बॉलीवूड स्टार विकी कौशल शनिवारी (२० जुलै २०२४) या शोरूमचे उद्घाटन करणार आहे.
यामुळे महाराष्ट्रातील शोरूमची संख्या २० वर गेली
पुणे, १६ जुलै २०२४ : भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आज सातारा रोड, पुणे येथे एक नवीन शोरूम सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. बॉलीवूड स्टार विकी कौशल २० जुलै रोजी संध्याकाळी ७:३० वाजता या ब्रँड-न्यू शोरूमचे उद्घाटन करेल. सध्या हा ज्वेलरी ब्रँड मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, संभाजीनगर यांसह राज्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे. या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सच्या कलेक्शनमधील डिझाइन्सची विस्तृत श्रेणी असेल, जी अत्यंत कलात्मकतेने ग्राहकांसमोर ठेवली जाईल.
नवीन शोरूम सुरू होण्याचा आनंद व्यक्त करतानाच, नवीन शोरूममधून दागिन्यांची खरेदी केल्याने ग्राहकांना जास्तीतजास्त लाभ मिळावा, याची खात्री करण्यासाठी कल्याण ज्वेलर्सने आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे, तसेच कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट – बाजारातील सर्वात कमी रेट आणि कंपनीच्या सर्व शोरूममध्ये प्रमाणित – नवीन शोरूममधील दागिन्यांच्या खरेदीवर लागू होईल, असे जाहीर केले आहे. या ऑफर मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत.
नवीन शोरूम लाँच करण्याबद्दल भाष्य करताना, कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरामन म्हणाले, “कंपनी म्हणून आम्ही मोठे टप्पे गाठले आहेत आणि ग्राहकांचा खरेदीचा अनुभव वाढविण्यासाठी एक समग्र परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. कल्याण ज्वेलर्स या ब्रँडसाठी महाराष्ट्र राज्य ही सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे. या राज्यात आमचा धोरणात्मक विस्तार करण्यावर गेल्या काही वर्षांत आम्ही सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. पुण्यातील ही नवीन शोरूम आम्हाला बाजारपेठेतील आमचे स्थान मजबूत करण्यास सक्षम करेल, तसेच ग्राहकांना सोयी आणि सुलभता प्रदान करेल, याचा आम्हाला विश्वास आहे.”
कल्याण ज्वेलर्समधील सगळे दागिने हे BIS हॉलमार्क केलेले आहेत आणि त्यावर अनेक शुद्धता चाचण्या केल्या जातात. ग्राहकांना कल्याण ज्वेलर्सकडून 4-स्तरीय हमी प्रमाणपत्र, शुद्धतेची हमी, दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल, तपशीलवार उत्पादन माहिती आणि पारदर्शक देवाणघेवाण व बाय-बॅक पॉलिसीही मिळेल. हे प्रमाणपत्र त्याच्या निष्ठावंत ग्राहकांना सर्वोत्तम देण्याची ब्रँडची वचनबद्धता दर्शविते.
या शोरूममध्ये मुहूर्त (वेडिंग ज्वेलरी लाइन), मुद्रा (हँडक्राफ्टेड अँटिक ज्वेलरी), निमह (टेम्पल ज्वेलरी), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअर सारखी डायमंड ज्वेलरी), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्व (विशेष प्रसंगांसाठीचे हिरे), अंतरा (लग्नाचे हिरे), हेरा (डेली वेअर डायमंड्स), रंग (मौल्यवान दगडांचे दागिने) आणि नुकत्याच लाँच झालेल्या लीला (रंगीत स्टोन्स आणि डायमंड ज्वेलरी) यासह कल्याण ज्वेलर्सचे अन्य लोकप्रिय दागिनेही ठेवले जातील.
ब्रँड, त्याचे कलेक्शन आणि ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी, https://www.kalyanjewellers.net/ ला भेट द्या
अटी आणि शर्ती लागू*


