पुणे, 11 जुलै 2024: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने योनेक्स सनराईज व्हीव्ही नातू मेमोरियल अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत महिला गटात तन्वी रेड्डी आंदलुरी, अभिलाषा ए., तरणजीत कौर यांनी तर, पुरुष गटात सरथ डी यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला.
पी.ई. सोसायटीज पीडीएमबीए स्पोर्टस कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर, सीओईपी बॅडमिंटन कोर्ट, पीवायसी हिंदू जिमखाना बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत महिला गटात पहिल्या फेरीत तेलंगणाच्या बिगरमानांकीत तन्वी रेड्डी आंदलुरीने महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित श्रुती मुंदडाचा 23-21 21-13 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. तेलंगणाच्या अभिलाषा ए. हिने महाराष्ट्राच्या अकराव्या मानांकित रुचा सावंतचा 21-16 19-21 21-19 असा संघर्षपूर्ण पराभव केला. उत्तरप्रदेशच्या तरणजीत कौरने दिल्लीच्या तेराव्या मानांकित लिखिता श्रीवास्तवचा 21-15 12-21 21-19 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. महाराष्ट्राच्या तनिष्का देशपांडेने उत्तरप्रदेशच्या अनुष्का जुयालचा 21-15 21-15 असा तर महाराष्ट्राच्या पूर्वा बर्वेने तामिळनाडूच्या रीवा इव्हेंजेलिन एम.चा 21-10 21-12 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या वैदेही चौधरीने तेलंगणाच्या प्रशांत बोनमचा 21-11 19-21 21-11 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
पुरुष गटात आंध्रप्रदेशच्या बिगरमानांकित सरथ डी याने महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित वरुण कपूरचा 21-8 21-13 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. उत्तरप्रदेशच्या सोळाव्या मानांकित चिराग सेठने गुजरातच्या अधिप गुप्ताचे आव्हान 21-17 21-16 असे मोडीत काढले. आंध्रप्रदेशच्या सहाव्या मानांकित साई चरण कोया याने तेलंगणाच्या जयंश रेड्डी पुलपर्टीला 21-15 21-11 असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या आर्यन शेट्टीने तेलंगणाच्या क्वालिफायर किरण कुमार एम.चा 21-13 21-17 असा पराभव केला. छत्तीसगढच्या सिद्धार्थ प्रताप सिंगने महाराष्ट्राच्या ऋषभ देशपांडेचा 21-13 16-21 21-12 असा तीन सेटमध्ये पराभव केला. तामिळनाडूच्या अकराव्या मानांकित सिद्धांत गुप्ताने कर्नाटकच्या नरेन अय्यरचा 21-14 21-18 असा पराभव केला.
निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: पुरुष एकेरी:
सरथ डी(आंध्रप्रदेश)वि.वि.वरुण कपूर(महा)[4] 21-8 21-13;
ओरिजित चलिहा(आसाम)वि.वि.लक्ष चेंगप्पा एमए(कर्नाटक)21-14 13-21 21-17;
भरत राघव (हरियाणा)[9]वि.वि.तन्मय बिकाश बोरुआ(आसाम)21-12 21-11;
प्रथमेश कुलकर्णी (महा)वि.वि.ऋषभ राठोड (मध्यप्रदेश)21-17 17-21 22-20;
आर्य भिवपत्की(महा)[5]वि.वि.निखिल चेत्री(अरुणाचलप्रदेश) 21-9 21-18;
निकोलस नाथन राज (कर्नाटक)वि.वि.रौनक चौहान(चंदीगढ) 21-17 21-17;
रघु एम.(कर्नाटक)[13]वि.वि.लोकेश बाबू रमेश(तामिळनाडू)21-7 21-14;
प्रणय शेट्टीगर(महा)वि.वि.अरुणेश एच.(गोवा) 22-20 21-15;
सनीथ डी.एस.(कर्नाटक)[3]वि.वि.हर्षल भोयर(छत्तीसगढ)21-15 21-8;
ध्रुव नेगी(उत्तरप्रदेश)वि.वि.यश योगी(छत्तीसगढ) 21-18 21-13;
चिराग सेठ(उत्तरप्रदेश)[१६]वि.वि.अधिप गुप्ता(गुजरात)21-17 21-16;
मनराज सिंग(हरियाणा)वि.वि.गोविंद के.(केरळ) 21-17 22-20;
साई चरण कोया (आंध्रप्रदेश[6]वि.वि.जयंश रेड्डी पुलपर्टी(तेलंगणा)21-15 21-11;
अभिषेक सैनी(हरियाणा)[१५]वि.वि.शुभम कुमार(दिल्ली) 21-13, 17-21 21-7;
आर्यन शेट्टी(महा)वि.वि.किरण कुमार एम.(तेलंगणा) 21-13 21-17;
सिद्धार्थ प्रताप सिंग(छत्तीसगढ)वि.वि.ऋषभ देशपांडे (महा) 21-13 16-21 21-12;
सिद्धांत गुप्ता(तामिळनाडू)[11] वि.वि.नरेन अय्यर(कर्नाटक) 21-14 21-18;
महिला एकेरी:
ईशारानी बरुआ (आसाम)[1]वि.वि.रिया मुखर्जी(रेल्वे) 21-11 21-11;
तन्वी रेड्डी आंदलुरी (तेलंगणा)वि.वि.श्रुती मुंदडा(महा)[2] 23-21 21-13;
श्रीयांशी परदेशी (मध्यप्रदेश)वि.वि.मृण्मयी देशपांडे (महा) 20-22 21-15 21-17;
तरणजीत कौर(उत्तरप्रदेश)वि.वि.लिखिता श्रीवास्तव(दिल्ली)[13] 21-15 12-21 21-19;
तनिष्का देशपांडे (महा)वि.वि.अनुष्का जुयाल(उत्तरप्रदेश) 21-15 21-15;
पूर्वा बर्वे (महा)वि.वि.रीवा इव्हेंजेलिन एम.(तामिळनाडू) 21-10 21-12;
वैदेही चौधरी (महा)वि.वि. प्रशांत बोनम(तेलंगणा) 21-11 19-21 21-11;
आलिशा नाईक(महा)[6]वि.वि.अनेरी कोटक(गुजरात) 21-8 17-21 21-11;
अभिलाषा ए. (तेलंगणा)वि.वि.रुचा सावंत(महा)[11] 21-16 19-21 21-19;
साद धर्माधिकारी (महा)वि.वि.यशवी भट(दिल्ली) 21-18 22-20;
रक्षा कंदसामी (महा)वि.वि.मेधवी नागर(हरियाणा) 21-9 21-14;
तारा शहा(महा)वि.वि.रिजु
ल सैनी(हरियाणा) 21-13 18-21 21-12


