Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedवासंती बनकर यांना सर्वोत्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्कार

वासंती बनकर यांना सर्वोत्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्कार

 

पुणे : इथल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वासंती बनकर यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड यांच्याकडून ‘सर्वोत्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रोख रक्कम , भेटवस्तू आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.येत्या नोव्हेंबरमध्ये मुंबईत होणाऱ्या सत्कार सोहळ्यात या पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसंच कुमारवयातील विद्यार्थांचे मन आणि त्यांच्या विचारांचे संगोपन करण्यासाठी , आपल्या देशाचे भविष्य घडवण्यासाठी असलेल्या वचनबद्धतेसाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडने आपल्या पत्रात म्हटलं आहे. इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड ही देशातील आघाडीची ऑलिम्पियाड संघटना असून त्यांच्याकडून दरवर्षी देशभरातील कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या ऑलिम्पियाड परीक्षा घेतल्या जातात.यानिमित्त वासंती बनकर यांचे प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक अक्षय कुलकर्णी यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच प्रशालेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रसाद लागू यांनीही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments