पुणे,29 ऑगस्ट 2024 : आदर्श युवा प्रतिष्ठान,रामनगर,दासवे तर्फे या परिसरातील 18 गावांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी व दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी लवासा येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे व क्राईस्ट युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता व संचालक डॉ.फादर लिजो थॉमस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यांनी या 18 गावांमधील प्रमुखांशी संवाद साधला.सहयोगात्मक प्रयत्न आणि विद्यार्थ्यांमधील सर्वांगीण विकासाचे महत्त्व यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला.मुळशी येथील एनसीपी युवा शाखेचे प्रमुख सुशील हगवणे त्याचबरोबर मृत्युंजय गोस्वामी आणि क्राईस्ट युनिव्हर्सिटीचे लेफ्टनंट कर्नल स्टॅन्ली जॉन यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला.कार्यक्रमाचे आयोजक मारूती मरगळे यांनी सहभागींचे आभार मानले.


