पुणे, दिनांक २५ जुलै २०२४: पॅरिसमध्ये सुरू होत असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा निमित्ताने खेळाडूंच्या प्रतिभेला चालना देण्याचा वारसा पुढे चालू ठेवत, डेक्कन जिमखाना क्लब दिनांक २६ जुलै ते १० ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक महोत्सवाचे आयोजन करणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ऑलिम्पिक चेतना साजरे करणे आणि युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य आणि खेळाबद्दलची आवड दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.सन १९२० मध्ये, सर दोराबजी टाटा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, डेक्कन जिमखाना क्लबने अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये पहिला भारतीय संघ पाठवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली, जो भारतीय क्रीडा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
याबाबत माहिती सांगताना डेक्कन जिमखाना क्लबचे मानद सरचिटणीस मिहीर केळकर आणि वित्त सचिव श्री. गिरीश इनामदार म्हणाले की, “भारताच्या ऑलिम्पिक प्रवासातील आमच्या ऐतिहासिक योगदानाचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्ही या महत्त्वपूर्ण प्रसंग साजरा करत असताना, आमच्या भूतकाळाचा सन्मान करण्यासाठी आणि भविष्याला प्रेरणा देण्यासाठी ऑलिम्पिक महोत्सवाचे आयोजन करत आहोत.
गिरीश इनामदार व मिहिर केळकर पुढे म्हणाले की, पुण्यात १९०६ मध्ये स्थापन झालेला डेक्कन जिमखाना क्लब नेहमीच आघाडीवर राहिला आहे. या काळात भारतीय संघांना ऑलिंपिक सामन्यात प्रवेश नव्हता, त्यासाठी पहिला प्रयत्न डेक्कन जिमखान्यातर्फे त्यावेळचे सरचिटणीस श्री. भागवत यांनीच केला. सर जॉर्ज लाईड व सर दोराबजी टाटा यांच्या प्रयत्नातूनच भारतीयांना ऑलिपिकच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक क्षेत्रात प्रवेश मिळाला. अभिमानाची गोष्ट अशी की, भारतीय कुस्तीगीरांची व अॅथेलेट्सची ऑलिंपिक टीमसाठी जी चाचणी झाली, ती प्रथम पुण्यात आणि तीही डेक्कन जिमखान्यावर झाली.
दिनांक २६ जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता ऑलिम्पियन नेमबाज अंजली भागवत आणि ऑलिंपिक बॅडमिंटनपटू निखिल कानिटकर यांच्या हस्ते विशेष क्रीडा पंधरवड्याचे उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमांमध्ये २६ जुलै रोजी सायंकाळी ऑलिम्पियन नेमबाज अंजली भागवत आणि ऑलिंपिक बॅडमिंटनपटू निखिल कानिटकर यांचा टॉक शो असणार आहे. त्यानंतर २७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ शिरीष मोरे यांचा ‘स्पोर्ट्स अ करिअर ऑप्शन’ या विषयावरील टॉक शोचा समावेश आहे.
२८ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ऑलिम्पियन श्री. मुरलीकांत पेटकर (चित्रपट: चंदू चॅम्पियन रिअल हिरो) आणि श्री. राहुल सिंग यांचा टॉक शो आणि अनुभव शेअरिंग आणि ९ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ऑलिंपियन विष्णू वर्धन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी यांचे टॉक शो आयोजित केले जाणार आहेत.
या महोत्सवात ऑलिम्पिक भावना साजरे करण्यासाठी विविध क्रीडा उपक्रम, स्पर्धा आणि कार्यक्रम देखील सादर केले जातील आणि युवा खेळाडूंना टेबल टेनिस, टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि जलतरण यासारख्या विविध खेळांमध्ये त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दि
ले जाईल.


