Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedरा.स्व. संघाची रविवारी पश्चिम महाराष्ट्र प्रांत समन्वय बैठक* 

रा.स्व. संघाची रविवारी पश्चिम महाराष्ट्र प्रांत समन्वय बैठक* 

 

 

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताची समन्वय बैठक रविवार, दि. १ सप्टेंबर रोजी होत आहे. स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये दिवसभर होणार्‍या या बैठकीत संलग्न विविध ४७ संस्थांचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील.

अशी प्रांत समन्वय बैठक वार्षिक नियोजनानुसार होत असते.

यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय जनता पक्ष, विज्ञान भारती, संस्कार भारती यासह विविध संघटनांचे प्रांत स्तरावरील पदाधिकारी बैठकीत सहभागी असतील.

या बैठकीत श्री. बाळासाहेब चौधरी, पश्चिम क्षेत्र कार्यवाह उपस्थित असणार आहेत.

*या बैठकीत संघ शताब्दीच्या निमित्ताने चर्चा करण्यात येईल*

***

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments