Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोतीबागेत ध्वजवंदन* 

मोतीबागेत ध्वजवंदन* 

 

पुणे : भारतीय संस्कृती संवर्धन संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाच्या वतीने मोतीबाग येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याणी नामजोशी यांनी ध्वजवंदन आणि भारत माता पूजन केले. याप्रसंगी भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी व कसबा भाग संघचालक अॅड प्रशांत यादव उपस्थित होते.

यावेळी नामजोशी यांनी देशात पुन्हा रामराज्य यावे. धर्म म्हणजे सत्य वचन असून रामराज्याची व्यवस्था म्हणजे प्रजेचे शासन असावे. प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा देशातील भक्तीभावाला जागृत करणारी आणि त्रेतायुगाला पुन्हा प्रस्थापित करणारी ठरली आहे. समाज हेच त्याचे विराटरूप आहे.समाजरूपातच देव जन्म घेत असतो. नागपूरातील रेशीम बाग आणि पुण्यातील मोतीबाग हे काशी – मथुरे प्रमाणेच तीर्थक्षेत्र आहेत असे मत मांडले.

यावेळी एकता मासिकाच्या मणिपूर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) उपस्थित होते. त्यांनी मणिपूर मधील सद्य परिस्थिती तेथील पर्यटन आणि मणिपूरचे भारतातील विलीनीकरण याविषयी मनोगत व्यक्त केले.

कसबा भाग संघचालक ॲड. प्रशांतजी यादव यांनी देशातील स्थिती तसेच बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यातील परिस्थितीचे विवेचन केले. अखंड सावधानता बाळगणे हिंदू धर्मासाठी गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन राजीव वाल्हेकर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments