Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सव मंडपात शासकीय योजनांची प्रसिध्दी*            ...

गणेशोत्सव मंडपात शासकीय योजनांची प्रसिध्दी*             *विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम*

 

 

*ठाणे दि.09(जिमाका) :* शासकीय योजनांची प्रसिध्दी व्हावी, गरजूंना त्यांचा लाभ मिळावा, यासाठी ठाणे येथील विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ यांनी उभारलेल्या गणेशोत्सव मंडपात जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या प्रसिध्दीचे बॅनर लावण्यात आले आहेत. या ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी अनेक भक्त दर्शनासाठी येत असून या प्रसिध्दी बॅनर्सच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती होण्यास मदत होणार आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय बाऱ्हाटे, सचिव भूपेंद्र मिस्त्री, खजिनदार डॉ.विजय पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले.

विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालय आणि महिला आणि बालविकास विभागाने यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच या उपक्रमाचे इतर सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांनीही अनुकरण करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड व जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

0000000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments