Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedएयर इंडियातर्फे प्रवासाचा अनुभव उंचावण्यासाठी मोबाइल अ‍ॅप आणि संकेतस्थळावर  बॅगेज ट्रॅकिंग...

एयर इंडियातर्फे प्रवासाचा अनुभव उंचावण्यासाठी मोबाइल अ‍ॅप आणि संकेतस्थळावर  बॅगेज ट्रॅकिंग सुविधा लाँच

 

 

प्रवाशांना आता त्यांच्या संपूर्ण प्रवासादरम्यान आपल्या चेक्ड-इन बॅग्ज ट्रॅक करता येणार असून बॅगेज स्टेटस नोटिफिकेशनही मिळवता येणार आहे.

नाविन्यपूर्ण डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रवाशांना सुखद अनुभव देण्याच्या एयर इंडियाच्या सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही सुविधा लाँच करण्यात आली आहे.

 

गुरुग्राम, ११ जुलै २०२४ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने आपले मोबाइल अ‍ॅप आणि संकेतस्थळावर, वापरण्यास सोपी, बॅगेज ट्रॅकिंग सुविधा लाँच केली आहे. कंपनीच्या नेटवर्क विमानतळांवर उपलब्ध होणारी रियल टाइम बॅगेज ट्रॅकिंग माहिती आणि क्लाउड अ‍ॅप्लिकेशन सुविधा वापरून या सेवेअंतर्गत प्रवाशांना संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेजचे ट्रॅकिंग करता येणार आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या चेक्ड- इन बॅजेगविषयी काळजी वाटत असल्यास ती सहज कमी करता येईल. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपाशिवाय थेट प्रवाशांना ही सोय देणारी एयर इंडिया ही जगभरातील काही मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे.

 

एयर इंडियाच्या डिजिटल तंत्रज्ञान व डिझाइन टीमने कंपनीच्या एयरपोर्ट ऑपरेशन्स विभागाच्या सहकार्याने ही सुविधा तयार आणि विकसित केली आहे. या सुविधेमुळे बॅगेज ट्रॅकिंग कमीत कमी डेटा एंट्रीसह जाणून घेण्याचा सोयीस्कर पर्याय मिळतो. प्रवाशांना त्यांच्या बॅगेज रिसीटवरील बारकोड स्कॅन करून त्यांच्या चेक्ड- इन बॅगेजचे ट्रॅकिंग करता येईल. त्याशिवाय ही माहिती बॅग चेक-इन केल्या असतील, तर प्रवास संपल्यानंतर मोबाइल अ‍ॅपमध्ये ‘माय ट्रिप्स’ सेक्शनमध्ये संबंधित प्रवासाचा समावेश केला असल्यास पाहायला मिळेल. ही सुविधा एयर इंडियाच्या संकेतस्थळावर ‘ट्रॅक युवर बॅग्ज’ टॅबअंतर्गत बुक अँड मॅनेज सेक्शनअंतर्गत उपलब्ध केली जाणार आहे.

 

या सुविधेच्या महत्त्वाच्या पैलूंमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो

 

रियल टाइम अपडेट्स: चेक्ड- इन बॅग्जविषयी महत्त्वाची माहिती उदा. सध्याचे ठिकाण, ट्रान्सिट स्टेटस, बॅगेज आल्याचे तपशील, स्थानिक वेळेसह सहज वाचता येईल अशा पद्धतीने दिले जाणार आहेत. स्टेटस कव्हरेजमध्ये सर्व महत्त्वाच्या बॅगेज टचपॉइंट्सचा विशेषतः जिथे बॅगेज ट्रॅकिंग तंत्रज्ञान आहे, उदा. चेक-इन, सिक्युरिटी क्लियरन्स, एयरक्राफ्ट लोडिंग, ट्रान्सफर आणि बॅगेज क्लेम एरियामध्ये अरायव्हल अशा सोयी उपलब्ध आहेत त्यांचा समावेश होतो.

कोड- शेयर आणि इंटरलाइन फ्लाइट्सचे ट्रॅकिंग – संपूर्ण बॅगेज ट्रॅकिंग प्रक्रिया एयर इंडियाच्या विविध फ्लाइट सेगमेंट्समध्ये उपलब्ध केली जाईल. त्याशिवाय प्रवासात इतर एयरलाइन्सचा इंटरलाइन आणि कोड- शेअरअंतर्गत समावेश असेल आणि ते त्याच रिझर्व्हेशनमध्ये समाविष्ट असेल, तर त्या सेगमेंट्समधूनही ट्रॅकिंग पुरवले जाईल.

सर्वसमावेशक ट्रॅकिंग – विविध चेक्ड-इन बॅग्ज असलेल्या प्रवाशांसाठी प्रत्येक बॅगसाठीची तपशीलवार ट्रॅकिंग माहिती एकाच युजर- फ्रेंडली इंटरफेजवर उपलब्ध केली जाईल. मोबाइल अ‍ॅपद्वारे बॅगेज चेक इन केल्यावर नोटिफिकेशनही पाठवले जाईल. ट्रॅकिंग अनुभवासाठी महत्त्वाची असलेली नोटिफिकशन्सची विस्तारित रेंज उदा. अरायव्हलनंतर बॅगेज कॅरोसेल माहिती वगैरे सोयींसह उपलब्ध करण्याचाही विचार आहे.

 

‘नाविन्यपूर्ण डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना सुखद अनुभव देण्याच्या आमच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून त्यांना रियल टाइम बॅगेज स्टेटस उपलब्ध दिले जाणार आहे. हा महत्त्वाचा ग्राहककेंद्रित उपक्रम आमच्या स्थित्यंतराच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आमचे मोबाइल अ‍ॅप प्रवाशांसाठी आदर्श प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल आणि ही वापरण्यास सोपी सुविधा ‘माय ट्रिप्स’ सेगमेंटमध्ये बॅगेजशी संबंधित विशिष्ट माहिती पुरवेल. प्रवाशांना मोबाइल फोनच्या कॅमेऱ्याने बॅगेज टॅग स्कॅन करून आपले बॅगेज समाविष्ट करता येईल,’ असे एयर इंडियाचे प्रमुख डिजिटल आणि तंत्रज्ञान अधिकारी डॉ. सत्या रामा

स्वामी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments