मुंबई, 22 ऑगस्ट 2024
ॲथलेटिक्स किड्स कप हा लहान मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी एक नवीन ग्रासरूट क्रीडा उपक्रम आहे. Dspowerparts, UBS च्या सहकार्याने स्वित्झर्लंडमधील ॲथलेटिक्स उत्साही संघाने सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश मुलांमध्ये शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देणे आणि शहरी भारतीय मुलांमधील बालपणातील लठ्ठपणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यास मदत करणे हा आहे. ॲथलेटिक्स किड्स कप मुंबईत सुरू होत आहे आणि हजारो मुलांना याकडे वळविण्याचे उद्दिष्ट आहे. शाळांनी आता ॲथलेटिक्स किड्स कपसाठी नोंदणी करावी.
साधी संकल्पना – प्रचंड प्रभाव
ॲथलेटिक्स किड्स कप तीन मूलभूत हालचालींवर केंद्रित आहे – धावणे, उडी मारणे, फेकणे. जवळजवळ प्रत्येक खेळात या तीन गोष्टी आवश्यक असतात आणि त्यासाठी विशेष ॲथलेटिक्स सराव लागतो. या उपक्रमात ट्रायथलॉन-शैलीतील स्पर्धा आहे, ज्यामध्ये 60 मीटर धावणे, लांब उडी आणि बॉल थ्रो यांचा समावेश आहे आणि ही स्पर्धा 7 ते 15 वर्षे वयोगटांतील सर्व स्तरांतील मुले आणि तरुणांसाठी खुली आहे.
खेळ, विशेषत: ॲथलेटिक्स हे वैयक्तिक विकास, आरोग्य संवर्धन आणि सामाजिक समंजसता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, या विश्वासाने तयार केलेला ॲथलेटिक्स किड्स कप हे तरुण सहभागींसाठी चारित्र्य, मूल्ये, सचोटी, परस्पर आदर आणि शिस्त निर्माण करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ आहे. मुलांना स्वत:मधून सर्वोत्तम मिळविण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांच्या स्वत:च्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
विशेषत: मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने भारत आरोग्य संकटाच्या उंबरठ्यावर आहे. संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देऊन या समस्येचा सामना करण्यास मदत करणे हे अॅथलेटिक्स किड्स कपचे उद्दिष्ट आहे.
शाळांवर लक्ष
पहिल्या सत्रात (2024/2025) ॲथलेटिक्स किड्स कप मुंबईवर लक्ष केंद्रित करेल. स्पर्धा स्वतंत्रपणे आयोजित करण्यासाठी आवश्यक साहित्य असलेल्या रेडी टू यूज टूलकिटच्या साहाय्याने शाळा स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यासाठी शाळा मुख्य सक्षम असतील. यामध्ये स्पर्धा साहित्य, बिब क्रमांक, सहभागाचे प्रमाणपत्र किंवा संपूर्ण हँडबुक यांसारखे साहित्य असेल. Dspowerparts आणि त्यांचे भागीदार Striders सर्व शाळांना उपक्रमात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आवश्यक मदत व सल्ला उपलब्ध करून देतील.
इच्छुक खेळाडूंसाठी व्यासपीठ
मुलांची पार्श्वभूमी किंवा प्रतिभा कशीही असली तरी त्यांची हालचाल घडवून आणणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ॲथलेटिक्स किड्स कपमध्ये महत्त्वाकांक्षी खेळाडूंसाठी योग्य व्यासपीठ म्हणून विकसित होण्याची क्षमता आहे. या उपक्रमात तीन-टप्प्यांची स्पर्धा रचना आहे. शालेय स्पर्धेत भाग घेतल्यानंतर, सर्वात हुशार मुली आणि मुले जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या मुंबईतील पाच विभागीय फायनलपैकी एकासाठी पात्र ठरू शकतात आणि प्रत्येक वयोगटातील अव्वल 30 खेळाडूंना त्यांची टॅलेंट सिद्ध करण्याची संधी मिळेल. 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ग्रँड फिनालेचा भाग होता येईल. या स्पर्धा व्यावसायिक पद्धतीने आयोजित केल्या जातील, ज्यामुळे पात्र तरुण खेळाडूंना अविस्मरणीय अनुभव मिळेल.
2025/2026 च्या हंगामासाठी विस्ताराची योजना
याच्या विस्ताराची तयारी सुरू आहे. येत्या काही महिन्यांत पुणे आणि हैदराबाद येथे प्रायोगिक तत्वावर सुरूवात केली जाईल. त्यानंतर 2025/2026 हंगामात या दोन शहरांमध्ये ऍथलेटिक्स किड्स कपचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे. तळागाळातील उपक्रमाचा भारतातील इतर भागांमध्ये प्रसार करण्यासाठी आणि भारतीय मुलांमध्ये निरोगी सवयी आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी हा विस्तार आणखी एक पाऊल ठरेल.
UBS मुळे हे शक्य
UBS या स्वित्झर्लंड-आधारित बँकेच्या पाठिंब्यामुळे ॲथलेटिक्स किड्स कप लाँच करणे हे शक्य झाले आहे. या बँकेचे भारताशी तीन दशकांपासून मजबूत नाते आहे. UBS प्रेरक कार्यक्रमांद्वारे समाजाचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम आणि एकूणच कल्याण त्यातून साधले जाते. विद्यार्थ्यांना त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यास सक्षम करतात. भारताच्या तरुण पिढीच्या विकासात आणि यशामध्ये योगदान देण्यासाठी UBS च्या चालू असलेल्या प्रयत्नांमध्ये ॲथलेटिक्स किड्स
कप हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.


