*ठाणे दि.17 (जिमाका) :* “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा” राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमाचे पुणे येथून थेट प्रेक्षपण “ठाणे गडकरी रंगायतन” तलावपाळी, ठाणे येथे दाखविण्यात आले. यावेळी ठाण्यात महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहण्यास मिळाला.
या कार्यक्रमांचे थेट प्रेक्षपण पाहण्यासाठी या ठिकाणी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, अध्यक्ष मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना अध्यक्ष राम रेपाळे, श्रीमती लता पाटील, सदस्य भरत चव्हाण, वनिता गोतपगार, अरुणा पेंढारे, सुवर्णा खिल्लारी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, नगरपरिषद संचालक मनोज रानडे, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, अनघा कदम, उमेद प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, जिल्हा महिला व बालविकास विभाग अधिकारी महेंद्र गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संजय बागूल आदी मान्यवर उपस्थित होते.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ठाणे जिल्हातून 5 लाख 49 हजार 56 अर्ज प्राप्त झाले आहेत.यापैकी 3 लाख 60 हजार लाभार्थी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले आहेत.
ठाण्यातील महिलांनी याप्रसंगी रक्षाबंधनसाठी भाऊ म्हणून आमच्या खात्यात पैसे पाठवले यासाठी मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानले असून या महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही महिला खूप आंनदी आहोत, असे मत यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण ठाणे जिल्हयातील सर्व महानगरपालिका व नगरपरिषद येथे दाखविण्यात आला. तेथेही महिलांची उत्स्फूर्त गर्दी पाहण्यास मिळाली.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या पुण्यातील वचनपूर्ती कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, अनघा कदम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) श्री.संजय बागूल यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र पाटणकर यांनी केले.


