Friday, November 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedगीतांतून उलगडला महात्मा फुले यांच्या प्रबोधनाचा वारसा* महाराष्ट्र...

गीतांतून उलगडला महात्मा फुले यांच्या प्रबोधनाचा वारसा* महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने शाहिरी जलशाचे आयोजन

 

 

पुणे : शिक्षणातून माणसाला विचारांची दिशा मिळते आणि प्रबोधनातून समाजपरिवर्तनाचा मार्ग खुला होतो, हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेला विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांच्या याच विचारांचा वारसा शाहिरी गीतांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न शाहिरी जलशातून करण्यात आला.

 

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने ‘महात्मा ज्योतिबा – वारसा प्रबोधनाचा…’ या संकल्पनेतून मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधीक्षक जान्हवी जानकर, माळी महासंघाचे अध्यक्ष दीपक जगताप आदी उपस्थित होते.

 

महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रीशिक्षण, बहुजन समाजाचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन तसेच शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचा विचार त्यांनी कृतीतून मांडला. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा त्यांनी दिलेला हा वारसा लोककला, शाहिरी आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.

 

कार्यक्रमाची प्रस्तावना संयोजक निलेश धायरकर यांनी केली. महापुरुषांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

 

शाहिरी जलशामध्ये युवा शाहीर श्रीकांत शिर्के, सामाजिक कार्यकर्ते संदीप मोरे, सुरेश पवार आणि सहकलाकारांनी विविध गीतांच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर केला. पोवाडे, लोकगीते आणि प्रभावी सादरीकरणातून सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी रणसिंग यांनी केले, तर अक्षय मुळे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments