पुणे, दि.13 जुलै 2024 – पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित चौथ्या पीवायसी – रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत साखळी फेरीत गोल्डन किंग्ज संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसरा विजय मिळवला.
पीवायसी जिमखाना येथील बुद्धिबळ संकुलात आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत गोल्डन किंग्ज संघाने 7 नाईट्स संघाचा 4.5-2.5 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम राखली. गोल्डन किंग्जकडून निरंजन गोडबोले, शुभंकर मेनन, इंद्रनील मांडके, सावन रायसोनी यांनी सुरेख कामगिरी केली.
दुसऱ्या सामन्यात अक्षय साठ्ये, मिहिर शहा, मकरंद दाते, रोहिन लागू, जयदीप गोखले, प्रयाण गाला, अलिशा पै यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर किंग्ज 64 संघाने मराठा वॉरियर्सचा 7-0असा एकतर्फी पराभव करून पहिला विजय नोंदवला. अन्य लढतीत वाडेश्वर विझार्ड्स संघाने गोल्डफिल्ड ट्रायडंट्स संघाचा 4.5-2.5 असा पराभव केला. वाडेश्वर विझार्ड्सकडून रोहित देवल, अमोल मेहेंदळे, अनंत सहस्रबुद्धे, निशाद चौघुले यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्पर्धेचे उदघाटन रिअल्टी सेव्हनचे व्यवस्थापकीय संचालक कपिल त्रिमल, पीवायसी हिंदू जिमखानाचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, क्लबच्या चेस विभागाचे सचिव शिरीष साठे, आमोद प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंटरनॅशनल आरबीटर अथर्व गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: साखळी फेरी:
गोल्डन किंग्ज वि.वि.7 नाईट्स 4.5-2.5 (किरण खरे पराभूत वि.तन्मय चितळे 0-1; निरंजन गोडबोले वि.वि.प्रियदर्शन डुंबरे 1-0; अभिषेक गोडबोले बरोबरी वि.अमीर आजगावकर 0.5-0.5; शुभंकर मेनन वि.वि. अश्विन त्रिमल 1-0; इंद्रनील मांडके वि.वि.यश सारडा 1-0; राजवीर राजाध्यक्ष पराभुत वि. पवन धूत 0-1; सावन रायसोनी वि.वि.सौरभ प्रभुदेसाई 1-0);
किंग्ज 64 वि.वि.मराठा वॉरियर्स 7-0(अक्षय साठ्ये वि.वि.आदित्य लाखे 1-0; मिहिर शहा वि.वि.राजन जोशी 1-0; मकरंद दाते वि.वि.नितीन गोरे 1-0; रोहिन लागू वि.वि.राजेंद्र एरंडे 1-0; जयदीप गोखले वि.वि.अमेय कुलकर्णी 1-0; प्रयाण गाला वि.वि.अनया राजवाडे 1-0; अलिशा पै वि.वि.रिया चितळे 1-0);
वाडेश्वर विझार्ड्स वि.वि.गोल्डफिल्ड ट्रायडंट्स 4.5-2.5 (यश मेहेंदळे पराभुत वि.मिहीर नानिवडेकर 0-1; रोहित देवल वि.वि.केतन देवल 1-0; अमोल मेहेंदळे वि.वि.अर्णव कुंटे 1-0; रोनित जोशी बरोबरी वि.जय केळकर 0.5-0.5; वंदित मेहता पराभुत वि.निमिश कुलकर्णी 0-1; अनंत सहस्रबुद्धे वि.वि.आर्य बजाज 1-0; निषाद चौघुले वि.वि. प्रभांश मथरू 1-0;


