Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतातील महिलांकरिता सर्वाधिक सुरक्षित आणि रोजगाराकरिता उत्तम असलेल्या शहरांचा निर्देशकांचा भाग 2...

भारतातील महिलांकरिता सर्वाधिक सुरक्षित आणि रोजगाराकरिता उत्तम असलेल्या शहरांचा निर्देशकांचा भाग 2 मध्ये दक्षिणतली शहरे अग्रस्थानी Ø चेन्नई, बेंगलुरू, पुणे, मुंबई आणि हैद्राबाद ही भारतातील महिलांकरिताची सर्वोत्तम 5 शहर ठरली. Ø भारताची राजधानी दिल्ली ही भरतातील महिलांकरिताचा पहिल्या 10 शहरांमधील एक Ø गुडगाव आणि जयपुर शहरांमध्ये प्रकर्शाने सुधारणा झाल्याचे दिसून आले

चेन्नई, जानेवारी 4, 2024: अवतार ग्रुप, ही भारतातील विविधता, समानता आणि समावेशन (डीईआय) उपाययोजनांबद्दल आराखडे मांडणारा पहिली समूह असून, या समूहाद्वारे “भारतातील महिलांकरिता सर्वोत्तम शहराचा (टीसीडबल्यूआय)” निर्देशांकाचा दुसरा भाग प्रसिद्ध करण्यात आला. याकरिता नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण (PLFS July 2022-June 2023) , राष्ट्रीय जनगणना आणि गुन्हेगारी अहवालांसारख्या विविध शासकिय स्त्रोतांच्या मदतीने अवतार द्वारे महिलांमधील रोजगारावर प्राथमिक संशोधन करण्यात आले. या संशोधनामध्ये जुलै 2023 आणि डिसेंबर 2023 दरम्यान एक खुले सर्वेक्षण तसेच केंद्रित समूह चर्चांचे (FGD) आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये देशभरातील 1200 महिलांनी सहभाग घेतला होता. सर्वेक्षण आणि शासकिय माहितीवरून एकंदरीत मोजणी केली गेली आणि एकत्रितपणे व्यापक सिटी इन्क्लुजन स्कोअर्स (CIS) काढले गेले.

चेन्नई, बेंगलुरू, पुणे, मुंबई, हैद्राबाद, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, कोईंबतूर आणि जयपूर ही श्रेणी 1 मधील महिलांकरिताची सर्वोत्तम 10 शहरे ठरली ज्यांची लोकसंख्या ही 1 कोटी पेक्षा जास्ती आहे. देशाची राजधानी ही पहिल्यांदाच या श्रेणीमध्ये समाविष्ट होऊन 8 व्या स्थानावर राहिली. तमिळनाडू मधील चेन्नईची कामगिरी ही उत्तम असून – या शहराने स्वत:चे महिलांकरिताचे सर्वोत्तम शहर म्हणून 1 ले स्थान राखले.

तिरुचिरापल्ली, वेल्लोर, कोची, तिरुअनंतपुरम, सिमला, सालेम, एरोडे, तिरूपूर, गुडगाव आणि पुद्दुचेरी ही शहरे श्रेणी 2 मधील भारतातील महिलांकरिताची सर्वोत्तम शहरे ठरली.( कारण या शहरांची लोकसंख्या ही एक कोटी पेक्षा कमी आहे)

अभ्यासाकरिता एकूण 113 शहरांची निवड ही देशाच्या आर्थिक विकासामधील त्यांच्या भूमिकेनुसार निवडण्यात आली होती. श्रेणी 1 मध्ये 49 शहरे होती ज्यांची लोकसंख्या ही एक कोटीपेक्षा जास्ती आहे आणि श्रेणी 2 मध्ये 64 शहरांचा समावेश होता पण त्यांची लोकसंख्या ही 1 कोटीपेक्षा कमी आहे. सिटी इन्क्लुजन स्कोअर (CIS) हा शहरांचे मुल्यांकन तीन महत्वाच्या मुद्यांवर करून काढला गेला – सामाजिक समावेशन गुण (SIS), औद्योगिक समावेशन गुण (IIS) आणि नागरिक अनुभव गुण (CES). सामाजिक समावेशन गुण हे बाह्य सामाजिक परिस्थितीवर दिले गेले, औद्योगिक समावेशन गुण हे त्या शहरातील संस्था महिला कर्मचाऱ्यांना किती प्राधान्य देतात यावर दिले गेले. CES काढण्याकरिता संपूर्ण भारतातील महिलांकडून FGD आणि एकत्रित केलेल्या माहितीचा वापर केला गेला.

भारतामधील शहरांमध्ये महिलांकरिता समावेशक आणि समानतेवर आधारीत शहरांचा विकासाचे कार्य सुरू असताना, दक्षिणेतील शहरांमध्ये मात्र ऐतिहासिक आणि सामाजिक घटक हे इतके मजबूत आहे की त्यामुळे शासकिय धोरणांमध्ये महिलांचा समावेश करणे अधिक सहज आहे आणि म्हणूनच जेन्डर –प्रोग्रेसिव वातावरणामुळे इथली शहरं निर्देशांकामध्ये अग्रस्थानी आहेत.

1 कोटी पेक्षा अधिक लोकसंख्येनुसार तमिळनाडू येथील चेन्नई तर 1 कोटीपेक्षा कमी लोकसंख्ये मध्ये तिरुचिरापल्ली ही शहरं अग्रस्थानी राहिली.

1 कोटी-लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पहिल्या 10 शहरांमध्ये दक्षिण भारतातील 8 शहरांचा समावेश होता – तिरुचिरापल्ली, वेल्लोर, कोची, तिरुअनंतपुरम, सालेम, एरोडे, तिरुपूर आणि पुद्दुचेरी. यामध्ये उत्तर भागातील फ़क्त दोन शहरांचा समावेश होता – शिमला आणि गुडगाव.1 कोटीपेक्षा अधिक लोक संख्या असलेल्या सर्वोत्तम 10 शहरांमध्ये तमिळनाडू मधील चेन्नई आणि कोईंबतूर तर महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे यांचा समावेश होता, ही अशी दोनच राज्या होती ज्यांच्यामधील दोन शहर प्रत्येकी असा समावेश होता.

यावेळी बोलताना, अवतार समूहाचा संस्थापिका आणि अध्यक्षा, डॉ. सौंदर्या राजेश म्हणाल्या, “ उत्तम रोजगाराचा संधी, चांगल्या दर्जाची जीवनशैली ज्यात शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा असतील, परिवहनाचे उत्तम नेटवर्क आणि सुरक्षिततेचा अनुभव यावर शहरं महिलांकरिता समावेशक आहेत की नाही हे ठरविले गेले. अवतारचा वार्षिक निर्देशांक, भारतातील महिलांकरिताची सर्वोत्तम शहरे शोधण्यामागचा हेतू हा देशातील कामाचा ठिकाणी महिलांकरिता समावेशक आणि समान मार्ग उपलब्ध करून दिला जातो की नाही हे जाणून घेण्याचा आहे. आमची उपलब्ध असलेली माहिती आणि पुराव्यांवर आधारीत तथ्य हे महिलांकरिता भारतीय शहरे कामाकरिता अधिक सुयोग्य कशी बनविता येतील यावर प्रकाश टाकणारी असून, यामुळे आपल्याला 2027 पर्यंत एक विकसित देश बनण्याचा मार्गामध्ये मदत करतील- आणि अगदी हेच स्वप्न आपल्या पंतप्रधानांचे देखील आहे. असे वातावरण तयार करण्याचा हा एक प्रयत्न आहे जिथे महिलांची भरभराट होते, त्या नेतृत्वं करतात आणि आपले उत्तम योगदान प्रदान करतात.”

2023 चा अहवालानुसार भारतातील महिलांकरिताचा सर्वोत्तम शहरांमधील ठळक वैशिष्ठ्ये:

Ø तमिळनाडू मधील 7 शहरं ही विविध श्रेणींमध्ये महिलांकरिताचा सर्वोत्तम शहरांपैकी एक ठरली आहेत.

Ø 1 कोटी पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये दक्षिणेचा शहरांचा अधिक प्रभाव आहे- 10 पैकी 8 शहरे ही दक्षिणेतली आहेत.

Ø 1 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीचा TCWI यादीमध्ये जयपूरने 10 वा क्रमांक पटकावला.

Ø 1 कोटीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमधील औद्योगिक समावेशनामध्ये गुडगाव अग्रस्थानी राहिले.

Ø सर्वेक्षणातील 32% महिलांना असुरक्षित जाणविते तर 21% महिलांना स्वत:च्या सुरक्षिततेबद्दल आणि रात्री 8:00 वाजल्यानंतर आपल्या शहरात बाहेर पडताना असुरक्षित वाटते.

Ø शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांच्या तत्वांवरती महिला भारतीय शहरांना सर्वोत्तम म्हणून गुण देतात.

Ø 31% महिलांना त्यांच्या शहरांमध्ये त्यांच्या कपड्यांच्या आवडी निवडींकरिता पारखले जाते असे वाटते, तर 30% महिलांचा अनुभव हा मिश्र स्वरूपाचा आहे.

भारतातील महिलांकरिताचा सर्वोत्तम शहरांच्या यादीची लिंक खाली दिलेली आहे: https://www.avtarinc.com/extend/tcwi/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments