गुरूग्राम, ऑगस्ट २२, २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (एचएमआयएल) आज आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझारसाठी बुकिंग्जच्या शुभारंभाची घोषणा केली. ६ व ७ सीटर प्रीमियम एसयूव्ही प्रवास अधिक उत्साहित करेल आणि भव्यता, आरामदायीपणा व सोयीसुविधा, प्रगत तंत्रज्ञान व सुरक्षितता वैशिष्ट्यांसह ग्राहकांना आनंदित करेल. ग्राहक भारतभरातील कोणत्याही ह्युंदाई डिलरशिपमध्ये किंवा https://clicktobuy.hyundai.co.in/#/bookACar?modelCode=AA या वेबसाइटवर क्लिक करत २५,००० रूपयांच्या सुरूवातीच्या बुकिंग रकमेसह आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार बुक करू शकतात.
बुकिंगला सुरूवात होण्याची घोषणा करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे पूर्ण-वेळ संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तरूण गर्ग म्हणाले, “ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडमध्ये आम्हाला भारतातील ग्राहकांना वैविध्यपूर्ण एसयूव्ही पोर्टफोलिओ देण्याचा अभिमान वाटतो. आम्हाला आमची प्रीमियम एसयूव्ही आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझारसाठी बुकिंग्जना सुरूवात करण्याचा आनंद होत आहे. भारतातील ७५,००० हून अधिक आनंदित ग्राहकांसह ब्रँड अल्काझारचे प्रशस्त इंटीरिअर्स, आरामदायीपणा व सोयीसुविधा वैशिष्टये आणि विश्वसनीय कार्यक्षमतेसाठी प्रशंसा करण्यात आली आहे. रस्त्यावरील लक्षवधेक उपस्थिती, प्रीमियम इंटीरिअर्स, प्रगत तंत्रज्ञान आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये असलेली आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार एसयूव्ही विभागातील आरामदायीपणा, लक्झरी व वैविध्यतेमध्ये अधिक वाढ करण्याची खात्री देते. आम्हाला विश्वास आहे की, आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार अपेक्षांची पूर्तता करेल आणि ग्राहकांना अद्वितीय मूल्य तत्त्वे देईल.”
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड ग्राहकांना अपवादात्मक गतीशीलता अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहे. आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझारसाठी टॅगलाइन ‘इंटेलिजण्ट. व्हर्साटाइल. इण्टेन्स’मध्ये एसयूव्हीची खासियत सामावलेली आहे. इंटेलिजण्ट – एसयूव्हीमध्ये स्मार्ट तंत्रज्ञान दिसून येते, ‘व्हर्साटाइल’ एैसपैस जागा, सीटिंग आणि सहजपणे विविध प्रदेशांमध्ये हाताळणी करण्याच्या क्षमतेसंदर्भात एसयूव्हीच्या व्यापक कार्यक्षमतेला सादर करते आणि ‘इण्टेन्स’मधून एसयूव्हीचा आकर्षक स्टान्स दिसून येतो, जो या वेईकलला इतरांपेक्षा वरचढ ठरवतो आणि रस्त्यावर विशिष्ट उपस्थिती देतो.
आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझारच्या करिष्माई डिझाइनमध्ये नीडर स्टान्स व प्रबळ आकर्षकता समाविष्ट आहे, तसेच फ्रण्ट डिझाइन घटकांसह नवीन बम्पर, हूड डिझाइन, स्किड प्लेट आणि डार्क क्रोमे ग्रिल एसयूव्हीच्या आकर्षकतेमध्ये अधिक भर करतात. नवीन एच शेप्ड एलईडी डीआरएल आणि क्वॉड बीम एलईडी हेडलॅम्प्स रस्त्यावर विशिष्ट उपस्थितीची खात्री देतात, ज्याला पूरक नवीन आर१८ (व्यास = ४६२ मिमी) डायमंड कट अलॉई व्हील डिझाइन, ब्लॅक पेण्टेड क्लॅडिंग आणि ब्रिज टाइप रूफ रेल्स आहेत.
अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आणि वैविध्यता लक्षात घेत डिझाइन करण्यात आलेली आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार ग्राहकांना लक्षवेधक पॅकेज देते. रिअर लुक एसयूव्हीला व्यापक, उंच व भावी अपील देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. नवीन सिग्नेचर कनेक्टेड एलईडी टेललॅम्प्स, नवीन टेलगेट, नवीन स्पॉइलर डिझाइनसोबत एकीकृत स्टॉप लॅम्प आणि नवीन बम्पर व स्किड प्लेट डिझाइनसह आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार आधुनिक एसयूव्हीच्या अद्वितीय पैलूला सादर करते.
हाय-टेक व आकर्षक इंटीरिअर्स केबिनमध्ये अपमार्केट व डायनॅमिक फील देतात, ज्यामधून एैसपैस जागा, आरामदायीपणा व आधुनिकतेचा अनुभव मिळतो. ६ व ७ सीटर प्रीमियम एसयूव्ही साहसी प्रवासाचा आनंद घेणाऱ्यांसाठी, तसेच शहरी प्रवासासाठी अनुकूल निवड आहे.
आकर्षक डिझाइन व भावी तंत्रज्ञानाचे सुसंगत समन्वय निर्माण करत आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझारमध्ये सुधारित ड्रायव्हिंग अनुभवासाठी प्रगतीशील तंत्रज्ञान आहे. आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझारमध्ये ७० हून अधिक कनेक्टेड कार वैशिष्ट्ये आहेत, ज्यामधून प्रभावी व आनंददायी ड्रायव्हिंग अनुभवाची खात्री मिळते.
आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझारमध्ये पसंतीचे कार्यक्षम पॉवरट्रेन्स असतील, जेथो १.५ टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिनसह ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ७-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) आहे. एसूयव्ही ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या १.५ यू२ सीआरडीआय डिझेल इंजिनसह देखील येईल.
सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार अनेक प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्यांसह येते. ४० प्रमाणित सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि एडीएएससोबत ७० हून अधिक एकूण सुरक्षितता वैशिष्ट्ये असलेली प्रीमियम एसयूव्ही प्रवाशांना उच्च दर्जाची सुरक्षितता देईल. आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार उद्योगामध्ये एसयूव्ही प्रभुत्वाच्या भावी युगाला सादर करण्यास सज्ज आहे.
आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार ग्राहकांच्या पसंतींना नव्या उंचीवर घेऊन जाते, नवीन रॉबस्ट एमेराल्ड मॅटसह ९ आकर्षक रंगांची लक्षवेधक श्रेणी देते. ४ विशिष्ट व्हेरिएण्ट्स – एक्झिक्युटिव्ह, प्रेस्टिज, प्लॅटिनम आणि सिग्नेचरसह ही वैविध्यपूर्ण एसयूव्ही प्रत्येक सूक्ष्मदर्शी पसंतीची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी www.hyundai.co.in
येथे लॉग ऑन करा.


