पुणे, १ ऑगस्ट २०२४:
पेयोनीयर ही वित्तीय तंत्रज्ञान कंपनी आहे. ह्या कंपनीतर्फे जगभरातील लहान-मध्यम-आकाराच्या व्यवसायांना आर्थिक व्यवहारांसाठी, व्यवसाय करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर सबळ करण्यासाठी तसेच सक्षम करण्यासाठी म्हणून, ३१ जुलै २०२४ ला
पेयोनीयर व्हीआयपी कनेक्ट च्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन, पुण्यातील शेरेटन हॉटेलच्या फोर पॉइंट्स येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयटी, वेब आणि ॲप डेव्हलपमेंट, प्रोग्रामिंग आणि तांत्रिक पाठबळ, सल्ला आणि व्यवस्थापन व डिजिटल मार्केटिंग आणि विक्री यासह विविध डोमेनमध्ये कार्यरत, सेवा निर्यात SMBs मधील ६५हून अधिक उद्योजक, संस्थापक आणि निर्णायक पदाधिकाऱ्यांना एकत्र आणले गेले. उपस्थितांना नेटवर्किंग करण्याची, आपल्या क्षेत्राबद्दल अधिक समजून घेण्याची आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विस्ताराबद्दल शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
हा कार्यक्रम पेयोनीयर एलिव्हेट च्या यशावर आधारित असून भारतातील पेयोनीयर चा आणखी एक उपक्रम आहे. हा उपक्रम, शहरांतील उद्योजक समुदायाला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उपस्थितांनी जागतिक विस्तारासाठी धोरणे, आंतरराष्ट्रीय पार्टनरशिपच महत्त्व, आंतरराष्ट्रीय पेमेंट आव्हानांवर मात करणे आणि जागतिक स्तरावर काम करताना कार्यक्षमतेवर कसा भर दिला अश्या विषयांवर चर्चा केली.
गौरव शिसोदिया, उपाध्यक्ष- पेयोनीयर इंडिया , यावेळी म्हणाले, “जागतिक मागणीचा फायदा घेत, एसएमबी कडे वृद्धी घडवण्याची मोठी संधी आहे. पेयोनीयर मार्फत, आम्ही सेवा निर्यात व्यवसायांमध्ये लक्षणीय वाढ पाहिली आणि उत्प्रेरित केली: २०१६ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत, ५४% ने वाढ झाली, एकूण प्रमाण आणि महसूल अनुक्रमे ८५% आणि ८८% च्या प्रभावशाली चक्रवाढ वार्षिक वृद्धी दराने ( वाढले आहेत.”भारतातील आमच्या अग्रगण्य बाजारपेठांपैकी, पुणे हे एक आहे. आमच्यासाठी, सर्वाधिक वाढ करणाऱ्या पहिल्या १० शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो.पेयोनीयर Connect च्या माध्यमातून, आम्ही शहरांतील व्यवसाय परिसंस्थेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहोत. हा उपक्रम शिक्षण, नेटवर्किंग तसेच सुविधा पुरवून व्यवसायांना समर्थन देतो. त्याचबरोबर डोमेन तज्ञांपर्यंत पोहोचणे व त्यांच्या आंतरराष्ट्रीय वाढीच्या संधींना गती देण्यास मदत करणे, हे ही साध्य होते,” ते पुढे म्हणाले.


