Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून पुण्‍यामधील रिटेल उपस्थितीमध्‍ये वाढ करत शहरामध्‍ये दुसऱ्या प्रिमिअम एक्‍स्‍पेरिअन्‍स स्‍टोअरचे उद्घाटन

सॅमसंगकडून पुण्‍यामधील रिटेल उपस्थितीमध्‍ये वाढ करत शहरामध्‍ये दुसऱ्या प्रिमिअम एक्‍स्‍पेरिअन्‍स स्‍टोअरचे उद्घाटन

पुणे, ऑगस्‍ट ६, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनीने महाराष्‍ट्रातील पुणे शहरामधील फिनिक्‍स मार्केटसिटी येथे नवीन प्रिमिअम एक्‍स्‍पेरिअन्‍स स्‍टोअरचे उद्घाटन केले आहे. हे स्‍टोअर विक्री व ग्राहकसेवेसंदर्भात ग्राहकांच्‍या गरजांसाठी एक-थांबा सोल्‍यूशन असेल. प्रमुख शॉपिंग गंतव्‍य पॅसिफिक मॉलमध्‍ये स्थित हे स्‍टोअर ग्राहकांना लक्षवेधक अनुभव देईल, तसेच त्‍यांची कनेक्‍टेड डिवाईस इकोसिस्‍टम – सॅमसंग स्‍मार्टथिंग्‍जना दाखवेल आणि अनेक सर्वसमावेशक क्रियाकलापांचे आयोजन देखील करेल.

 

एकूण २,००० चौरस फूट जागेवर विस्‍तारित हे स्‍टोअर ग्राहकांना सर्वोत्तम झोन्‍स देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यामध्‍ये स्‍मार्टफोन्‍स, लॅपटॉप्‍स, ऑडिओ, गेमिंग आणि स्‍मार्टथिंग्‍ज दाखवण्‍यात येतील. स्‍टोअरमध्‍ये सॅमसंग जनरेशन झेड व मिलेनियल ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या त्‍यांच्‍या ‘लर्न @ सॅमसंग’ उपक्रमाचा भाग म्‍हणून विविध गॅलॅक्‍सी वर्कशॉप्‍सचे आयोजन करेल. यामध्‍ये ग्राहकांच्‍या आवडी जसे उत्‍पादकता, डूडलिंग, फोटोग्राफी, फिटनेस आणि स्‍थानिक संस्‍कृतीला साजरे करणारे इव्‍हेण्‍ट्स यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या एआय शिक्षणाप्रती वर्कशॉप्‍सचा समावेश असेल.

 

स्‍टोअरमध्‍ये येणाऱ्या ग्राहकांना लिमिटेड पीरियड ऑफर म्‍हणून दुप्‍पट लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स (१५,००० रूपयांवरील सर्व व्‍यवहारांवर) आणि निवडक गॅलॅक्‍सी डिवाईसेसच्‍या खरेदीवर १९९९ रूपयांमध्‍ये गॅलॅक्‍सी फिट३ मिळेल.

 

तसेच, ग्राहक ऑल्‍वेज-ऑन स्‍पेशल फायद्यांचा देखील आनंद घेऊ शकतात, जसे आघाडीच्‍या बँकांकडून जवळपास २२.५ टक्‍के कॅशबॅक, विद्यार्थ्‍यांसाठी स्‍मार्टफोन्‍स, लॅपटॉप्‍स व स्‍मार्टवॉचेसवर जवळपास १० टक्‍के सूट आणि निवडक वस्तूंवर जवळपास २१,००० रूपयांचे इकोसिस्‍टम फायदे.

 

”पुणे आणि आसपासच्‍या बाजारपेठांमधील ग्राहकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाल्‍यानंतर आम्‍हाला आशा आहे की, आमचे नवीन स्‍टोअर देखील ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल आणि ग्राहकांसोबतचे आमचे संबंध अधिक दृढ करण्‍यास मदत करेल. नवीन स्‍टोअर त्‍यांना सर्वांगीण उत्‍पादन आणि सेवा अनुभवांचा आनंद देते. एआय शिक्षणाला चालना देण्‍यासाठी मोठ्या ‘लर्न @सॅमसंग’ उपक्रमांतर्गत गॅलॅक्‍सी वर्कशॉप्‍सचे देखील आयोजन करण्‍यात येईल,” असे सॅमसंग इंडियाच्‍या डी२सी बिझनेसचे उपाध्‍यक्ष सुमित वालिया म्‍हणाले.

 

नवीन स्‍टोअर सॅमसंग स्‍टोअर+ एंडलेस एसल प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून फिजिटल अनुभव देईल. स्‍टोअर+ सह ग्राहक ऑनलाइन किंवा स्‍टोअरमध्‍ये डिजिटल किओस्‍कचा वापर करत १,२०० सॅमसंग उत्‍पादने ब्राऊज करू शकतील आणि उत्‍पादने प्रत्‍यक्ष घरपोच डिलिव्‍हर केली जातील.

 

ग्राहक गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स, टॅब्‍लेट्स आणि स्‍मार्टवॉचेससाठी सॅमसंगचा डिजिटल लेण्डिंग प्‍लॅटफॉर्म सॅमसंग फायनान्‍स+ व सॅमसंग केअर+ प्‍लॅन्‍सचा देखील आनंद घेऊ शकतात. स्‍टोअर स्‍मार्टफोन्‍ससाठी विक्री-पश्‍चात्त सेवा आणि सर्व ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स गरजांसाठी होम सर्विस कॉल्‍स बुक करण्‍याची सुविधा देखी

ल देते.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments