Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedआधुनिकतेकडे जाताना*    *संस्कारांच्या उंबरठ्यावर*...

आधुनिकतेकडे जाताना*    *संस्कारांच्या उंबरठ्यावर*…

 

 

येत्या काही वर्षांच्या कालावधीनंतर आपल्या अगोदरची जाणती पिढी या जगाचा निरोप घेऊन कायमचा विसावा घेणार. हे त्रिकालसत्य पण त्यांच्या जाण्यानंतर त्या पिढीसोबत खूप काही जाणार त्याची भरपाई पुढील कोणतीच पिढी करू शकणार नाही. प्रचंड मायेची ऊब घेऊन वावरणारी ही मंडळी आपल्या आधुनिक पिढीपेक्षा सर्व प्रकारे वेगळी होती ! रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून देवपूजा करणारी , अन्नधान्य वाया न जावू देता शिळ्या अन्नाला पुन्हा नटवून खाणारी , भूमी (माती) ला खरंच आई मानून तिची देवपूजा करणारे , जुना झालेला चष्मा चिकटवून वापरणारी , तुटलेली चप्पल स्वतःच शिवणारी, रस्त्यातून जाता-येता एकमेकांची विचारपूस करणारी, सणवार यांची व्यवस्थित माहिती ठेऊन ते आस्थेने साजरी करणारी, मानवदेह परोपकारासाठी असून परहित साधताना आत्मक्लेश सोसावा लागला तरी परवा न करणारी….

अशा असंख्य चांगल्या सवयी बाळगणारी ही पिढी हळूहळू आपला निरोप घेऊन या सवयी कायमच्याच विस्मृतीत ढकलत आहे. या पिढीसोबत त्यांच्या सवयी त्यांचं नेतृत्व , कर्तुत्व त्यांची शिकवण जगण्यातला साधेपणा , समाधानी आयुष्य , परोपकारी भावना हे सर्वच लोप पावेल.

आणि नंतर फक्त राहील स्वार्थ , असंवेदनशीलता , अविश्वास , भकास कोडगेपण , मोबाईलवरचं जग कृत्रिम अगत्य आणि आभासी जीवन.

 

*संस्कारांची शिदोरी*

 

संस्कारांची आणि परंपरेची मांदियाळी असलेली ही पिढी आमच्या भाग्याला लाभली आणि आयुष्याचं पसायदान झालं.

 

*स्व.विमल विठ्ठल आप्पाजी जगताप* यांस समर्पित…

 

– *शुभम महेंद्र शिंदे*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments