Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडसइंड बँकेतर्फे भारतातील वाढत्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs) साठी समर्पित बँकिंग वर्टिकल...

इंडसइंड बँकेतर्फे भारतातील वाढत्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs) साठी समर्पित बँकिंग वर्टिकल सुरू

अग्रगण्य स्वरूपाचा हा उपक्रम कॉर्पोरेट आणि कर्मचारी बँकिंगच्या सुविधाक्षमता एकाच रिलेशनशिपअंतर्गत एकत्र आणतो. याला डिजिटल-फर्स्ट प्लॅटफॉर्म्स आणि भारत-केंद्रित विशेष सल्लागार सेवेची जोड देण्यात आली आहे.

 

 

मुंबई, 28 सप्टेंबर 2026: इंडसइंड बँकेने आज भारतातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) परिसंस्थेसाठी समर्पित GCC बँकिंग वर्टिकल सुरू करण्याची घोषणा केली. भारतातील GCC परिसंस्थेसाठी हा अग्रगण्य स्वरूपाचा उपक्रम आहे. समर्पित GCC रिलेशनशिप मॉडेलअंतर्गत कॉर्पोरेट आणि कर्मचारी बँकिंगच्या सुविधा क्षमता एकत्र आणून, GCCs च्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेने अधिक एकात्मिक आणि विशेष सेवा देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे. डिजिटल-फर्स्ट प्लॅटफॉर्म्स, तत्पर सेवा आणि भारत-केंद्रित सल्लागार कौशल्याच्या माध्यमातून ही सुविधा अखंड बँकिंग अनुभव उपलब्ध करून देते. यामुळे GCCs ना एकाच बँकिंग भागीदारामार्फत विविध बँकिंग उपाययोजनांचा सर्वसमावेशक संच उपलब्ध होतो.

 

 

 

भारताची GCC परिसंस्था आर्थिक वर्ष 2021 पासून 32% ने वाढली असून, आता देशात 2,117 GCCs आहेत. यातून जागतिक कॅपॅबिलिटी हब म्हणून भारताचे वाढते महत्त्व तसेच या क्षेत्राच्या अधिकाधिक प्रगत होत असलेल्या बँकिंग गरजा अधोरेखित होतात.

 

 

 

इंडसइंड बँकेचे GCC बँकिंग वर्टिकल बँकेच्या डिजिटल बँकिंग, कर्मचारी बँकिंग, कमर्शियल कार्ड सोल्युशन्स, कॅपिटल अकाउंट आणि FEMA सोल्युशन्स तसेच GIFT City येथील बँकेच्या इंटरनॅशनल बँकिंग युनिट (IBU) मार्फत परकीय चलनातील खाती या 5 प्रमुख क्षमतांना एका रिलेशनशिपअंतर्गत एकत्र आणते. या एकात्मिक दृष्टिकोनामुळे GCCs ना त्यांच्या व्यवसायाशी, कर्मचाऱ्यांशी आणि आंतरराष्ट्रीय बँकिंगविषयक गरजांशी संबंधित बाबी अधिक सुलभ पद्धतीने हाताळता येतात.

 

 

 

इंडसइंड बँकेच्या कॉर्पोरेट बँकिंगचे कंट्री हेड निरज शाह म्हणाले, “भारताची GCC परिसंस्था पारंपरिक शेअर्ड-सर्व्हिसेस कामकाजाच्या पलीकडे विकसित झाली आहे. जागतिक संस्थांसाठी तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, विश्लेषण, वित्त, संशोधन आणि इतर धोरणात्मक कार्ये GCCs मार्फत वाढत्या प्रमाणात हाताळली जात आहेत. या क्षेत्राचा विस्तार आणि त्याचे धोरणात्मक महत्त्व सातत्याने वाढत असताना, त्याच्या बँकिंगविषयक गरजाही अधिक सूक्ष्म आणि विशिष्ट होत आहेत. भारताच्या विशिष्ट गरजांनुसार तयार करण्यात आलेल्या संबंधित क्षमता आणि विशेष मार्गदर्शनाला एकत्र आणणाऱ्या अधिक एकात्मिक बँकिंग दृष्टिकोनाच्या माध्यमातून या बदलत्या गरजांना पाठबळ देण्याचे इंडसइंड बँकेचे उद्दिष्ट आहे.”

 

 

 

GCC बँकिंग प्रस्तावाची रचना 3 प्रमुख तत्त्वांवर आधारित आहे:

 

युनिफाइड: कॉर्पोरेट आणि कर्मचारी बँकिंगच्या गरजांसाठी एकच रिलेशनशिप. यामध्ये सर्व 5 प्रमुख क्षमतांचा समावेश आहे.

डिजिटल-फर्स्ट: GCCs आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीच्या गरजांशी एकात्मिक होण्यासाठी तयार करण्यात आलेले डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म्स आणि सोल्युशन्स.

रिस्पॉन्सिव्ह: GCCs च्या बँकिंग आणि कार्यात्मक गरजा बदलत असताना त्यांना सहाय्य करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरील संपर्काची सुविधा आणि भारत-केंद्रित विशेष सल्ला.

गिफ्ट सिटी येथील इंटरनॅशनल बँकिंग युनिट (IBU) या प्रस्तावाला आणखी बळकटी देत असून GCCs ना बँकेच्या इतर व्यापक बँकिंग क्षमतांसोबतच परकीय चलनातील खातेविषयक सोल्युशन्सचाही लाभ घेता येण्यासाठी सक्षम केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments