Thursday, November 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedबजाज जनरल इन्श्युरन्सकडून रस्ते सुरक्षा, मोटर इन्श्युरन्स आणि सरकारी अपघात मदत योजनांबाबत...

बजाज जनरल इन्श्युरन्सकडून रस्ते सुरक्षा, मोटर इन्श्युरन्स आणि सरकारी अपघात मदत योजनांबाबत जनजागृती मोहीम

 

 

– भारत सरकारच्या ‘पीएम-राहत’ आणि ‘राह-वीर’ योजनांच्या अनुषंगाने थर्ड-पार्टी मोटर इन्श्युरन्सबाबत जागरूकता वाढवण्यासाठी येरवडा बजाज जनरल मेट्रो स्थानकावर डिजिटल शाखेचे उद्घाटन

 

 

 

पुणे, 12 नोव्हेंबर 2026: भारतातील आघाडीच्या खासगी जनरल इन्श्युरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेडने (पूर्वीची बजाज अलायन्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड) रस्ता सुरक्षा आणि जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत, कंपनीने पुण्यातील येरवडा बजाज जनरल मेट्रो स्टेशन येथे एका डिजिटल शाखेचे उद्घाटन केले आहे. यामुळे प्रवाशांना मोटर इन्श्युरन्सची महत्त्वाची माहिती तसेच रस्ते अपघातांच्या वेळी उपलब्ध असलेल्या मदत उपक्रमांची माहिती अधिक सहजपणे मिळणार आहे.

 

दररोज या मेट्रो स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांपर्यंत पोहोचण्याच्या ही डिजिटल शाखा सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी वाहन मालकांना त्यांच्या थर्ड-पार्टी (टीपी) मोटर इन्श्युरन्सची वैधता सहजपणे तपासता येणार आहे. प्रवासी केवळ क्यूआर कोड स्कॅन करून त्यांच्या वाहनाची टीपी इन्श्युरन्स पॉलिसी सक्रिय आहे की नाही हे तपासू शकतात आणि आवश्यकता असल्यास काही मिनिटांतच डिजिटल पद्धतीने नवीन पॉलिसी खरेदी करू शकतात. इन्श्युरन्सविषयीची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचवणे आणि वाहनमालकांना कायद्यानुसार आवश्यक असलेले मोटर इन्श्युरन्स संरक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत थर्ड-पार्टी मोटर इन्श्युरन्स अनिवार्य आहे. रस्ता अपघातात बाधित झालेल्या थर्ड पार्टीला आर्थिक संरक्षण देण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. असे असतानाही, भारतीय रस्त्यांवर आजही मोठ्या संख्येने वाहने वैध इन्श्युरन्सशिवाय धावत आहेत. त्यामुळे अपघातग्रस्तांना आर्थिक दायित्वांचा सामना करावा लागू शकतो आणि नुकसानभरपाई मिळवण्यासाठी मर्यादित पर्याय उपलब्ध राहू शकतात. वाहनमालकांनी इन्श्युरन्ससंबंधीच्या कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि जबाबदार वाहनमालकीचा एक आवश्यक भाग म्हणून थर्ड-पार्टी इन्श्युरन्सकडे पाहावे, यासाठी ही मोहीम जनजागृतीतील उणीव दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

रस्ता अपघातग्रस्तांसाठी भारत सरकारने सुरू केलेल्या दोन प्रमुख योजनांबाबत जनजागृती करणे हे देखील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. राह-वीर योजनेंतर्गत अपघातानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘गोल्डन अवर’ जखमींना रुग्णालयात पोहोचवून मदत करणाऱ्या सजग नागरिकांचा सन्मान आणि गौरव केला जातो. तर, ‘पंतप्रधान रस्ते अपघात रुग्णालय भरती आणि सुनिश्चित उपचार’ किंवा ‘पीएम-राहत’ योजनेंतर्गत पात्र रस्ते अपघातग्रस्तांना कॅशलेस वैद्यकीय उपचार दिले जातात. प्रत्यक्ष जनसंपर्क आणि डिजिटल माध्यमांद्वारे जनजागृती करत, नागरिकांनी पुढे येऊन अपघातग्रस्तांना मदत करावी आणि त्यांना उपलब्ध असलेल्या सहाय्य योजनांची माहिती माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

 

 

 

बजाज जनरल इन्श्युरन्सचे एमडी आणि सीईओ डॉ. तपन सिंघेल म्हणाले, “प्रत्येक रस्ता अपघातामागे सर्वप्रथम एक मानवी व्यथा असते: घरी परतू न शकलेले वडील आणि दारात त्यांच्या परतण्याची वाट पाहणारे मूल. अशा कठीण प्रसंगी कोणत्याही कुटुंबाला एकट्याने सामोरे जावे लागू नये, हेच इन्श्युरन्समागील खरे तत्त्व आणि त्यातून दिले जाणारे आश्वासन आहे. पुणे ही बजाजची कर्मभुमी आहे.बजाज समूहाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असताना आणि बजाज जनरल इन्श्युरन्सच्या 25 वर्षांच्या वाटचालीचा टप्पा गाठत असताना, या शहरासाठी खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरेल असे काहीतरी योगदान द्यावे, अशी आमची इच्छा होती.

 

या मेट्रो स्टेशनला आमचे नाव जोडलेले आहे आणि त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाप्रती आमची एक जबाबदारीही आहे. येथे येणाऱ्या एखाद्या व्यक्तीने आपली इन्श्युरन्स पॉलिसी तपासली किंवा ‘राह-वीर’ योजनेबद्दल माहिती मिळाल्यामुळे एखाद्या वाटसरूने अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी पुढाकार घेतला, तरी त्यातून एखाद्याच्या आयुष्याला सकारात्मक स्पर्श घडेल. या उपक्रमात आमच्या सोबत खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल मी पुणे वाहतूक पोलिसांचा मनापासून आभारी आहे. आमच्यासाठी ‘केअरिंग्ली युअर्स’ या संकल्पनेचा हाच खरा अर्थ आहे.

 

पुणे शहर वाहतूक पोलिसांचे पोलीस उपायुक्त श्री. डॉ. संदीप भाजीभाकरे म्हणाले, “रस्ता सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांतून रस्ते सुरक्षित होऊ शकत नाहीत; यासाठी नागरिक, विविध संस्था आणि उद्योग क्षेत्रानेही आपापली भूमिका बजावणे आवश्यक आहे. पुणेकर दररोज मोठ्या संख्येने ये-जा करतात, अशा ठिकाणी जनजागृती पोहोचवण्याच्या बजाज जनरल इन्श्युरन्सच्या या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो.”

 

“‘राह-वीर’ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला हे समजावे, अशी आमची इच्छा आहे की रस्ता अपघातातील पीडितांना मदत करणे सुरक्षित असून, अशा मदतकार्याबद्दल नागरिकांचा सन्मानही केला जातो. ‘पीएम-राहत’ योजनेमुळे अपघातग्रस्तांना वेळेवर कॅशलेस उपचार मिळू शकतात. तसेच, वैध थर्ड-पार्टी इन्श्युरन्समुळे अपघातग्रस्त आणि वाहनचालक या दोघांनाही आर्थिक संरक्षण मिळते. या तिन्ही बाबी एकत्रितपणे ‘गोल्डन अवर’मध्ये अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत करू शकतात. प्रत्येक पुणेकराने आपल्या वाहनाचा वैध इन्श्युरन्स काढावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि रस्त्यावर गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी कधीही मागेपुढे पाहू नये, असे आम्ही आवाहन करतो.”

 

येरवडा बजाज जनरल मेट्रो स्टेशनवरील ही डिजिटल शाखा सार्वजनिक जनजागृती आणि सहज उपलब्ध डिजिटल सेवांची सांगड घालण्याचा एक प्रयत्न आहे. यामुळे इन्श्युरन्स आणि रस्ता सुरक्षेविषयीची महत्त्वाची माहिती प्रवाशांपर्यंत त्यांच्या दैनंदिन प्रवासादरम्यान सहज पोहोचू

शकणार आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments