Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorized“पीसीएमसी स्मार्ट सारथी” प्रकल्पाला केंद्र शासनाचा सिल्व्हर पुरस्कार

“पीसीएमसी स्मार्ट सारथी” प्रकल्पाला केंद्र शासनाचा सिल्व्हर पुरस्कार

मुंबई येथे २७ व्या राष्ट्रीय ई-प्रशासन परिषदेत होणार पुरस्काराचे वितरण

 

पिंपरी, २ सप्टेंबर २०२४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या “पीसीएमसी स्मार्ट सारथी” या प्रकल्पाला केंद्र शासनाचा ‘ई-गव्हर्नन्स स्कीम २०२३-२४’ अंतर्गत डिस्ट्रीक्ट लेव्हल इनिशिएटीव्ह्ज इन ई-गव्हर्नन्स’(ई-प्रशासनामध्ये जिल्हास्तरीय उपक्रम) या श्रेणीमध्ये सिल्व्हर पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई येथे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे मंगळवारी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

 

केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या वतीने हा पुरस्कार दिला जाणार आहे. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय ई-प्रशासन परिषदेमध्ये (एसीईजी) महापालिकेला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

 

महापालिकेच्या वतीने पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या माध्यमातून नागरिकांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेला राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे. महापालिकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments