• ग्राहक १ सप्टेंबर २०२४ पर्यंत मर्यादित काळासाठी न्यू फंड ऑफर(NFO) द्वारे १० रू प्रति युनिट दराने घेऊ शकतात.
• यूएलआयपी मध्ये प्रथमच निफ्टी ५०० मोमेंटम ५० इंडेक्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध
नवी दिल्ली ऑगस्ट २१, २०२४- मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (मॅक्स लाइफ/कंपनी) ने निफ्टी ५०० मोमेंटम ५० इंडेक्स फंड युएलआयपी सेगमेंट मध्ये आणला आहे. न्यू फंड ऑफर विंडो १ सप्टेंबर २०२४ पर्यंत खुली राहणार असून NFO काळापर्यंतच तो दहा रुपये प्रति युनिट दराने घेता येणार आहे.
हा फंड निफ्टी ५०० मोमेंटम ५० इंडेक्सचा मागोवा घेईल. त्यात निफ्टी ५०० इंडेक्समधील सर्वोच्च ५० कंपन्या त्यांच्या नॉर्मलाइज्ड मोमेंटम स्कोअरच्या आधारे निवडल्या जातील. प्रस्तावित फंड फ्लेक्सीकॅप आणि मोमेंटिंग इन्व्हेस्टिंग हे दोन लोकप्रिय गुंतवणूक दृष्टिकोन, एकत्र आणेल. मॅक्स लाइफच्या फंडांच्या संचात जानेवारी २०२४ मध्ये लॉन्च झालेल्या मिडकॅप मोमेन्टम इंडेक्स नंतर मोमेंटम इन्व्हेस्टिंग धोरणावर आधारित दुसरा फंड असेल. फंडाचा उद्देश फ्लेक्सीकॅप फंडांमध्ये वाढत्या रुचीचा फायदा घेणं आहे. ते बाजाराच्या हालचालीनुसार पुर्नस्थापित होतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना चक्रिय मार्केट कॅपिटलायझेशन परफॉरमन्सपासून संरक्षण मिळते. जून २०२४ पर्यंत, बेंचमार्क इंडेक्सच्या घटकांमध्ये ६० टक्के लार्ज कॅप, २७ टक्के मिड कॅप आणि १३ स्मॉल कॅप स्टॉक्सचा समावेश आहेत. ज्यामुळे संपत्ती निर्मितीसाठी चांगली विविधता मिळते.
निफ्टी ५० मोमेंटम ५० फंड हा मध्यम किंवा दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. “खरेदी करा, जास्त किंमतीवर विक्री करा” हे या फंडाचं धोरण असून सुरू असलेल्या ट्रेंड्सची ताळमेळ साधण्याचा उद्देश आहे, ज्यामुळे पारंपारिक इंडेक्स गुंतवणुकीच्या तुलनेत उच्च परतावा मिळण्याची शक्यता आहे.
मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी, सचिन बजाज म्हणाले, “गुंतवणुकीचे प्राधान्यक्रम अधिक गतिशील धोरणांकडे वळत असताना, मॅक्स लाइफचा निफ्टी ५० मोमेंटम ५० इंडेक्स फंड सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. मोमेंटम इन्व्हेस्टिंग धोरणाचा वापर करत,ओघवत्या गुंतवणूक प्रवाहा सोबत राहून भारतातील सर्वोच्च ५०० कंपन्यांमध्ये आधुनिक भारतीय ग्राहकांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक करण्यासाठी हा फंड योजण्यात आला आहे मॅक्स लाइफ मध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या आर्थिक उद्दिष्टांशी संलग्न असलेल्या नावीन्यपूर्ण आणि मजबूत सोल्यूशन्स देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
संपत्ती निर्मितीच्या संधींबरोबरच, जीवन विमा घटकामुळे आर्थिक सुरक्षितता मिळते. आकस्मिक घटनांपासून संरक्षण मिळतं आणि मनःशांती सुद्धा मिळते. निफ्टी ५० मोमेंटम ५० फंड विविध युएलआयपी उत्पादनांद्वारे उपलब्ध होईल, त्यात ऑनलाइन सेव्हिंग्स प्लॅन, शिक्षा प्लस सुपर, फ्लेक्सी वेल्थ अडव्हान्टेज प्लान, आणि कॅपिटल गॅरंटी सोल्यूशन्स्स यांचा समावेश आहे. NFO कालावधीनंतर, फंड मॅक्स लाइफच्या प्लॅटिनम वेल्थ प्लॅन, फास्ट ट्रॅक सूपर, फ्लेक्सी वेल्थ प्लस आणि स्मार्ट फ्लेक्सी प्रोटेक्ट सोल्यूशन यांच्याबरोबर देखील ऑफर केला जाईल. त्यामुळे विविध प्रकारच्या ग्राहकवर्गांना अनेक पर्याय उपलब्ध होतील.
लाइफ ने त्यांच्या युएलआयपी श्रेणीचा केला विस्तार, निफ्टी ५०० मोमेंटम ५० इंडेक्स फंड केला लाँच