Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कडून भारतातील ९ राज्‍यांमधील ४०३ आयटीआय आणि पॉलिटेक्निक...

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कडून भारतातील ९ राज्‍यांमधील ४०३ आयटीआय आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्‍यांना रोजगाराची संधी · आसाम, अरूणाचल प्रदेश, तामिळनाडू, महाराष्‍ट्र

आसाम, अरूणाचल प्रदेश, तामिळनाडू, महाराष्‍ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात या नऊ राज्‍यांमध्‍ये प्‍लेसमेंट मोहिम राबवण्‍यात आली

 

गुरूग्राम । जुलै २९, २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एच एम आय एल) ने आपल्‍या डिलर नेटवर्कमध्‍ये भारतातील नऊ राज्‍यांतील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्‍थांमधील ४०३ विद्यार्थ्‍यांसाठी रोजगार संधींची घोषणा केली. एच एम आय एल आयटीआय व पॉलिटेक्निक संस्‍थांमध्‍ये विशेष कौशल्‍य विकास उपक्रम देते आणि विद्यार्थ्‍यांना आपल्‍या डिलर्सच्‍या व्‍यापक नेटवर्कमध्‍ये अर्थपूर्ण रोजगार संधी देते. नुकतेच आसाम, अरूणाचल प्रदेश, तामिळनाडू, महाराष्‍ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात या राज्‍यांमध्‍ये प्‍लेसमेंट मोहिम राबवण्‍यात आली.

 

ह्युंदाईचा जागतिक दृष्टिकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’ प्रती कटिबद्ध असलेल्‍या एच एम आय एल चा जीवन संपन्‍न करण्‍याचा आणि भारतातील तरूणांना स्‍वप्‍न साकारण्‍यास सक्षम करत सर्वोत्तम भारत घडवण्‍याचा मनसुबा आहे. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून, एच एम आय एल विद्यार्थ्‍यांसाठी इकोसिस्‍टम निर्माण करण्‍यास मदत करते, ज्‍यामधून उद्योगासाठी सुसज्‍ज कौशल्‍य विकास, आधुनिक तंत्रज्ञानांची माहिती, ऑन-द-जॉब प्रशिक्षण आणि कोर्स पूर्ण झाल्‍यानंतर रोजगार संधीची खात्री मिळते.

 

स्‍नातक दिन साजरीकरणाबाबत मत व्‍यक्‍त करत एच एम आय एल चे पूर्ण-वेळ संचालक आणि सीओओ श्री. तरूण गर्ग म्‍हणाले, “एच एम आय एल भारताप्रती कटिबद्ध आहे आणि आम्‍हाला भारत सरकारच्‍या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाला पाठिंबा देण्‍याचा अभिमान वाटतो. नवीन प्रोग्राममधून विद्यार्थ्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानांचे प्रशिक्षण मिळाल्‍याची आणि ते त्‍यांच्‍या रोजगारासाठी पहिल्‍या दिवसापासून योगदान देण्‍यास सुसज्‍ज असण्‍याची खात्री मिळते. एच एम आय एल ची देशभरातील अधिकाधिक तरूणांना प्रशिक्षित करण्‍याची योजना आहे, ज्‍यामुळे त्‍यांना आदरणीय उदरनिर्वाह संपादित करण्‍यास मदत होईल.”

 

एच एम आय एल ने ७६ सरकारी आयटीटी आणि पॉलि‍टेक्निक संस्‍थांसोबत सहयोग केला आहे. उपक्रमाचा भाग म्‍हणून एच एम आय एल ची सी एस आर शाखा ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एच एम आय एफ) ने संस्‍थांच्‍या विविध गरजांची पूर्तता करत सहयोग सुविधा सुधारण्‍यामध्‍ये गुंतवणूक केली आहे, ज्‍यामधून विद्यार्थ्‍यांना आवश्‍यक संसाधने, दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची अत्‍यावश्‍यक माहिती मिळत असल्‍याची खात्री मिळेल. तसेच, एच एम आय एल ऑटोमोटिव्‍ह उद्योग व ऑटोमोबाइल तंत्रज्ञानामधील नवीन प्रगतींवरील स्‍टडी मटेरियल, तसेच विद्यार्थ्‍यांना ऑन-द-जॉब प्रशिक्षण देत आहे, ज्‍यामागे त्‍यांना अपस्किल करण्‍यासोबत त्‍यांची कौशल्‍ये निपुण करण्‍याचा मनसुबा

आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments