गुरूग्राम, भारत – 21 ऑगस्ट 2024: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज यंदा सणासुदीच्या काळापूर्वी 10 वॉशिंग मशिन्स लाँच करण्याच्या आपल्या योजनांची घोषणा केली. कंपनीने या महिन्याच्या शेवटी लाँच करण्यात येणाऱ्या आगामी फ्रण्ट-लोड एआय-पॉवर्ड वॉशिंग मशिन्ससाठी नुकतेच टीझर लाँच केले होते.
नवीन एआय-पॉवर्ड वॉशिंग मशिन्स भारतातील ग्राहकांसाठी कंपनीच्या होम अप्लायन्सेसच्या प्रीमियम बीस्पोक एआय श्रेणीचा भाग आहे, जी सुधारित कनेक्टीव्हीटी आणि वैयक्तिकृत अनुभवांसह इंटेलिजण्ट व सर्वोत्तम सोल्यूशन्स देते, जे स्मार्ट होम अनुभवामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यास सज्ज आहेत.
”यंदा सणासुदीच्या काळापूर्वी सॅमसंग एआय-पॉवर्ड वॉशिंग मशिन्सची उत्साहवर्धक मेड इन इंडिया लाइन-अप लाँच करणार आहे. नवीन लाइन अपमध्ये वॉशिंग प्रक्रियेच्या प्रत्येक पायरीवर फुली लोडेड एआय इनोव्हेशन्स असलेले 10 मॉडेल्स असणार आहेत. ही सिरीज लॉण्ड्री बाजारपेठेत गेम चेंजर असण्याची अपेक्षा आहे, तसेच सॅमसंग इंडियाच्या वॉशिंग मशिन्सचा एकूण पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात विस्तारित करेल,” असे सॅमसंग इंडियाने एका निवेदनामध्ये सांगितले.
कपडे धुण्यासाठी करावी लागणारी मेहनत कमी करत एआय-पॉवर्डच्या संपूर्ण श्रेणीमध्ये लवकरच लाँच करण्यात येणाऱ्या वॉशिंग मशिन्स आहेत, ज्या वापरकर्त्यांच्या जीवनशैलीला उत्साहित करण्यास सज्ज आहेत, असे सॅमसंग इंडिया सांगितले. तसेच ही श्रेणी उत्साहपर्ण अनुभवाची निर्मिती करेल, जो ‘स्मार्टर, अधिक कार्यक्षम आणि इको-फ्रेण्डली’ असेल.
सॅमसंगने यंदा एप्रिलमध्ये भारतातील ग्राहकांसाठी बीस्पोक एआय होम अप्लायन्सेसची 2024 श्रेणी लाँच केली होती. प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आणि स्मार्टथिंग्ज असलेली ही नवीन उत्पादने ग्राहक सोयीसुविधेमधील महत्त्वपूर्ण टप्प्याला सादर करतात, ज्याचे श्रेय हायपर-कनेक्टेड इकोसिस्टमला जाते.
बीस्पोक एआयमध्ये कंपनीचा ‘एआय फॉर ऑल’ दृष्टिकोन आहे, जो सर्वोत्तम सुरक्षिता, शाश्वतता आणि उपलब्धतेच्या माध्यमातून जीवन सुधारतो. एआय व्हिजन, एआय वॉईस आणि एआय डेटा तंत्रज्ञानांचा वापर करत सॅमसंग नवीन अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहे, ज्यामध्ये होम अप्लायन्सेस नियंत्रित करता येऊ शकतात, अधिक सर्वोत्तमपणे कनेक्ट करता येऊ शकतात आणि अधिक वैयक्तिकृत युजर अनुभव निर्माण करता येऊ शकतात.
दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या साध्या टूल्सपेक्षा सॅमसंगचे होम अप्लायन्सेस कार्यक्षमता, कनेक्टीव्हीटी आणि वैयक्तिककरणामधील नाविन्यतांच्या माध्यमातून वापरकर्त्यांची जीवनशैली सुधारण्याची खात्री देतात. ग्राहकांना घरातील दैनंदिन कामांवर कमी वेळ व्यतित करण्यास मदत करत रोजच्या जीवनाचा मुक्तपणे आनंद घेण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे. म्हणून एआयच्या माध्यमातून होम अप्लायन्सेसवर सुलभ नियंत्रण जसे हॅबिट लर्निंग आणि सेन्सिंग रोजची घरातील कामे अधिक सुलभ व सोपी करतात.
उदाहरणार्थ, नवीन एआय-पॉवर्ड सॅमसंग रेफ्रिजरेटर्ससह वापरकर्ते एआय व्हिजन इनसाइड वैशिष्ट्याच्या माध्यमातून फूड पॅकेजेसवरील एक्स्पायरेशन तारखा तपासू शकतात किंवा सॅमसंग फूडसह सानुकूल पाककला शिफारशी विचारू शकतात. वापरकर्ते स्मार्टथिंग्जमधील एआय एनर्जी सेव्हिंगसह ऊर्जा बचत करण्याच्या पद्धतीचा अनुभव घेऊ शकतात. स्मार्ट फॉरवर्ड वैशिष्ट्य सतत डिवाईस अपग्रेड्स देते. तसेच, सॅमसंग नॉक्ससह वापरकर्त्यांना त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेबाबत खात्री
मिळू शकते.


