Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सने भारतातील पहिल्‍या एसयूव्‍ही कूपसह मिड-एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये धुमाकूळ निर्माण केला

टाटा मोटर्सने भारतातील पहिल्‍या एसयूव्‍ही कूपसह मिड-एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये धुमाकूळ निर्माण केला

मुंबई, ऑगस्‍ट ७, २०२४: एसयूव्‍ही डिझाइनच्‍या नवीन युगाला परिभाषित करत टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने आज अधिकृतरित्‍या Curvv.ev लाँच केली आणि टाटा कर्व्‍हचे प्रदर्शन केले. ‘शेप्‍ड टू स्‍टन’, शेप्‍ड फॉर ग्रॅण्‍ड्यूर’ ‘शेप्‍ड फॉर परफॉर्मन्‍स’, ‘शेप्‍ड फॉर इनोव्‍हेटिव्‍ह टेक्‍नॉलॉजी’ आणि ‘शेप्‍ड फॉर अॅब्‍सोल्‍यूट सेफ्टी’ या ५ प्रमुख आधारस्‍तंभांवर डिझाइन करण्‍यात आलेली कर्व्‍ह कंपनीच्‍या अत्‍यंत स्‍पर्धात्‍मक मिड-साइज एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये प्रवेशाला सादर करते. टाटा मोटर्सच्‍या एसयूव्‍ही श्रेणीमधील ही नवीन वेईकल एसयूव्‍हीची प्रबळता आणि कूपेच्‍या आकर्षकतेचे अद्वितीय संयोजन असलेले उत्‍पादन आहे. बॉक्‍सी-एसयूव्‍ही बॉडी स्‍टाइल्‍सचे प्रभुत्‍व असलेल्‍या क्षेत्रातील मर्यादांना दूर करत टाटा मोटर्सला भारतातील पहिली एसयूव्‍ही कूपे ‘कर्व्‍ह’सह भारतात ही नाविन्‍यपूर्ण बॉडी स्‍टाइल आणणारी पहिली ओईएम असण्‍याचा अभिमान वाटतो.

 

२०२२ मध्‍ये वचन दिल्‍याप्रमाणे कंपनी आज प्रथम Curvv.ev लाँच करत आहे, लवकरच वेईकलचा आयसीई अवतार लाँच करण्‍यात येईल. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (टीपीईएम) चे प्रगत प्‍युअर ईव्‍ही आर्किटेक्‍चर acti.ev वर आधारित दुसरे उत्‍पादन Curvv.ev भारताच्‍या इलेक्ट्रिक वेईकल प्रवासामधील भावी झेप सादर करते. तीन विशिष्‍ट परसोना – क्रिएटिव्‍ह, अकॉम्प्लिश आणि एम्‍पॉवर्ड+ मध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या Curvv.ev मध्‍ये आरामदायीपणा, एैसपैस जागा असलेली इंटीरिअर वैशिष्‍ट्ये, सुरक्षितता व प्रगत तंत्रज्ञानाचे परिपूर्ण संयोजन आहे. तसेच या सर्वांसह लांबची रेंज, जलद चार्जिंग क्षमता आणि आकर्षक किंमत या वेईकलला उद्योगामधील तिच्‍या मिड एसयूव्‍ही आयसीई काऊंटरपार्ट्सपेक्षा वरचढ ठरवतात. ५५ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅकसाठी सिंगल चार्जमध्‍ये ५८५ किमीच्‍या आणि ४५ केडब्‍ल्‍यूएचसाठी ५०२ किमीच्‍या (एआरएआय प्रमाणित, एमआयडीसी पार्ट १) लाँच ड्रायव्हिंग रेंजसह Curvv.ev वेईकल Curvv.ev ४५ साठी १७.४९ लाख रूपये आणि Curvv.ev ५५ साठी १९.२५ लाख रूपये या सुरूवातीच्‍या किमतींमध्‍ये उपलब्‍ध असेल.

 

Curvv.ev च्‍या सुरूवातीच्‍या किमती (लाख रूपये)*

 

 

 

तसेच, या प्रीमियम एसयूव्‍हीच्‍या लाँचसह कंपनीने ईव्‍ही अॅक्‍सेसरीजची नवीन श्रेणी Tata.ev ओरिजिनल्‍सच्‍या पदार्पणाची देखील घोषणा केली, जी वैयक्तिकृत कस्‍टमायझेशन देते. टीपीईएमने भारतातील ९००० हून अधिक चार्जिंग पॉइण्‍ट्सच्‍या व्‍यापक नेटवर्कचे एकीकरण असलेले Tata.ev चार्ज पॉइण्‍ट अॅग्रीगेटर देखील सादर केले, जे iRA.ev कनेक्‍टेड कार अॅपमध्‍ये एकीकृत केलेले लाइव्‍ह स्‍टेटस उपलब्‍ध करून देते.

 

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्‍हणाले, ”झपाट्याने विकसित होत असलेल्‍या मिड एसयूव्‍ही श्रेणीमधील आमच्‍या प्रवेशासह आजचा क्षण आमच्‍या एसयूव्‍ही प्रवासामधील महत्त्वाचा टप्‍पा आहे. आम्‍हाला नवीन टायपोलॉजी – भारतातील पहिली एसयूव्‍ही कूपेसह आमची सर्वात नाविन्‍यपूर्ण एसयूव्‍ही लाँच करण्‍याचा अभिमान वाटतो. कर्व्‍हसह आम्‍ही डिझाइन, सुरक्षितता व तंत्रज्ञानासंदर्भातील मर्यादांना दूर करत आहोत. कर्व्‍ह देखील सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांना ईव्‍ही, पेट्रोल व डिझेलमधील विविध पॉवरट्रेन ऑफरिंग्‍ज देण्‍याच्‍या आमच्‍या स्‍थापित धोरणाला अधिक पुढे घेऊन जाते.

 

आज लाँच करण्‍यात आलेली Curvv.ev ५५ केडब्‍ल्‍यूएचच्‍या सर्वात मोठ्या बॅटरी पॅकसह ४०० ते ४२५ किमीची प्रभावी अंदाजित रिअल-वर्ल्‍ड रेंज देते. तसेच, या वेईकलची विशेषरित्‍या डिझाइन केलेली फास्‍ट चार्जिंग क्षमता फक्‍त १५ मिनिटांमध्‍ये १५० किमी रेंजच्‍या टॉप-अपची खात्री देते. Curvv.ev ४५ साठी १७.४९ लाख रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीसह आम्‍ही ईव्‍ही आणि समकक्ष आयसीई वेईकल्‍सच्‍या किमतींमध्‍ये समानता आणत आहोत. या उत्‍पादनाची विस्‍तारित रेंज आणि आकर्षक किंमत विविध मर्यादांना दूर करत ईव्‍हींना अधिक लक्षवेधक बनवतात. या वेईकलमधील तंत्रज्ञान-संपन्‍न वैशिष्‍ट्ये, प्रगत सुरक्षितता आणि उत्‍साहवर्धक इन्‍फोटेन्‍मेंट प्रत्‍येक ईव्‍ही खरेदीदार व उत्‍साहींना आनंदित करतील.”

 

Curvv.ev बाबत

 

शेप्‍ड टू स्‍टन:

 

Curvv.ev अपारंपारिक टायपोलॉजी आहे. एसयूव्‍हीची प्रबळता व टिकाऊपणाला कूपेची आकर्षकता व स्‍पोर्टी सिल्‍हूटसोबत एकत्रित करत Curvv.ev मध्‍ये आकर्षकता, कार्यक्षमता आणि व्‍यावहारिकतेचे परिपूर्ण संतुलन राखण्‍यात आले आहे. ही वेईकल आकर्षक डिझाइन असलेली उच्‍च दर्जाची उत्‍पादन आहे, ज्‍यामुळे मिड एसयूव्‍ही श्रेणीसाठी सर्वोत्तम ऑफरिंग आहे.

 

या वेईकलच्‍या एक्‍स्‍टीरिअरमध्‍ये फ्लश डोअर हँडल्‍ससह अधिक प्रीमियम दिसणारी कूपे डिझाइन आहे. आर१८ अलॉई व्‍हील्‍ससह ऐरो इन्‍सर्ट्स, तसेच स्‍क्‍वेअर्ड व्‍हील आर्क्‍स प्रीमियम डिझाइनला स्‍पोर्टीनेस देतात. डिझाइनला साजेसे तंत्रज्ञान असलेल्‍या Curvv.ev मध्‍ये स्‍मार्ट डिजिटल लायटिंग जसे स्‍मार्ट डिजिटल कनेक्‍टेड डीआरएलसह वेलकम अँड गुडबाय अॅनिमेशन, स्‍मार्ट चार्जिंग अॅनिमेशन, सीक्‍वेन्शियल टर्न इंडिकेटर्स, एलईडी प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प, एलईडी फ्रण्‍ट फॉग लॅम्‍प्‍ससह कॉर्नरिंग फंक्‍शन, स्‍मार्ट डिजिटल इनेक्‍टेड एलईडी टेल लॅम्‍प्‍ससह अॅनिमेशन, स्‍मार्ट डिजिटल स्‍टीअरिंग व्‍हील, इलेक्ट्रिक फ्रण्‍ट चार्जिंग लिडसह ऑटो ओपन/क्‍लोजिंग, डिजिटल डॅशबोर्ड, फिजिटल कंट्रोल पॅनेल, वॉईस असिस्‍टेड पॅनोरॅमिक सनरूफसह मूड लायटिंग आणि स्‍मार्ट डिजिटल शिफ्टर आहे.

 

पॅनोरॅमिक सनरूफ कॉकपीटसह दिवसा नैसर्गिक प्रकाशामध्‍ये मुक्‍तपणे ड्रायव्हिंगचा आनंद देते, तर मल्‍टी मूड अम्बियण्‍ट लायटिंग प्रवाशांना आरामदायीपणा व उत्‍साहपूर्ण प्रवासाचा आनंद देते. यूटिलिटीसंदर्भात Curvv.ev मध्‍ये ५०० लिटर्सचे बेस्‍ट इन सेगमेंट बूट स्‍पेस आहे, जे फ्रंक अपफ्रण्‍टमध्‍ये ११.६ लिटर्सचे अतिरिक्‍त स्‍पेस देते, जे या श्रेणीच्‍या ग्राहकांसाठी मुलभूत गरज आहे.

 

Curvv.ev व्‍हर्च्‍युअल सनराइज, प्‍युअर ग्रे, प्रिस्‍टीन व्‍हाइट, फ्लेम रेड आणि एम्‍पॉवर्ड ऑक्‍साइड या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल, जे निवडलेल्‍या परसोनावर आधारित असेल.

 

शेप्‍ड फॉर ग्रॅण्‍ड्यूर:

 

Curvv.ev मध्‍ये सामान्‍यत: प्रीमियम श्रेणींमध्‍ये आढळून येणारी टॉप-ऑफ-द-लाइन वैशिष्‍ट्ये आहेत, जी तिचे मूल्‍य तत्त्‍व वाढवतात. ही वेईकल आतील बाजूने बारकाईने डिझाइन करण्‍यात आली आहे, जेथे आरामदायीपणा व सोयीसुविधेवर अधिक लक्ष देण्‍यात आले आहे, ज्‍यामधून प्रभावी लक्‍झरीचा अनुभव मिळतो. अडवान्‍स्‍ड कम्‍फर्ट सीट्स, फ्रण्‍ट सीट व्‍हेण्टिलेशन, ६ वे पॉवर अॅडजस्‍टेबल ड्रायव्‍हर सीट, ६ वे अॅडजस्‍टेबल को-ड्रायव्‍हर सीट, ग्रँड सेंटर कन्‍सोल, कूल्‍ड ग्‍लोव्‍ह बॉक्‍स आणि फ्रण्‍ट अँड रिअर फास्‍ट चार्ज सी टाइप ४५ वॅट अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह या एसयूव्‍ही कूपेमध्‍ये अभूतपूर्व फ्रण्‍ट रो आहे. मागील बाजूस, कारमध्‍ये ६०:४० रिअर स्प्लिट सीट्ससह सेंटर आर्मरेस्‍ट, २ स्‍टेज रिअर सीट रिक्‍लायनिंग आणि रिअर एसी वेण्‍ट्स आहेत.

 

ऑटोमॅटिक हेडलॅम्‍प्‍स, रेन सेन्सिंग वायपर्स, फुली ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोलसह एक्‍स्‍प्रेस कूलिंग, क्रूझ कंट्रोल, कीलेस एण्‍ट्री आणि पुश-बटन स्‍टार्ट यासह Curvv.ev उत्तम सोयीसुविधेची खात्री देते.

 

शेप्‍ड फॉर परफॉर्मन्‍स:

 

प्रगत acti.ev आर्किटेक्‍चरवर डिझाइन करण्‍यात आलेली Curvv.ev १२३ केडब्‍ल्‍यू / १६७ पीएस पॉवर देते, तसेच ८.६ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करते. ४५ केडब्‍ल्‍यूएच (५०२ एआरएआय प्रमाणित रेंज) आणि ५५ केडब्‍ल्‍यूएच (५८५ एआरएआय प्रमाणित रेंज) या सर्वात मोठ्या बॅटरी पॅक पर्यायांसह Curvv.ev दैनंदिन प्रवासासाठी, तसेच तुमच्‍या प्रियजनांसोबत लॉंग ड्राइव्‍हचा आनंद घेण्‍यासाठी तुमची सर्वोत्तम सोबती आहे. ५५ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅकमध्‍ये जलद चार्जिंग गतींसाठी प्रिझमॅटिक सेल्‍स (१.२ सी रेटेड) आहेत, ज्‍यामुळे वेईकल फक्‍त ४० मिनिटांमध्‍ये १० ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज होते किंवा फक्‍त १५ मिनिटांमध्‍ये जवळपास १५० किमी रेंजच्‍या जलद टॉप-अप्‍सची खात्री मिळते.

 

प्रमाणित म्‍हणून ३ ड्राइव्‍ह मोड संयोजन (इको, सिटी आणि स्‍पोर्ट), मल्‍टी-मोड रिजेनसह पॅडल शिफ्टर्स, Curvv.ev ४५ साठी १९० मिमी व Curvv.ev ५५ साठी १८६ मिमीचे उच्‍च ग्राऊंड क्‍लीअरन्‍स, स्‍मार्ट पॉवर इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि विविध चार्जिंग पर्यायांसह Curvv.ev दर्जात्‍मक कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

 

शेप्‍ड फॉर इनोव्‍हेटिव्‍ह टेक्‍नॉलॉजी:

 

क्‍वॉलकॉमच्‍या स्‍नॅपड्रॅगन डिजिटल चेसिस प्‍लॅटफॉर्मद्वारे समर्थित Curvv.ev या श्रेणीमधील नाविन्‍यतेसाठी नवीन बेंचमार्क स्‍थापित करते. या वेईकलमध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत जसे हार्मन™ ची ३१.२४ सेमी सिनेमॅटिक टचस्क्रिन, २६.०३ सेमी डिजिटल कॉकपीट, Arcade.ev सह सिनेमॅटिक एक्‍स्‍पेरिअन्‍स व २० हून अधिक अॅप्‍स, जेबीएल सिनेमॅटिक साऊंड सिस्‍टम, अडवान्‍स्‍ड ओटीए क्षमता, सर्व परसोनामध्‍ये प्रमाणित म्‍हणून व्‍ही२एल व व्‍ही२व्‍ही, स्‍मार्ट वॉच कनेक्‍टीव्‍हीटी आणि पॉवर्ड टेलगेटसह गेस्‍चर अॅक्टिव्‍हेशन.

 

सादर करण्‍यात आलेल्‍या गेम चेंजिंग iRA.ev ग्राहकांना सुधारित नवीन वैशिष्‍ट्ये देते. iRA.ev कनेक्‍टेड कार अॅपमध्‍ये एकीकृत केलेले इंडस्‍ट्री-फर्स्‍ट चार्जिंग अॅग्रीगेटर चार्जर्सची रिअल-टाइम उपलब्‍धता (युनिफाईड चार्जिंग लोकेटरसह ९००० हून अधिक चार्जर्सची लाइव्‍ह उपलब्‍धता) दाखवते आणि चार्जरसाठी विनासायास नेव्हिगेशन सक्षम करते, ज्‍यामुळे प्रवासी चार्जिंग संपण्‍याबाबत कोणतीही चिंता न करता भारताच्‍या कानाकोपऱ्यामध्‍ये आनंदाने प्रवास करू शकतात.

 

शेप्‍ड फॉर अॅब्‍सोल्‍यूट सेफ्टी:

 

तुम्‍हाला व तुमच्‍या प्रियजनांना प्रत्‍येक प्रवासादरम्‍यान परिपूर्ण सुरक्षिततेची खात्री देण्‍यासाठी प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह डिझाइन करण्‍यात आलेल्‍या Curvv.ev मध्‍ये अडवान्‍स्‍ड ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स सिस्‍टम्‍स – लेव्‍हल २ आहे, ज्‍यामध्‍ये २० वैशिष्‍ट्ये आहेत. याव्‍यतिरिक्‍त, या एसयूव्‍ही कूपेमध्‍ये सर्व परसोनामध्‍ये प्रमाणित म्‍हणून ६ एअरबॅग्‍ज, ऑल व्‍हील डिस्‍क ब्रेक्‍ससह ब्रेक डिस्‍क वायपिंग, अकॉस्टिक वेईकल अलर्ट सिस्‍टम (एव्‍हीएएस), एसओएस कॉल फंक्‍शन, ईएसपीसह प्रमाणित म्‍हणून आय-व्‍हीबीएसी, फ्रण्‍ट पार्किंग सेन्‍सर, इलेक्‍ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह प्रमाणित म्‍हणून ऑटो होल्‍ड फंक्‍शन, हिल होल्‍ड असिस्‍ट, हिल डिसेंट कंट्रोल आणि हाय व्‍होल्‍टेज (एचव्‍ही) बॅटरी पॅक व मोटरवर १.६ लाख किमी किंवा ८ वर्षांची आणि वेईकलवर १.२५ लाख किमी किंवा ३ वर्षांची सर्वांगीण वॉरंटी आहे, ज्‍यामधून मन:शांतीची खात्री मिळते.

 

टाटा कर्व्‍ह बाबत

 

टाटा कर्व्‍ह प्रीमियम वैशिष्‍ट्यांसह अधिक प्रगत व स्‍टायलिश पर्यायाचा शोध घेत असलेल्‍या बाजारपेठेच्‍या विशिष्‍ट विभागाच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. वरील श्रेणींमधील वैशिष्‍ट्ये प्रदान करत कर्व्‍ह नवीन प्रगत आयसीई आर्किटेक्‍चर – अॅटलास (ATLAS) वर सादर करण्‍यात येईल. अॅटलास आर्किटेक्‍चर विविध पॉवरट्रेन्‍सना सपोर्ट देते आणि उच्‍च दर्जाचा आरादायीपणा व कार्यक्षमता देते.

 

आजच्‍या स्‍पर्धात्‍मक बाजारपेठेत कर्व्‍हला अपरिहार्य करत टाटा मोटर्स २ पेट्रोल (नवीन हायपेरियन गॅसोलाइन डायरेक्‍ट इंजेक्‍शन इंजिन व १.२ लिटर रिवोट्रॉन पेट्रोल टूर्बोचार्ज्‍ड इंजिन) आणि १ डिझेल पर्यायामध्‍ये (१.५ लिटर क्रियोजेट डिझेल इंजिन) हे उत्‍पादन लाँच करणार आहे. या दोन्‍ही पर्यायांमध्‍ये ६-स्‍पीड मॅन्‍युअल आणि ७-स्‍पीड ड्युअल-क्‍लच ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन असेल. आज, स्‍वदेशी विकसित करण्‍यात आलेली पहिली जीडीआय इंजिन ऑफरिंग – हायपेरियन गॅसोलाइन डायरेक्‍ट इंजेक्‍शन इंजिन देखील लाँच करण्‍यात येत आहे. कर्व्‍ह स्‍मार्ट, प्‍युअर, क्रिएटिव्‍ह व अकॉम्प्लिश या ४ परसोनांमध्‍ये, तसेच गोल्‍ड एसेन्‍स, डेटोना ग्रे, प्रिस्टिन व्‍हाइट, फ्लेम रेड, प्‍युअर ग्रे व ऑपेरा ब्‍ल्‍यू या आकर्षक रंगांमध्‍ये सादर करण्‍यात येईल.

 

कर्व्‍ह श्रेणीला परिभाषित करणाऱ्या विविध पैलूंसह येईल, ज्‍यामुळे या श्रेणीमध्‍ये उपलब्‍ध सर्वोत्तम पर्याय असेल. ५०० लिटरचे दर्जात्‍मक बूट स्‍पेस, फर्स्‍ट इन सेगमेंट ऑफरिंग्‍ज जसे पॉवर्ड टेलगेटसह गेस्‍चर कंट्रोल, हार्मन™ द्वारे ३१.२४ सेमी इन्‍फोटेन्‍मेंटसह श्रेणीमधील सर्वात मोठा स्क्रिन आकार, २६.०३ सेमी इन्‍स्‍ट्रूमेंटल क्‍लस्‍टरसह जेबीएल ब्रँडेड ऑटो सिस्‍टम (९ स्‍पीकर्ससह सबवूफर), स्लिम एण्‍ड टू एण्‍ड एलईउी डीआरएलसह वेलकम अँड गुडबाय अॅनिमेशन, एण्‍ड टू एण्‍ड एलईडी टेल लॅम्‍पसह वेलकम अँड गुडबाय अॅनिमेशन, इल्‍यूमिनेटेड ४ स्‍पोक डिजिटल स्‍टीअरिंग व्‍हील आणि बेस्‍ट इन सेगमेंट लेव्‍हल २ एडीएएस अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह टाटा कर्व्‍ह निश्चितच उत्‍पादनाची पॉवरहाऊस आहे.

 

तसेच, कर्व्‍हमध्‍ये iRA 2.0 च्‍या एकीकरणाच्‍या माध्‍यमातून कनेक्‍टेड वेईकल तंत्रज्ञान आहे, ज्‍यामध्‍ये रिमोट इंजिन स्‍टार्ट/स्‍टॉप आणि अनेक नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्ये आहेत, जी प्रत्‍येक प्रवासाला उत्‍साहित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत.

 

नवीन अॅटलास आर्किटेक्‍चर:

 

टाटा कर्व्‍ह नवीन अॅटलास आर्किटेक्‍चरवर डिझाइन करण्‍यात आले आहे, जे कंपनीच्‍या आयसीई वेईकल्‍ससाठी तयार करण्‍यात आलेले अॅडप्टिव्‍ह टेक फॉरवर्ड लाइफस्‍टाइल आर्किटेक्‍चर आहे. एसयूव्‍ही कार्यक्षमता व विविधतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाणारा क्रांतिकारी पाया असलेले हे प्रगत आर्किटेक्‍चर प्रगत एसयूव्‍ही क्षमतांपासून डायनॅमिक ड्राइव्‍ह व हाताळणीपर्यंत कर्व्‍हच्‍या प्रत्‍येक पैलूला सुधारित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, तसेच अनेक पॉवरट्रेन पर्याय, एैसपैस जागा आणि सर्वसमावेशक सुरक्षितता वैशिष्‍ट्ये देते. याव्‍यतिरिक्‍त, त्‍याचे मॉड्युलर स्‍वरूप स्‍केलेबिलिटीला देखील सपोर्ट करते, ज्‍यामुळे विविध बॉडी स्‍टाइल्‍स, टॉप हॅट्स आणि पॉवरट्रेन कन्फिग्‍युरेशन्‍सची खात्री मिळते.

 

हायपेरियन गॅसोलाइन डायरेक्‍ट इंजेक्‍शन इंजिन:

 

हायपेरियन गॅसोलाइन डायरेक्‍ट इंजेक्‍शन इंजिन हे टाटा मोटर्सने लाँच केलेले नवीन इंजिन आहे, जे स्‍पोर्टी व उत्‍साहवर्धक ड्राइव्‍हचा आनंद देते, ज्‍यामुळे कारउत्‍साहींसाठी आकर्षक निवड आहे. हायपेरियन इंजिन तीन प्रमुख पैलूंसह डिझाइन करण्‍यात आले आहे:

 

· हायपरफॉर्मन्‍स: गॅसोलाइन डायरेक्‍ट इंजेक्‍शन आणि दर्जात्‍मक टॉर्क घनतेसह टर्बोचार्जिंग व्‍यापक ऑपरेटिंग बँडमध्‍ये अधिक शक्‍ती देत हे संपादित केले जाते. हायपेरियन इंजिन ५००० आरपीएममध्‍ये ९१.९ केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि १७५०-३००० आरपीएममध्‍ये २२५ एनएम टॉर्क देते.

 

· हायपरटेक: हायपेरियन इंजिनमध्‍ये वापरण्‍यात आलेल्‍या अडवान्‍स्ड टेक्‍नॉलॉजीमध्‍ये ३५० बार फ्यूएल इंजेक्‍शन सिस्‍टम, व्‍हेरिएबल जिओमेट्री टर्बोचार्जर, सोडियम कूल्‍ड एक्झॉस्‍ट व्‍हॉल्‍व्‍ह्ज, मिलर सायकल कम्‍बशन चेम्‍बर, हायड्रॉलिक कॅम फेजिंगसह सेंट्रल ऑईल कंट्रोल व्‍हॉल्‍व्‍ह, एक्‍झॉस्‍ट आफ्टर ट्रीटमेंटसह गॅसोलाइन पार्टिक्‍युलेट फिल्‍टर आहे, जे इंजिनची कार्यक्षमता व प्रतिसादत्‍मकता वाढवते.

 

· हायपरक्‍वाइट: इंजिनचे एकूण एनव्‍हीएच बारकाईने कमी करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून उत्‍साहवर्धक व शांतमय प्रवासाची खात्री मिळते.

 

Curvv.ev आणि टाटा कर्व्‍हबाबत अधिक माहितीसाठी, कृपया प्रेस किटमध्‍ये शेअर केलेली उत्‍पादन टिप आणि तपशील पत्रक पहा.

 

 

*ऑल इंडिया एक्‍स-शोरूम किंमत | अटी व नियम लागू

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments