वैद्यकीय शिक्षण, संशोधन, अत्याधुनिक तंत्रांनी उपचार आणि रुग्ण चिकित्सेमध्ये सर्वांगीण उपचाराचा दृष्टीकोन, या सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल एस हॉस्पिटलचे संचालक व वरिष्ठ युरोलॉजिस्ट प्रा.सुरेश पाटणकर यांना मध्यप्रदेश – भोपाळ येथील मानसरोवर ग्लोबल विद्यापीठाद्वारे ‘डी.लिट’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
मानसरोवर ग्लोबल विद्यापीठ भोपाळ येथे हा पदवीदान समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या हस्ते प्रा.डॉ.सुरेश पाटणकर यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, विद्यापीठाचे कुलगुरू आणि मध्यप्रदेश मधील वैद्यकीय, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते.
शास्त्रीय दृष्टीकोनातून आधुनिक उपचारांना पारंपारिक उपचारांची जोड दिली पाहिजे. कोणत्या आजारांमध्ये मिश्र उपचारांचा उपयोग करता येईल याबाबत संशोधन होण्याची सध्या गरज आहे. यासाठी सर्व उपचाराचे तज्ञ, वैद्यकीय शिक्षक व शिक्षण तज्ञ, सरकार यांचा मन:पूर्वक सहभाग आवश्यक आहे, असे मत या पदवीदान समारंभावेळी बोलताना डॉ.पाटणकर यांनी व्यक्त केले.
एस हॉस्पिटल मध्ये गेल्या ४० वर्षांपासून रुग्णसेवा देत असताने डॉ.पाटणकर यांनी सामाजिक आरोग्यासाठी मोठे योगदान दिले आहे. यामध्ये अॅलो- आयुर या मिश्र उपचार पद्धतीवर संशोधन करून मूत्रविकारासाठी उपयोगी असे अनेक औषधे त्यांनी संशोधन करून विकसित केली आहेत. याचा फायदा आज हजारो रुग्णांना होत आहे. या संशोधित औषधांना अमेरिकन, युरोपियन आणि भारतीय पेटंटही मिळालेले आहेत. याचबरोबर नवीन प्रकारच्या लेसर उपचार पद्धती, लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया, मूत्रमार्ग पुनर्रचना यामध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर योग्य ठिकाणी करून डॉ.पाटणकर यांनी त्यांच्या ४० वर्षाच्या रुग्णसेवेमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये अनेक गुतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडून अनेक रुग्णांना नवजीवनाची संजीवनी दिली आहे. तसेच हॉस्पिटल मध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या मान्यतेनुसार अनेक एमसीएच,डीएनबी, फेलोशिप सारखे अभ्यासक्रम चालू करून अनेक विद्यार्थ्यांनाही त्यांनी घडवले आहे.
डॉ.पाटणकर यांना मिळालेल्या या सन्मानाने पुण्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या मानात भर पड
ली आहे.


