Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोटक महिंद्रा बँक तर्फे नवीन वितरण रचना

कोटक महिंद्रा बँक तर्फे नवीन वितरण रचना

पुणे,17 जुलै 2024 : ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवण्याच्या आपल्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहत कोटक महिंद्रा बँक ने आपल्या विकास धोरणाचा एक भाग म्हणून नवीन वितरण रचनेचे अनावरण केले. ग्राहकांना बँकेशी संवाद साधण्यासाठी सर्व मार्ग एकत्रित करणे आणि सर्व उत्पादने व सेवांच्या बाबतीत अखंड अनुभव प्रदान करून सेवा मापदंड उंचावणे आणि कार्यक्षमता वाढविणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. ही वितरण रचना शाखा नेटवर्क,डिजिटल ब्रांच चॅनल (मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग प्लॅटफॉर्म्स समाविष्ट असलेले) आणि वॉईस चॅनल एकत्रित करते. या धोरणात्मक उपक्रमाचे उद्दिष्ट सर्व परस्पर संवाद मार्गांवरील ग्राहकांसाठी समन्वय निर्माण करून सेवा वितरणात सुधारणा करून अखंड अनुभव प्रदान करणे आहे. या महत्त्वपूर्ण परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी बँकने वितरण प्रमुख म्हणून प्रणव मिश्रा यांची नियुक्ती केली आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments