प्राईस बँड ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडच्या प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी समभागासाठी ३१५ ते ३३१ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
· अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख – सोमवार ८ जानेवारी २०२४
· बोली/इश्यू सुरु होण्याची तारीख – मंगळवार ९ जानेवारी २०२४ आणि बंद होण्याची तारीख – गुरुवार, ११ जानेवारी २०२४
· कमीत कमी ४५ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास ४५ च्या पटीत बोली लावावी लागेल.
· कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भागातील इक्विटी समभागांसाठी बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना दर इक्विटी समभागासाठी १५ रुपये सूट दिली जाईल.
मुंबई, ४ जानेवारी, २०२४: जगातील आघाडीच्या मेटल कटिंग कम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल मशिन्सच्या उत्पादकांपैकी एक, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतीय बाजारपेठेत तिसरा सर्वाधिक आणि कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये जागतिक बाजारपेठेत बारावा सर्वाधिक हिस्सा असलेल्या (स्रोत: एफअँडएस रिपोर्ट), ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडने आपला आयपीओ मंगळवार ९ जानेवारी २०२४ रोजी खुला करण्याचे ठरवले आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी कामकाजाचा एक दिवस आधी म्हणजे सोमवार ८ जानेवारी २०२४ रोजी बोली खुली होईल. बोली/इश्यू गुरुवार ११ जानेवारी २०२४ रोजी खुली होईल.
प्राईस बँड प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी समभागासाठी ३१५ ते ३३१ रुपये निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ४५ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास ४५ च्या पटीत बोली लावावी लागेल.
कंपनीच्या आयपीओमध्ये १०,०००.०० मिलियन रुपयांच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या (फ्रेश इश्यू) इक्विटी समभागांचा समावेश असेल.
या आयपीओमधून जे भांडवल उभे राहील त्याचा उपयोग कंपनीच्या काही कर्जांच्या संपूर्ण किंवा अंशतः परतफेडीसाठी आणि/किंवा मुदतपूर्व परतफेडीसाठी, कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी केला जाईल.
ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम ६(२) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ७५% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी ही नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेल्यांपैकी उरलेले इक्विटी समभाग क्यूआयबीना (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट वाटपासाठी उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील, यामध्ये म्युच्युअल फंडांचाही समावेश असेल, पण त्यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त बोली येणे आवश्यक आहे. नेट ऑफरचा कमीत कमी १५% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार, प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: (अ) नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंत ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल (ब) नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी १०% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भागामध्ये बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना इक्विटी समभागांचे वाटप करण्यात येईल. त्यासाठी इश्यू किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या बोली येणे आवश्यक आहे. सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.
२ जानेवारी २०२४ रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत करण्यात येत असलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.
या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे आहेत.
प्रसिद्धीसाठी संपर्क:
सर्बजीत शर्मा (+91 9987872613, sarbjeet.sharma@adfactorspr.com)
रितेश नांदगावकर (+91 9769245884, ritesh.nandgaonkar@adfactorspr.com)
या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलेल्या ज्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांची व्याख्या दिली गेलेली नाही त्यांचा अर्थ आरएचपीमध्ये देण्यात आल्याप्रमाणे आहे.


