Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोबिक्विक बाजारपेठ हिस्‍सा संपादित करत बनली सर्वात मोठी वॉलेट कंपनी

मोबिक्विक बाजारपेठ हिस्‍सा संपादित करत बनली सर्वात मोठी वॉलेट कंपनी

● मे २०२४ मध्‍ये पीपीआय वॉलेटच्‍या माध्‍यमातून आर्थिक व्‍यवहारांच्‍या एकूण मूल्‍यामध्‍ये २३ टक्‍के हिस्‍साची नोंद

 

● रेडसीर स्‍ट्रॅटेजी कन्‍सल्‍टण्‍ट्सनुसार, कंपनीचा मे २०२४ मध्‍ये फास्‍टटॅग वगळून मूल्‍याद्वारे पीपीआय वॉलेटचा ४८ टक्‍के हिस्‍सा होता

 

गुरूग्राम, भारत – जुलै ८, २०२४: मोबिक्विक (वन मोबिक्विक सिस्‍टम्‍स लिमिटेड) या भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल आर्थिक उत्‍पादने व सेवा प्‍लॅटफार्मने एप्रिल आणि मे २०२४ महिन्‍यांसाठी मूल्‍याद्वारे सर्वाधिक पीपीआय वॉलेट व्‍यवहारांची नोंद करत मोठा टप्‍पा संपादित केला आहे.भारतीय रिझर्व्‍ह बँकेने (आरबीआय) प्रकाशित केलेल्‍या डेटानुसार, मोबिक्विकने सामान व सेवा खरेदीसाठी, तसेच फंड ट्रान्‍सफर्ससाठी पीपीआय वॉलेटच्‍या माध्‍यमातून आर्थिक व्‍यवहारांमध्‍ये बाजारपेठ हिस्‍सा संपादित केला आहे. कंपनीचा मूल्‍याद्वारे बाजारपेठ हिस्‍सा मार्च २०२४ मधील ११ टक्‍क्‍यांवरून एप्रिलमध्‍ये २० टक्‍क्‍यांपर्यंत आणि मे मध्‍ये २३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला.

 

मोबिक्विकचे नवीन उत्‍पादन पॉकेट यूपीआयने त्‍यांची पोहोच वाढवण्‍यामध्‍ये आणि वापरकर्त्‍यांना सुलभ पेमेंट सेवा देण्‍यामध्‍ये मोठी भूमिका बजावली आहे. पॉकेट यूपीआय वापरकर्त्‍यांना यूपीआय नेटवर्कमधील त्‍यांच्‍या वॉलेट्सच्‍या माध्‍यमातून त्‍वरित पेमेंट करण्‍याची विनासायास सुविधा देते, ज्‍यासाठी त्‍यांचे बँक खाते लिंक करण्‍याची गरज नाही. यामुळे वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या आर्थिक व्‍यवहारांचे कार्यक्षमपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होते.

 

तसेच, कंपनी या वाढीचे श्रेय द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील त्‍यांच्‍या प्‍लॅटफॉर्मच्‍या व्‍यापक अवलंबतेला देते. त्‍यांचे युजर-अनुकूल अॅप आणि व्‍यवहार सुरक्षित करणाऱ्या उपाययोजना ग्राहक व मर्चंट्सना साह्य करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत.

 

या टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत मोबिक्विकच्‍या सह-संस्‍थापक व सीएफओ उपासना ताकु म्‍हणाल्‍या, “कंपनीच्‍या पीपीआय वॉलेट बाजारपेठ हिस्‍सामधील वाढीमधून बाजारपेठेत नाविन्‍यपूर्ण, सुरक्षित आणि युजर-केंद्रित आर्थिक उत्‍पादने सादर करण्‍यावरील आमचा फोकस दिसून येतो. आम्‍ही तंत्रज्ञान-संचालित सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून आर्थिक समावेशनाच्‍या आमच्‍या ध्‍येयाप्रती कटिबद्ध आहोत.”

 

बाजारपेठ हिस्‍साबाबत मत व्‍यक्‍त करत त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, “मोबिक्विक फास्‍टटॅग जारी करण्‍याच्‍या व्‍यवसायामध्‍ये कार्यरत नाही. मोबिक्विकने फास्‍टटॅग-संबंधित व्‍यवहार मूल्‍य वगळल्‍यानंतर मे २०२४ मध्‍ये मूल्‍याद्वारे पीपीआय वॉलेट व्‍यवहारांसाठी ४८ टक्‍के बाजारपेठ हिस्‍सा संपादित केला.”

 

धोरण सल्‍लागार कंपनी रेडसीरच्‍या मते, “समान बाबींसंदर्भात तुलना केल्‍यास मोबिक्विकचा मे २०२४ मध्‍ये पीपीआय वॉलेट जीएमव्‍हीचा जवळपास ४८ टक्‍के हिस्‍सा आहे. मोबिक्विक फास्‍टटॅग सेवा देत नाही. परिणामत: तुलना केली असता एकूण पीपीआय वॉलेट्स जीएमव्‍हीमधून एनईटीसी (NETC) फास्‍टटॅगच्‍या जीएमव्‍हीला वगळण्‍यात आले आहे, जेथे फास्‍टटॅग व्‍यवहारांसाठी प्रामुख्‍याने बहुतांश बँकांच्‍या पीपीआय वॉलेट्सचा वापर केला जातो. या विश्‍लेषणामध्‍ये, एनईटीसी (NETC)वर नोंद करण्‍यात आलेल्‍या सर्व फास्‍टटॅग व्‍यवहारांची प्रक्रिया फक्‍त वॉलेट्सच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आलेली आहे, असे गृहीत धरण्‍यात आले आहे.”

 

डिजिटल इंडिया लँडस्‍केप विकसित होत असताना मोबिक्विकचा बाजारपेठेतील आपले स्‍थान कायम ठेवण्‍याचा आणि भारतातील भावी डिजिटल फायनान्‍समध्‍ये साह्य करण्‍याचा मनसुबा आहे.

 

मोबिक्विक बाबत

 

मोबिक्विक डिजिटल आर्थिक सेवा प्लॅटफॉर्म आहे, जो आर्थिक उत्‍पादने व सेवांचा सर्वसमावेशक प्रदाता आहे. कंपनीच्‍या उत्‍पादनांच्‍या श्रेणीमध्‍ये पेमेंट्स, डिजिटल क्रेडिट, गुंतवणूका आणि विमा उत्‍पादनांचा समावेश आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांच्‍या सर्व आर्थिक गरजांची पूर्तता होतात.

 

२००८ मध्‍ये बिपीन प्रीत सिंग आणि उपासना ताकु यांनी स्‍थापना केलेली कंपनी डिजिटल वॉलेट म्‍हणून सुरू झाली आणि तेव्‍हापासून अतिरिक्‍त आर्थिक सेवा सादर केल्‍या आहेत, जसे त्‍यांचे बाय नाऊ पे लेटर (बीएनपीएल) क्रेडिट मोबिक्विक झिप, झिप ईएमआय, जे वैयक्तिक कर्ज, मर्चंट कॅश अॅडवान्‍सेस, संपत्ती व्‍यवस्‍थापन आणि विमा वितरण देते.

 

मोबिक्विकने भारतभरातील १४६.९४ दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्‍यांना सेवा देण्‍यासाठी वाढ केली आहे, जेथे ३० सप्‍टेंबर २०२३ पर्यंत ३.८१ दशलक्ष मर्चंट नेटवर्क होते. कंपनीचा तृतीय व त्‍यावरील श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये डिजिटल कर्ज वितरणात सर्वोच्‍च बाजारपेठ हिस्‍सा आहे. कंपनी आर्थिक समावेशन आणि विविध ग्राहक विभागांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

 

अस्‍वीकृती

 

वन मोबिक्विक सिस्‍टम्‍स लिमिटेड आवश्‍यक मान्‍यता, बाजारपेठ स्थिती आणि इतर विचारांच्‍या अधीन राहत त्‍यांच्‍या इक्विटी शेअर्सची (‘इक्विटी शेअर्स’) इनिशिएल पब्लिक ऑफर (‘इश्‍यू’) सादर करण्‍याचा प्रस्‍ताव करत आहे आणि सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्‍चेंज बोर्ड ऑफ इंडिया (‘सेबी’) कडे ४ जानेवारी २०२४ रोजीचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्‍पेक्‍टस (‘डीआरएचपी’) दाखल केला आहे. डीआरएचपी सेबीची वेबसाइट www.sebi.gov.in येथे, तसेच बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्‍या वेबसाइट्स, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेडची वेबसाइट https://www.sbicaps.com/whatsnew/one-mobikwik-systems-limited आणि डीएएम कॅपिटल अडवायजर्स लिमिटेडची वेबसाइट https://www.damcapital.in/static/offer-documents-or-prospectus.aspx येथे उपलब्‍ध आहे.

 

कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित जोखमींच्या संदर्भात संपूर्ण माहितीसाठी, कृपया डीआरएचपीच्या पृष्‍ठक्रमांक ३३ पासून सुरू होणारे ‘रिस्‍क फॅक्‍टर्स’ पहा. कोणत्याही गुंतवणूक निर्णयासाठी संभाव्य गुंतवणूकदारांनी डीआरएचपीवर अवलंबून राहू नये. गुंतवणूकदारांनी लक्षात घ्‍या की इक्विटी शेअर्समधील गुंतवणुकीमध्‍ये मोठ्या प्रमाणात जोखीम असते आणि अशा जोखमीशी संबंधित तपशीलांसाठी, कृपया उपलब्ध असेल तेव्हा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा ‘रिस्‍क फॅक्‍टर्स’ विभाग पहा.

 

इश्यूमध्ये ऑफर केलेले इक्विटी शेअर्स यू.एस. सिक्युरिटीज अॅक्‍ट अंतर्गत नोंदणीकृत केलेले नाहीत आणि केले जाणार नाहीत, तसेच ते युनायटेड स्टेट्समध्ये ऑफर केले जाणार नाहीत किंवा विकले जाणार नाहीत. त्यानुसार, इक्विटी शेअर्स यू.एस. सिक्युरिटीज अॅक्‍ट अंतर्गत रेग्युलेशन S आणि अशा ऑफर व विक्री जेथे होतात अशा अधिकारक्षेत्रातील लागू कायद्यांवर अवलंबून राहून ‘ऑफशोअर ट्रान्झॅक्शन्स’मध्ये युनायटेड स्टेट्सच्या बाहेर ऑफर आणि विक्री केली जात आहे.

 

इक्विटी शेअर्स भारताबाहेरील इतर कोणत्याही अधिकारक्षेत्रात नोंदणीकृत, सूचीबद्ध किंवा अन्यथा पात्र झालेले नाहीत आणि असतीलही नाहीत आणि ते ऑफर किंवा विकले जाऊ शकत नाहीत आणि अशा कोणत्याही अधिकारक्षेत्रातील व्यक्तींद्वारे अधिकारक्षेत्राच्‍या कायद्यांतर्गत लागू असलेल्‍या गोष्‍टींचे पालन केल्‍याशिवाय बोली लावल्या जाऊ शकत नाहीत.

 

रेडसीर अस्‍वीकृती

 

या प्रसिद्धी पत्रकामध्‍ये रेडसीर स्‍ट्रॅटेजी कन्‍सल्‍टण्‍ट्स प्रायव्हेट लिमिटेड (‘रेडसीर’) द्वारे तयार केलेल्या आणि जारी केलेल्या २ जानेवारी २०२४ रोजीचा अहवाल ‘डीप डाइव्ह इन इंडिया फिनटेक मार्केट’ (‘रिपोर्ट’) मधील माहिती आहे. ज्‍यामुळे, आम्‍हाला रिपोर्टसंदर्भात खालील अस्‍वीकृतीचा समावेश करावा लागला आहे:

 

‘रेडसीर अहवालातील बाजार माहिती एकात्मिक संशोधन पद्धती वापरून प्राप्‍त करण्‍यात आली आहे, ज्यामध्ये दुय्यम आणि प्राथमिक संशोधन समाविष्‍ट आहे. रेडसीरच्या प्राथमिक संशोधन कार्यामध्ये ग्राहक आणि इतर संबंधित इकोसिस्टम सहभागींच्या सर्वेक्षण व सखोल मुलाखती आणि बाजारातील सहभागी आणि तज्ञांशी सल्लामसलत समाविष्‍ट आहे. प्राथमिक संशोधनाव्यतिरिक्‍त, विश्‍वासार्ह पोर्टल्स आणि उद्योग प्रकाशनांच्या डेटाच्या आधारे परिमाणात्मक बाजार माहिती देखील मिळवण्‍यात आली आहे. म्हणून, माहिती इतरांबरोबरच दुय्यम सांख्यिकी आणि प्राथमिक संशोधनाच्या मर्यादेच्या अधीन आहे आणि त्यानुसार निष्कर्ष सर्वसमावेशक नाहीत. रेडसीरचे अंदाज आणि गृहीतके उद्योग जर्नल्स, कंपनी अहवाल व सार्वजनिक डोमेनमधील माहितीसह विविध स्त्रोतांकडून परिमाणात्मक आणि गुणात्मक विश्‍लेषणाच्या विविध स्तरांवर आधारित आहेत. रेडसीरचे संशोधन उद्योगाच्या व्यापक दृष्टीकोनातून करण्‍यात आले आहे आणि उद्योगातील वैयक्तिक कंपन्यांची कामगिरी दिसून येत नाही. या अहवालातील माहितीवर अवलंबून राहिल्यामुळे कोणत्याही व्‍यक्‍तीला झालेल्या नुकसानीसाठी रेडसीर जबाबदार राहणार नाही. रेडसीरने सामान्यतः विश्‍वसनीय समजल्या जाणाऱ्या स्त्रोतांकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे रेडसीर अहवाल तयार करताना योग्य ती काळजी आणि सावधगिरी बाळगली असली तरी, त्याची अचूकता, पूर्णता आणि अंतर्निहित गृहीतके या सर्व स्रोतांमधील बाजारातील परिस्थितीचे स्पष्टीकरण, इतरांमधील डेटा उपलब्धता यासारख्या मर्यादांच्या अधीन आहेत. त्यामुळे, रेडसीर अंतर्निहित डेटा किंवा रेडसीर अहवालाच्या अचूकतेची किंवा पूर्णतेची हमी देत नाही. रेडसीर अहवालात समाविष्‍ट असलेले अंदाज आणि इतर भविष्‍यकालीन विधाने स्वाभाविकपणे अनिश्चित आहेत आणि त्यांच्या गृहीतकांच्या अंतर्निहित घटकांमधील बदलांमुळे किंवा वाजवीपणे अंदाज न करता येणाऱ्या घटना किंवा घटनांच्या संयोजनामुळे चढ-उतार होऊ शकतात. याव्यतिरिक्‍त, कोविड-१९ कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) साथीच्या रोगाने सर्वसाधारणपणे आर्थिक क्रियाकलापांवर आणि विशेषतः अन्‍न सेवा क्षेत्रावर लक्षणीय परिणाम केला आहे आणि तो अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही. रेडसीर अहवालातील अंदाज आणि इतर भविष्यकालीन विधाने अर्थव्यवस्‍था सुरळीत होणे, ग्राहकांच्या भावनांची उत्क्रांती, स्पर्धात्मक वातावरण यासारख्या घटकांवर अवलंबून आहेत, ज्‍यामुळे अनिश्चिता निर्माण होते आणि या सर्वांचा वाजवी व अचूकपणे लेखाजोखा करता येत नाही. वास्तविक परिणाम आणि भविष्यातील घटना असे अंदाज किंवा अशा विधानांपेक्षा प्रत्‍यक्ष भिन्‍न असू शकतात. रेडसीर अहवाल ही रेडसीर अहवालामध्ये समाविष्‍ट असलेल्या कोणत्याही घटकामध्ये गुंतवणूक करण्‍याची किंवा न करण्‍याची शिफारस नाही आणि रेडसीर अहवालाचा अर्थ कोणत्याही कायद्याच्या किंवा नियमांच्या अंतर्गत गुंतवणूक सल्ला म्हणून समजू नये. अगोदर निर्देश केलेल्या बाबींना मर्यादित न ठेवता, रेडसीर अहवालातील कोणत्याही गोष्‍टीचा अर्थ रेडसीर ज्या अधिकारक्षेत्रात सेवा प्रदान करत आहे किंवा प्रदान करण्याचा दावा करत आहे असे समजू नये, जेथे या संदर्भात त्याच्या व्यावसायिक क्रियाकलापांसाठी आवश्यक प

रवानगी आणि/किंवा नोंदणी

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments