राष्ट्रीय, १६ ऑगस्ट २०२४ – तमिलनाड मर्चंटाइल बँक (टीएमबी) या खासगी क्षेत्रातील प्रसिद्ध आणि जुन्या बँकेला श्री. साली एस. नायर यांची व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर (एमडी आणि सीईओ) नियुक्ती जाहीर करताना आनंद होत आहे. ही नियुक्ती बँकेत रूजू होण्याच्या तारखेपासून तीन वर्षांसाठी असेल.
या नियुक्तीविषयी श्री. साली म्हणाले, ‘तमिळनाड मर्चंटाइल बँकेमध्ये आताच्या महत्त्वाच्या क्षणी या पदावर रूजू होताना मला आनंद होत आहे. बोर्ड, व्यवस्थापन गट आणि सर्व कर्मचाऱ्यांसह माझ्या आधीच्या अधिकाऱ्यांनी घातलेल्या दमदार पायावर बँकेच्या भविष्यातील धोरणात्मक योजनांची आखणी करण्यास मी उत्सुक आहे.’
बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील ३५ वर्षांच्या अनुभवामुळे श्री. साली यांना दीर्घ ज्ञान आणि यशाचा वारसा लाभला आहे. या नियुक्तीपूर्वी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उपव्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख क्रेडिट अधिकारी पदावर काम केले आहे.
श्री. साली यांनी अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. १९८७ मध्ये भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूजू होत, त्यांनी प्रोबेशनरी अधिकारी पदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
गेल्या ३५ वर्षांत श्री. साली यांनी विविध पदांवर काम केले असून, त्यात प्रामुख्याने कॉर्पोरेट समूह, मोठ्या कॉर्पोरेट समूहांची हाताळणी, रिलायन्सचे विविध समूह (मुकेश समूह) आणि एस्सार समूह यांचा समावेश आहे. त्यांनी एसबीआयच्या दोन आंतरराष्ट्रीय बँकिंग समूहासाठी आधी न्यूयॉर्क, अमेरिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे काम केले आहे. बँकेच्या राजस्थान व पश्चिम उत्तर प्रदेशातील शाखांच्या व्यवस्थापनाच्या निमित्ताने त्यांनी रिटेलचाही अनुभव घेतला आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूरच्या एसबीआयमधील विलीनीकरण प्रक्रियेत ते सहभागी होते.
श्री. साली यांना बँकेसाठी अडचणीच्या मालमत्तांचे व्यवस्थापन करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. जुलै २०१७ मध्ये त्यांनी बँकेच्या स्ट्रेस्ड असेट विभागाच्या प्रमुख व्यवस्थापक पदाची सूत्रे स्वीकारली होती. या पदावर असताना आयबीसी/कॉम्प्रमाइज/एआरसी विक्री मार्गाने पुनर्रचना करत, एनपीपी निराकरण करण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्याकडे होती.
एप्रिल २०२० मध्ये श्री. साली यांनी स्ट्रेस्ड असेट रिझोल्युशन समूहात उपव्यवस्थापकीय संचालक पदाचे स्थान स्वीकारले व सप्टेंबर २०२१ पर्यंत ते कार्यरत होते. त्यानंतर, त्यांनी सप्टेंबर २१ ते जुलै २२ दरम्यान एसएमई, शेती आणि आर्थिक सर्वसमावेशकता विभागाच्या उपव्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली.
मे २०२४ पर्यंत ते एसबीआयमध्ये डीएमडी आणि प्रमुख क्रेडिट अधिकारी पदावर कार्यरत होते व क्रेडिट श्रेणी व्यवस्थापनाची जबाबदारी त्यां
च्याकडे होती.


