CNH इंडियाने उत्पादनाचा टप्पा गाठला : ग्रेटर नोएडामध्ये 700,000 ट्रॅक्टर

तारां कित Avatar

ग्रेटर नोएडा, 24 जुलै 2024

 

 

 

न्यू हॉलंड आणि केस IH ब्रँड्समुळे कृषी क्षेत्रात अत्यंत आघाडीवर असलेल्या CNH ने ग्रेटर नोएडा येथील त्याच्या उत्पादन साइटवर 700,000 ट्रॅक्टरचे उत्पादन पूर्ण करत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या प्लांटमध्ये 35 ते 120 हॉर्सपॉवरचे दोन ब्रँडमध्ये अंदाजे 2,000 ट्रॅक्टर तयार होतात. गेरिट मार्क्स, CNH चे नवीन CEO यांनी त्यांच्या अलीकडील भारत भेटीदरम्यान हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याप्रकरणी झालेल्या कार्यक्रमास उपस्थित होते. हा महत्त्वाचा टप्पा कंपनीची वचनबद्धता आणि त्याच्या निरंतर वाढीची पुष्टी करतो.

 

 

 

1999 मध्ये उत्पादन सुरू केल्यापासून या प्लान्टने वार्षिक 60,000 ट्रॅक्टर तयार करण्याची क्षमता निर्माण केली आहे. सध्या ग्रेटर नोएडा प्लांट देशांतर्गत बाजारपेठेसाठी ट्रॅक्टर, इंजिन, पॉवर टेक ऑफ (पीटीओ) आणि एक्सल तयार करतो, तर आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिकेतील 75 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करतो.

 

 

 

“आमचे सीईओ आणि भारतीय संघासह 700,000 ट्रॅक्टर्सच्या निर्मितीचा महत्त्वाचा टप्पा साजरा करताना मला आनंद होत आहे. हे यश ‘मेड इन इंडिया’ आणि देशातील कृषी विकासासाठीचे आमचे समर्पण स्पष्ट करते, अशी CNH इंडिया आणि सार्कचे कंट्री मॅनेजर आणि व्यवस्थापकीय संचालक नरिंदर मित्तल यांनी टिप्पणी केली. “हा आमच्या कर्मचाऱ्यांच्या कठोर मेहनतीचा परिणाम आहे आणि आमच्या उत्पादनांवरील आमच्या ग्राहकांच्या विश्वासाची पुष्टी होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे महत्त्वाचे स्थान आहे. इथे अफाट संधी आहेत. तंत्रज्ञान आणि नावीन्य यावर लक्ष केंद्रित करणे आम्हाला इथे यश मिळवून देईल.”

 

 

 

60 एकरांवर पसरलेला, ग्रेटर नोएडा प्लांट देशातील सर्वात प्रगत ट्रॅक्टर उत्पादन स्थळांपैकी एक आहे. इथे सुमारे 1,200 कर्मचारी कार्यरत आहेत. शाश्वततेला चालना देणे, छतावर बसविलेल्या सौर पॅनेलमधून ऊर्जा वापरणे आणि मियावाकी प्रकल्प पद्धतीचा अवलंब करणाऱ्या वनीकरण प्रकल्पाचा अभिमान आहे. मियावाकी म्हणजे स्थानिक जंगलातील वनस्पतींची घनदाट लागवड करणे.

 

 

 

आपल्या ‘मेड इन इंडिया’ ऑपरेशन्समधून CNH इंडिया जागतिक दर्जाची उत्पादने देण्याच्या वचनावर 25 वर्षांहून अधिक काळ काम करत आहे. केस IH, न्यू हॉलंड आणि CASE कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट ब्रँड्स हे त्याचे प्रमुख उत्पादन आहे. 2018 मध्ये कंपनीने तिच्या पोर्टफोलिओमध्ये वित्तपुरवठा उपाय ऑफर करण्यासाठी CNH Capital India लाँच केले.

Tagged in :

तारां कित Avatar