Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वतःवर विश्वास, कामावर निष्ठा आणि परिस्थिती समजून घेण्याची क्षमता वाढवा बीएनसीएतील विद्यार्थिनींना...

स्वतःवर विश्वास, कामावर निष्ठा आणि परिस्थिती समजून घेण्याची क्षमता वाढवा बीएनसीएतील विद्यार्थिनींना डब्ल्यूआयसीसीआयच्या सोनाली ठोसर यांचे मार्गदर्शन

पुणे, दि. 5 : पदवी घेतल्यानंतर नोकरी व व्यवसाय करताना पहिली पाच वर्षे ही जोखमीची असल्याने वास्तूरचनाशास्त्रासारख्या (अर्किटेक्चर) क्षेत्रातील महिलांनी गोंधळून न जाता स्वतःवर विश्वास, कामावर निष्ठा आणि परिस्थिती समजून घेण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे, असे वूमेन्स इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (डब्ल्यूआयसीसीआय) अध्यक्ष आर्किटेक्ट सोनाली ठोसर यांनी मार्गदर्शन सत्रात सांगितले.

 

निमित्त होते महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल (प्रशिक्षण व नोकरी नेमणूक कक्ष) आणि वूमेन्स इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डब्ल्यूआयसीसीआय) यांच्या तर्फे ‘व्यावसायिकता वृद्धीसाठी येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मार्ग शोधणे’ यावर विद्यार्थिनींसाठी ‘संवादातून मार्गदर्शन’ या सत्राचे. यावेळी बीएनसीएतील पदवी व पदव्युत्तर वर्षातील सुमारे अडीचशे विद्यार्थिनी या अनौपचारिक सत्रात उत्साहाने सहभागी झाल्या.

 

या सत्रात बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप,आर्किटेक्ट सोनाली ठोसर तसेच प्रिया गोखले, यामिनी देशमूख, वैशाली चौधरी, अंजली लव्हेकर आणि प्राजक्ता इटरौतवार या आर्किटेक्ट महिला व्यावसायिक व समुपदेशकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. बीएनसीएतील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या प्रमुख प्रा. माधुरी झिटे तसेच प्रा. यश जोशी यांनी या सत्राचे आयोजन केले असून खुशी मंत्री या विद्यार्थिनीने उपस्थितांचे स्वागत केले आणि आभार मानले.

 

डॉ. कश्यप यांनी महिला सशक्तीकरणाचे काम करणाऱ्या महर्षी कर्वे यांची परंपरा सांभाळत बीएनसीएमध्ये आम्ही केवळ नोकऱ्या करण्यासाठी विद्यार्थिनी घडवत नसून नोकऱ्या देणाऱ्या उद्योजक व्यावसायिकही तयार करण्यावर भर देतो, असे सांगितले.

 

सुमारे ९० टक्के पुरुषप्रधान असणाऱ्या वास्तूरचनाशास्त्रातील (आर्किटेक्चर) व्यवसायात स्त्री आर्किटेक्ट म्हणून नव्याने काम सुरू करणाऱ्या पदवीधर विद्यार्थिनींनी भक्कम पाय रोवून उभे राहताना आपले क्षेत्र व पुढे संसारातील समतोलही सांभाळता येणे शक्य होते. तसेच जाणीवपूर्वक व्यावसायिक समंजसपणा व आत्मविश्वास निर्माण करता येतो, असे ठोसर म्हणाल्या. वास्तूरचनाशास्त्र क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी सर्जनशीलता आणि व्यावसायिकता जाणीवपूर्वक वाढवायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

 

वास्तूरचनाशास्त्रातील करीअर करताना स्वतःला झोकून देत आपला संसार, मुलांची जबाबदारीतील समतोलही तितक्याच संयमाने साधण्यासाठी मानसिकता निर्माण करा. काम न करण्यासाठी कोणतीही कारणे शोधून नका, असे लव्हेकर म्हणाल्या. आपल्या कामात आनंद घेता आला तर यश आणि पैसाही आपोआप येतो, असे देशमुखांनी सां

गितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments