Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणेकरांच्या वतीने सीमेवरील सैनिकांसाठी सव्वा लाख राख्या सैनिक मित्र परिवार आणि...

पुणेकरांच्या वतीने सीमेवरील सैनिकांसाठी सव्वा लाख राख्या सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजन : राख्यांचे पूजन करून टपालाने राख्या सैनिकांसाठी रवाना

पुणे : सैनिक देशाच्या सीमांचे संरक्षण करीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र पहारा देतात. या सैनिकांना भाऊ मानणाऱ्या पुण्यातील बहिणी सव्वा लाख राख्या सीमेवरील सैनिकांना पाठवणार आहेत. भारत मातेच्या जयघोषात सैनिकांसाठी प्रार्थना करत या राख्यांचे पूजन करण्यात आले.

 

सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांतर्फे पाठवण्यात येणाऱ्या राख्यांचे पूजन श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे करण्यात आले होते. सुनिता राजे पवार, विभावरी बडवे, मीनाक्षी गुरव यांच्या हस्ते राखींचे पूजन करण्यात आले त्यानंतर या राख्या टपालाने सीमेवरील सैनिकांना पाठवण्यात आल्या. यावेळी सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, ॲड. प्रताप परदेशी, ॲड. रजनी उकरंडे, ॲड. शिवराज कदम जहागीरदार, सारंग सराफ यावेळी उपस्थित होते. सैनिकांसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे देखील पाठविण्यात आली.

 

फरासखानाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त नूतन पवार, वीरमाता गीता गोडबोले, भाजपा शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट, मनसे महिला शहराध्यक्ष वनिता वागस्कर, साहित्य परिषदेच्या सहकार्यवाह सुनिता राजे पवार, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सरचिटणीस मीनाक्षी गुरव, रमणबागेच्या मुख्याध्यापिका चारुता प्रभूदेसाई, रामराज्य सहकारी बँकेच्या नंदा लोणकर, पुष्पा कनोजिया यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

 

ललित आगवणे, रोहन कापसे, गिरीश पोटफोडे, नंदा पंडित, कल्याणी सराफ यांनी आयोजनात सहभाग घेतला.

 

आनंद सराफ म्हणाले, भारतीय सण हे नाती दृढ करणारे आहेत. देशाच्या सीमा भागात प्रत्येक रेजिमेंटमध्ये राख्या पाठविल्या जातात. राख्या पोहोचल्यावर सर्वधर्मीय देव देवतांसमोर पूजन करून सैनिकांच्या पोलादी मनगटावर राखी बांधली जाते. अनेकदा उत्तर म्हणून सैनिक पत्र आणि भेटवस्तू देखील पाठवतात. सन १९९८ पासून सरहदीवरील सैनिकांना राख्या पाठविल्या जाता

त.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments