डीआरएचपी लिंक: https://www.icicisecurities.com/Upload/ArticleAttachments/Paras%20Healthcare%20Limited%20-%20DRHP.pdf
बेड्सच्या क्षमतेनुसार, उत्तर भारत, बिहार आणि झारखंडमधील पाचवी सर्वात मोठी हेल्थकेयर पुरवठादार कंपनी, (स्रोत: क्रिसिल रिपोर्ट) पारस हेल्थकेयर लिमिटेडने आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी दाखल केले आहे.
बेड्सच्या क्षमतेनुसार, उत्तर भारत, बिहार आणि झारखंडमधील पाचवी सर्वात मोठी हेल्थकेयर पुरवठादार कंपनी, पारस हेल्थकेयर लिमिटेडकडे 31 मार्च 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 2135 बेड्सची क्षमता होती. (स्रोत: क्रिसिल रिपोर्ट) “पारस हेल्थ” या नावाने ही कंपनी उत्तर भारतातील पाच राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आठ हॉस्पिटल्स चालवते. हरियाणामध्ये गुरुग्राम आणि पंचकुला; बिहारमध्ये पटना आणि दरभंगा; उत्तर प्रदेशात कानपुर; राजस्थानमध्ये उदयपूर; झारखंडमध्ये रांची आणि जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशात श्रीनगर येथे ही हॉस्पिटल्स आहेत. दर्जेदार आरोग्य देखभाल सेवा आणि परवडण्याजोग्या किमती यामध्ये सुवर्णमध्य साधून, द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्ये विशेष टर्शरी वैद्यकीय देखभाल पुरवण्यावर पारस हेल्थकेयरने लक्ष केंद्रित केले आहे. सर्व हॉस्पिटल्समध्ये पारस हेल्थकेयरने अनेक क्लिनिकल स्पेशालिटीज उपलब्ध करवून दिल्या आहेत. यामध्ये कार्डियाक सायन्सेस, ऑन्कोलॉजी, न्यूरो सायन्सेस, गॅस्ट्रो सायन्सेस आणि ऑर्थोपेडिक्स व सांधे बदल यांचा समावेश आहे.
या ऑफरमध्ये 400 कोटी रुपयांपर्यंतच्या, नव्याने जारी करण्यात आलेल्या आणि प्रत्येकी 1 रुपया दर्शनी मूल्य असलेल्या, समभागधारकांनी विक्रीसाठी प्रस्तुत केलेल्या 14,974,010 पर्यंतच्या इक्विटी समभागांचा समावेश आहे.
विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये डॉ धरमिंदर कुमार नागर (समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर) यांच्याकडून, प्रत्येकी 1 रुपया दर्शनी मूल्य असलेले 2,928,320 इक्विटी समभाग आणि कॉमेलिना लिमिटेडकडून (समभाग विक्री करू इच्छिणारे गुंतवणूकदार) प्रत्येकी 1 रुपया दर्शनी मूल्य असलेले 12,045,690 पर्यंतचे इक्विटी समभाग यांचा समावेश आहे.
समभागांच्या विक्रीमधून जी रक्कम उभी राहील ती पारस हेल्थकेयर लिमिटेडने पुढील कारणांसाठी वापरण्याचे ठरवले आहे (1) कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची मुदतपूर्व परतफेड; (2) पारस हेल्थकेयर (रांची) प्रायव्हेट लिमिटेड आणि प्लस मेडिकेयर हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपन्यांनी घेतलेल्या काही कर्जांची मुदतपूर्व परतफेड करण्यासाठी, कर्ज किंवा इक्विटी स्वरूपात, गुंतवणूक आणि (3) सर्वसाधारण कॉर्पोरेट कामे.
या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर्स लिमिटेड हे आहेत.


