*ठाणे दि.13(जिमाका) :* महाराष्ट्र शासनाने राज्यातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयामध्ये व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक, पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या व वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळाला नसल्यास “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी शासनाने यापूर्वी असलेली दि.२० ऑगस्ट २०२४ पर्यंतची मुदत वाढविण्यात आली असून नवीन मुदतवाढ ही उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज दि.३० सप्टेंबर २०२४ पर्यंत तसेच प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत देण्यात आली आहे.
ही योजना इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू आहे. या योजनेमध्ये विद्यार्थ्यास इयत्ता १२ वी मध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत तसेच विद्यार्थी हा वसतीगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, पालकाचे उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे, विद्यार्थ्याचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे, विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा, महाविद्यालयातील विद्यार्थ्याची उपस्थिती किमान ७५ टक्के असावी आदी प्रमुख निकष/पात्रता आहे.
या योजनेकीरता पात्र विद्यार्थ्यांनी परिपूर्ण कागदपत्रांसह त्यांचे ऑफलाईन अर्ज सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ४ था मजला, दत्तवाडी, खारेगाव, कळवा, जि. ठाणे. ४००६०५ येथे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.
00000000000
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार”* *योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ*
RELATED ARTICLES


