पुणे 14 ऑगस्ट २०२४ : ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे विद्या वाहिनी उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे उत्तरप्रदेश आणि हरियाणा मधील दुर्गम भागातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील ज्ञान व कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. विद्या वाहिनी हा उपक्रम भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत आहे. या द्वारे दुर्गम भागातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केला जातो, ज्यामुळे तरुण तंत्रज्ञानात प्रगती करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज होतील.


