नागपूर / औरंगाबाद । जुलै १७, २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)च्या सीएसआर शाखेने आपल्या स्पर्श संजीवनी आरोग्यसेवा उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील नागपूर व औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये मोबाइल चिकित्सा युनिट्सना हिरवा झेंडा दाखवला. विशेष कार्यक्रमामध्ये श्री. गिरीश महाजन, मंत्री – ग्रामविकास आणि युवक व्यवहार व क्रीडा, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्रात मोबाइल चिकित्सा युनिट्सच्या सादरीकरणाप्रसंगी मत व्यक्त करत एचएमआयएलच्या कॉर्पोरेट अफेअर्सचे एव्हीपी व व्हर्टिकल हेड श्री. पुनीत आनंद म्हणाले, ”सर्वांगीण विकासासाठी व्यक्तींचे आरोग्य उत्तम असण्याची गरज आहे. ह्युंदाईचा जागतिक दृष्टिकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’शी बांधील राहत एचएमआयएफच्या स्पर्श संजीवनी मोबाइल चिकित्सा युनिट्सचा नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यामधील दुर्गम व वंचित भागांमध्ये सकारात्मक परिणाम घडवून आणण्याचा मनसुबा आहे. स्पेशलाइज्ड ह्युंदाई माइटी व्हॅन्सना मोबाइल चिकित्सा युनिट्समध्ये बदलण्यात आले आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. हे युनिट्स या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांमध्ये जात गरजूंना निदान आणि मोफत वैद्यकीय सल्लामसलत सेवा देतील.”
स्पर्श संजीवनी मोबाइल चिकित्सा युनिट्स बाबत:
स्पर्श संजीवनी उपक्रमांतर्गत मोबाइल चिकित्सा युनिट्स दुर्गम ग्रामीण भागांमध्ये कार्यरत आहेत, ज्यामुळे आसपासच्या परिसरातील प्राथमिक आरोग्यसेवा सुविधांचा अभाव असलेल्या दुर्गम गावांमध्ये प्राथमिक वैद्यकीय केअर सेवा उपलब्ध होतात.
प्रत्येक स्पेशलाइज्ड मोबाइल चिकित्सा युनिटमध्ये पात्र एमबीबीएस डॉक्टर आहे, जे मोफत सल्लामसलत आणि औषधे देतात. या युनिट्समध्ये ब्लड शुगर, रक्तदाब, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांच्या वैद्यकीय निदानासाठी आधुनिक वैद्यकीय चाचणी सुविधा आणि नैदानिक साधने देखील आहे
त.


