Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड- महापालिकेच्या वतीने ११ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करत ४० हजार रुपये...

पिंपरी -चिंचवड- महापालिकेच्या वतीने ११ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करत ४० हजार रुपये दंड वसूल

पिंपरी, दि. ९ ऑगस्ट २०२४ : शहरात कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील व्यावसायिक आस्थापना, गृह सोसायटी, तसेच विविध भागात तपासणी मोहीम राबवण्यात येत असून तपासणी करणाऱ्या पथकाद्वारे विविध ठिकाणी पाहणी करून ८ ऑगस्ट रोजी ११ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करत ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत डासोत्पत्ती केंद्र आढळलेल्या ३ बांधकाम व्यावसायिक आस्थापनांकडून प्रत्येकी १० हजार , २ व्यावसायिक आस्थापनांकडून प्रत्येकी २ हजार आणि ६ घरगुती आस्थापनांकडून प्रत्येकी १ हजार असे एकूण ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई उपआयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे व सहाय्यक आरोग्याधिकारी तानाजी दाते यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिंनवाल, आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, क्षितीज रोकडे, आरोग्य सहाय्यक संदिप राठोड, मुकादम देवनोल, हिरालाल चंडालिया व महापालिका कर्मचारी स्वप्नील साळुंखे, दिनेश शेंडगे यांच्या पथका मार्फत करण्यात आली.

 

किटकजन्य आजारांचा वाढता प्रादुर्भाव आणि डासोत्पत्तीची स्थाने नष्ट करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आवश्यक उपाययोजना करत आहे. महापालिकेमार्फत नेमण्यात आलेल्या पथकाला सहकार्य करून सर्व नागरिकांनी आपल्या घरात आणि घराजवळच्या परिसरात डासोत्पत्ती केंद्रे निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments