पुणे, दि. २६ : येत्या 31 ऑगस्ट रोजी असलेल्या ‘काँक्रिट दिना’चे औचित्य साधून महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मध्ये ‘काँक्रिट या विषयावरील आर्किटेक्चर आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. बीएनसीएच्या सभागृहात सकाळी नऊ ते बारा या दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व अल्ट्राटेक सिंमेटने केले आहे. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप आणि उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे यांच्या प्रोत्साहनातून ही स्पर्धा आयोजित केली आहे.
बीएनसीएतील काँक्रिट विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे आयोजन विभागप्रमूख प्रा.डॉ. सुजाता मेहता, प्रा. कांचन अतनूरकर, प्रा. प्रीती नामजोशी आणि प्रा. स्वप्नील शिंदे यांनी केले आहे. या स्पर्धेत आर्किटेक्चर शिकवल्या जाणाऱ्या सर्व शिक्षण संस्थांमधील द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सांघिक स्वरूपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काँक्रिट दिन साजरा करण्यासाठी आर्किटेक्चरचे शिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिकवणारा प्राध्यापक वर्ग आणि व्यावसायिकांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याचे डॉ. सुजाता मेहता आणि प्रा. कांचन अतनूरकर यांनी सांगितले.
बांधकाम क्षेत्रातील काँक्रिटचे महत्व लक्षात घेता अल्ट्राटेक सिमेंटची विविध उत्पादने आणि काँक्रिट या माध्यमातील नाविन्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शनही बीएनसीएच्या तळमजल्यावर 29 ते 31ऑगस्ट दरम्यान भरवण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: डॉ. सुजाता मेहता: 9970171964 आणि प्रा. कांचन अतनूरकर: 909
6770727.


