Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedठाण्यातील कळवा येथील सहकार विद्याप्रसारक मंडळाची माध्यमिक प्रशाला आणि कळसूळ येथील कळसुळी...

ठाण्यातील कळवा येथील सहकार विद्याप्रसारक मंडळाची माध्यमिक प्रशाला आणि कळसूळ येथील कळसुळी हायस्कूल यांच्या विद्यार्थ्यांनी जिंकली राष्ट्रीय स्टेम चॅलेंज २०२३-२४ साठीची झोनल फेरी

 

 

पुणे, १७ ऑगस्ट २०२४ : ठाण्यातील कळवा येथील सहकार विद्याप्रसारक मंडळाची माध्यमिक प्रशाला आणि कळसूळ येथील कळसुळी हायस्कूल यांच्या विद्यार्थ्यांनी ‘ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज २०२४’च्या विभागीय (झोनल) फेरीत विजय मिळवला आहे. या स्पर्धेचे आयोजन ब्रिलिओ या कंपनीने केले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टेम शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या स्टेम लर्निंग या सामाजिक संस्थेनेही या आयोजनात भाग घेतला.

 

पुण्यातील ब्रिलिओच्या कार्यालयात झालेल्या विभागीय फेरीनंतर या विद्यार्थ्यांचे यश साजरे करण्यात आले. ‘स्टेम लर्निंग’च्या चमूने आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मोठे कौतुक केले. हे विजेते आता २७ ऑगस्ट २०२४ रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत भाग घेतील. विभागीय फेरीपूर्वी देशभरात ९९ क्लस्टर्स फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. विभागीय फेऱ्या दिल्ली, पुणे, कोलकता, बंगळुरू व सिंग्रौली येथे आयोजित करण्यात आल्या. या विभागीय फेऱ्यांमधील ५ विजेत्या संघांना आता बंगळुरू येथे २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत भाग घेता येईल.

 

स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) या विषयांमधील विविध उपक्रम यापुढे वर्भभर घेतले जाणार आहेत. त्यांची सुरुवात या स्पर्धेच्या निमित्ताने झाली. यामध्ये विज्ञान आणि गणित मॉडेल स्पर्धा, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांची तोंडओळख यांचा समावेश होता. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, नावीन्य आणि डिझाइन विचारविषयक कौशल्ये वाढवण्याच्या दृष्टीने ही नॅशनल स्टेम चॅलेंज डिझाइन केलेली आहे. विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी कोणतीही असली, तरी ते या स्पर्धेसाठी पात्र असतात.

 

संपूर्ण भारतातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना एक उत्कृष्ट असा स्टेम शिक्षणाचा मंच प्रदान करणारी ‘ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज’ ही एक विशिष्ट राष्ट्रीय स्पर्धा आहे. युवकांमध्ये स्टेमविषयक कौशल्ये रुजविण्यास ब्रिलिओ कटिबद्ध आहे. ही स्पर्धा त्याचाच एक भाग आहे.

 

या प्रसंगी ‘स्टेम लर्निंग’चे संस्थापक आशुतोष पंडित म्हणाले, “नॅशनल स्टेम चॅलेंजच्या चौथ्या आवृत्तीमधील विभागीय फेऱ्यांचा समारोप यशस्वीपणे झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आता आम्ही बंगळुरू येथे अंतिम फेरीत जाण्यास उत्सुक आहोत. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह आणि समर्पण पाहणे खरोखरच प्रेरणादायी आहे; कारण त्यांनी स्पर्धेत सर्वोत्तम प्रयत्न केले. ‘के-ट्वेल्व्ह’ शिक्षण सक्षम बनवण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यास स्टेम लर्निंग समर्पित आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण व्यक्त होण्यास संधी देतो. आमची विज्ञान केंद्रे जिथे स्थापित आहेत, तिथे हे उपक्रम आम्ही राबवितो.”

 

स्टेम लर्निंग ही भारतभर स्टेमचे शिक्षणाचा प्रसार करण्यास समर्पित असलेली एक अग्रणी संस्था आहे. देशभरातील ४,००० हून अधिक शाळांमध्ये ती काम करते. तसेच, सुमारे ३०० हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कॉर्पोरेट सीएसआर उपक्रमांच्या सहभागातून ‘स्टेम लर्निंग’ने सरकारी शाळांमध्ये विज्ञान केंद्रे, विज्ञान प्रयोगशाळा आणि टिंकर लॅब स्थापन केल्या आहेत. अशा प्रकारे दहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून, भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि नवोन्मेषकांच्या पुढच्या पिढीला सक्षम बनवण्यासाठी स्टेम लर्निंग योगदान देत आहे.

 

पनवेलच्या विठोबा खंडाप्पा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रित शेळके याप्रसंगी म्हणाला, “नॅशनल स्टेम चॅलेंजमध्ये भाग घेणे हा माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी एक अविस्मरणीय असा प्रवास होता. वास्तविक-जगातील समस्या सोडविण्याचे कोणतेही स्वप्न फार मोठे नसते, हे या स्पर्धेने आम्हाला दाखवून दिले. या स्पर्धेने आमचे डोळे उघडले आणि नावीन्यता आणि शिक्षण यांच्याबद्दल आमच्या मनात आयुष्यभरासाठी आस्था निर्माण केली. या अनुभवासाठी आम्ही ब्रिलिओ, स्टेम लर्निंग आणि आमच्या मार्गदर्शकांचे मनापासून आभारी आहोत. येथे मिळालेले ज्ञान व कौशल्य यांच्या आधारे आम्ही जगाचा सामना करण्यास आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सतत विकसित होत असलेल्या क्षेत्रात योगदान देण्यास तयार झालो आहोत.”

 

विजेते

विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे :

विज्ञान व गणित मॉडेल मेकिंग स्पर्धा:

प्रथम क्रमांक

शाळेचे नाव: सहकार विद्याप्रसारक मंडळाची माध्यमिक शाळा, कळवा, ठाणे

विद्यार्थ्यांची नावे: १) भक्ती वरेकर, २) कृशान वाडेकर

 

 

 

द्वितीय क्रमांक

शाळेचे नाव: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय, सातारा

विद्यार्थिनींची नावे: १) अनुष्का कुदळे, २) सृष्टी कानडे

 

 

 

तृतीय क्रमांक

शाळेचे नाव: विठोबा खंडाप्पा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय

विद्यार्थ्यांची नावे: १) प्रित अनिल शेळके, २) प्रणव रविंद्र चोरगे

 

 

 

टेक आणि इंजिनिअरिंग टिंकरिंग स्पर्धा:

प्रथम क्रमांक

शाळेचे नाव: कळसुळी इंग्लिश स्कूल, कळसूळ

विद्यार्थ्यांची नावे: १) गिरीश मंगेश परब, २) रुद्र शिवाजी गुरव

 

 

 

द्वितीय क्रमांक

शाळेचे नाव: एस. डी. गणगे प्रशाला, त्रिवेणी नगर

विद्यार्थ्यांची नावे: १) ऋषिकेश कवळे, २) प्रतीक जगधने

 

 

 

तृतीय क्रमांक

शाळेचे नाव: नवदीप विद्यालय, गोवा

विद्यार्थ्यांची नावे: १) सैफुद्दीन शेख, २) श्रेया सुनील नाईक

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments