Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन

 

 

पुणे, दि.१६: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

शेतकऱ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महा-आयटीमार्फत लघु संदेश देण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात संबंधित सहकारी, राष्ट्रीयकृत बँकांनी देखील शेतकऱ्यांना व्यक्तीश: कळविण्याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सूचित करण्यात आले आहे.

 

लाभासाठी पात्र ठरलेले आणि त्याअनुषंगाने विशिष्ठ क्रमांक देण्यात आलेले, परंतु आधार प्रमाणीकरण झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेची संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असेही पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश जगताप यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments