Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन*

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन*

 पुणे, दि. २९ : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑगस्ट महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे १ व २ ऑगस्ट, मंचर येथे ५ व ६ ऑगस्ट, जुन्नर येथे १२ व १३ ऑगस्ट, वडगाव मावळ येथे १९ व २० ऑगस्ट तर लोणावळा येथे २६ व २७ ऑगस्ट या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments