पुणे । जुलै 18, 2024: ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एच एम आय एफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एच एम आय एल) च्या सीएसआर शाखेने पुणे येथील तळेगावमध्ये आपल्या स्पर्श संजीवनी आरोग्यसेवा उपक्रमांतर्गत टेलिमेडिसीन क्लिनिक्स सुरू केली आहेत. पाच टेलिमेडिसीन क्लिनिक्स तळेगावमधील पैत, कडुस, वाडा, नवलख उंबरे आणि सुदुंबरे या गावांना सेवा देतील. हे क्लिनिक्स दुर्गम भागात आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि आरोग्यसेवा पैदान करतील, ज्यामुळे अशा गावांमधील प्राथमिक आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल.
महाराष्ट्रात स्पर्श संजीवनी टेलिमेडिसीन क्लिनिक्सच्या उद्धाटनाप्रसंगी मत व्यक्त करत एच एम आय एल च्या कॉर्पोरेट अफेअर्सचे ए व्ही पी व व्हर्टिकल हेड श्री. पुनीत आनंद म्हणाले, ह्युंदाईचा जागतिक दृष्टिकोन प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी अंतर्गत ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एच एम आय एफ) ने आपल्या स्पर्श संजीवनी आरोग्यसेवा उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील दुर्गम भागांमध्ये टेलिमेडिसीन क्लिनिक्सचे नेटवर्क निर्माण केले आहे, ज्यामुळे विद्यमान प्राथमिक आरोग्यसेवा सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होत आहे. या 5 नवीन क्लिनिक्ससह नेटवर्कमध्ये 40 टेलीमेडिसीन क्लिनिक्स भारतभरातील 8 राज्यांमध्ये कार्यरत आहेत.


