांची गरज आहे.

 

थापर इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नोलॉजी (टीआयईटी) चे संचालक डॉ.पद्मकुमार नायर म्हणाले की,एनव्हिडियाबरोबर तांत्रिक सहकार्याने एआय स्कुल स्थापन करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.या उपक्रमामुळे एआय कुशलतेमध्ये असलेली दरी फक्त भरून निघणार नाही तर,या परिवर्तनीय क्षेत्रात अद्ययावत संशोधन आणि अभिनवतेला चालना देईल. यामुळे भविष्यासाठी सज्ज विद्यार्थी तयार करण्यासाठी शिक्षण प्रदान करण्याचा आमचा दृष्टीकोन देखील साध्य होईल.

 

जागतिक एआय शिक्षण क्षेत्रातील एक प्रमुख संस्था म्हणून थापर इस्ट्टियुट भारतभरात एआय तज्ञांची नवीन पिढी स्थापन करण्यासाठी अत्याधुनिक एनव्हिडिया तंत्रज्ञान एकत्रित करेल,असे मत एनव्हिडियाच्या आशिया दक्षिण क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक विशाल धुपर यांनी व्यक्त केले.नवीन एआय स्कुलमुळे एआय कौशल्यमधील दरी भरून निघेल आणि उद्योगात प्रगतशील संशोधन आणि अभिनवतेचा मार्ग मोकळा होईल.

 

जनरेटिव्ह एआयच्या विकास व स्थापनेसाठी टीआयईटी एनव्हिडिया एच100 टेन्सर कोअर जीपीयू,एनव्हिडिया ए100 टेन्सर कोअर जीपीयू, एनव्हिडिया एआय एंटरप्राईज सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म या एनव्हिडिया डीजीएक्स सिस्टिम्सचा वापर करून टीआयईटी तर्फे पायाभूत एआय सुविधा स्थापित केल्या जातील.

 

हे समर्पित डेटा सेंटर जवळपास 8 टेरा बाईटस जीपीयू मेमरीसह एआय कार्यप्रदर्शनाचे 227 पेटाफ्लॉफ्स देऊ करेल.कोअर ॲक्सिलरेटेड कॉम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर व्यतिरिक्त,टीआयईटी स्टार्टअप इको सिस्टिम तयार करण्यासाठी 500 जेटसन नॅनो डेव्हलपर कीट्ससह अत्याधुनिक कॉम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चरची स्थापना करेल,ज्यामुळे पदवीधरांना नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बनविण्याच्या दिशेने मोठी झेप घेता येईल.

 

या एआय युनिव्हर्सिटी प्रोग्रामचे उद्दिष्ट विद्यार्थी आणि प्राध्यापक या दोघांना एआय कौशल्य आणि ज्ञानाने सक्षम करण्यासाठी अभ्यासक्रम,प्रयोगशाळा,संशोधन संधी आणि अभिनव प्रकल्प प्रदान करणे आहे.2024-25 शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या सुरूवातीपर्यंत,पूर्ण एआय पदवी अभ्यासक्रम,सर्व शाखांमधील अनिवार्य एआय/वैकल्पिक अभ्यासक्रम,प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी तांत्रिक प्रशिक्षण,संशोधन सहयोग,एनव्हिडिया एज कॉम्प्युटिंग द्वारे समर्थित एआय स्टार्टअप इकोसिस्टिम स्थापित करून यासाठी सर्व पायाभूत सुविधा तयार असतील.

 

2 ते 4 वर्षांच्या कालावधीत अभ्यासक्रमात आवश्यक बदल आणि अतिरिक्त आवश्यक गोष्टी समाविष्ट करून पदवीधर विद्यार्थी एआय साक्षर होतील, हे टीआयईटी तर्फे सुनिश्चित केले जाईल.या उपक्रमातील पहिला भाग म्हणजे थापर डिजिटल ट्विन प्रोजेक्ट सुरू करणे असून त्यानंतर अन्न सुरक्षा,शहरी नियोजन,आरोग्य सेवा आणि सायबर सुरक्षा ते रोबोटिक्स यासारख्या क्षेत्रांमधील बहुआयामी प्रकल्पांचा समावेश आहे.

 

* थापर स्कुल ऑफ ॲडव्हान्स्ड एआय आणि डेटा सायन्स (टीएसएएआय) ची प्रमुख वैशिष्टये

 

1. शैक्षणिक – चार वर्षांमध्ये सखोल एआय कौशल्ये निर्माण करण्यावर भर देत एआयमध्ये नवीन अंडरग्रॅज्युएट इंजिनिअरींग अभ्यासक्रम (बीई इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग) विकसित करणे.

 

* सर्व विद्यार्थी एआय साक्षर व्हावेत यासाठी सर्व अभ्यासक्रमांमध्ये एआय वैकल्पिक अभ्यासक्रम प्रदान करणे.

 

* कार्यरत व्यावसायिकांसाठी एआय,एमएल आणि डीएसमध्ये मास्टर्स प्रोग्राम सुरू करणे.

 

* एआय प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी व्यवसाय विकास अभ्यासक्रम उपलब्ध करणे.

 

* कुठल्याही अभ्यासक्रमासाठी टीआयईटीच्या सर्व विद्यार्थ्यांना एआय प्रशिक्षणाचे 9 क्रेडिटस मिळतील.

 

2. प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रशिक्षण –

 

* एनव्हिडिया डीप लर्निंग इन्स्टिट्युट (डीएलआय) ॲम्बेसेडर प्रोग्राममध्ये निवडल्या गेलेल्या प्राध्यापकांना प्रशिक्षण.

 

* निवडले गेलेले विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी डीएलआय कार्यशाळांचे आयोजन

 

याशिवाय निवडल्या जाणाऱ्या टीआयईटी – इनक्युबेटेड एआय स्टार्टअप्सना आपल्या इनसेप्शन प्रोग्रामचे लाभ दे

ण्याची एनव्हिडियाची योजना आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments