पुणे, दि. २९: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व नॅशनल स्कील डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित कौशल्य विकास केंद्राचे ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा. शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतन, बहिरट पाटिल चौक, गोखले रस्ता, शिवाजीनगर येथे उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित राहणार आहेत, असे शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी कळविले आहे.
0000


