Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedसावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त होणार ७०,४४५ रोपांचे विनामूल्य वाटप महात्मा ज्योतिबा फुले...

सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त होणार ७०,४४५ रोपांचे विनामूल्य वाटप महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती अभिवादन कृती समिती, पुणे चा पुढाकार ; सावित्रीबाईंच्या १९३ व्या जयंतीनिमित्त आयोजन

सावित्रीबाईंच्या १९३ व्या जयंतीनिमित्त आयोजन

पुणे : स्त्रियांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती अभिवादन कृती समिती, पुणे च्या वतीने ७०,४४५ हून अधिक देशी वृक्षांच्या रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. बुधवार, दिनांक ३ जानेवारी रोजी महात्मा फुले पेठेतील महात्मा फुले वाडा राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी १० ते ५ यावेळेत हे अभियान राबविले जाईल.

सावित्रीबाईंच्या जयंतीचे हे १९३ वे वर्ष असून प्रत्येक वर्षीचे ३६५ दिवस याप्रमाणे एकूण ७०,४४५ दिवस पूर्ण होत असून, तेवढी रोपे नागरिकांना देण्यात येणार आहेत. यामध्ये पर्यावरण पूरक देशी वृक्षांचा म्हणजेच तुळस, पिंपळ, वावर, कडुलिंब, बहावा, दिल का राजा, भेंडी ,सिताफळ, उंबर ,आंबट चिंच, वड ,पळस टिकोमा, शिसवी, जांभूळ ,करंजी ,मोगरा आधी वृक्षप्रजातीचा समावेश आहे. याची नावनोंदणी फुले वाडा येथे सुरू होणार आहे.

अभियानाचे आयोजन रघुनाथ ढोले, रवि चौधरी, प्रल्हाद गवळी, सारंग सराफ, बाळासाहेब अमराळे, नंदा पंडीत, एकनाथ ढोले, सुनीता काळे, श्रीधर चव्हाण, चेतन धोत्रे, सचिन विप्र, डॉ. गणेश परदेशी, सुशीला नेटके, बाळासाहेब भामरे, रमेश जाधव, गणेश पाटील, विजय रजपूत यांनी केले आहे. सदर वृक्षांची लागवड व देखभाल लोकसेवा शैक्षणिक संस्था समूहाने मौजे फुलगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी केलेली आहे.

तसेच या समितीत सर्व संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद, सदस्य सर्व राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, जेष्ठ नागरीक संघ, पोलीस मित्र, महिला बचत गट, भजनी मंडळ यांचे कार्यकर्ते अभियानाकरिता काम करणार आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने रोपे घेण्याकरीता यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments