ट्रेडिंगचार्ट्स हा चार्टिंग प्लॅटफॉर्म आहे, जो भारतातील ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांसाठी व्हिज्युअल डेटा (फीड्स), माहिती व विश्लेषण (इंडिकेटर्स व स्ट्रॅटेजीज) आणि ट्रेड्सची अंमलबजावणी एकाच ठिकाणी आणतो.
धन आणि रेझ एआयमधील टीमने हा प्लॅटफॉर्म संपूर्णपणे इन-हाऊस तयार केला आहे आणि तो धनच्या मालकीच्या ट्रेडिंग इंजिन डेक्स्टशी आणि रेझचे स्वतःचे एआय को-पायलट फझ एआयशी सखोलपणे जोडलेला आहे.
ट्रेडिंगचार्ट्स पूर्णपणे विनामूल्य आहे, ज्यामध्ये २० हून अधिक चार्ट प्रकार, २०० हून अधिक मोफत इंडिकेटर्स, ८ हून अधिक लेआउट्स, सेकंदांपासून दिवसांपर्यंत सर्व टाइमफ्रेम्स आणि बार रिप्लेसारख्या सुविधांसह अमर्यादित कस्टम इंडिकेटर्स व स्ट्रॅटेजीज उपलब्ध आहेत.
भारतातील बाजारपेठेसाठी विशेषत्वाने डिझाइन केलेला हा प्लॅटफॉर्म एनएसई, बीएसई आणि एमसीएक्सवरून रिअल-टाइम टिक-बाय-टिक डेटा प्रवाहित करतो आणि ऑर्डर फ्लो, कॉर्पोरेट अॅक्शन्स, मार्कर्स व रिअल-टाइम स्कॅन सिग्नल्स थेट चार्टवर उपलब्ध करून देतो.
भारतातील सर्वात वेगाने वाढणारा ट्रेडिंग आणि गुंतवणूक प्लॅटफॉर्म धनची मूळ कंपनी रेझ फायनान्शियल सर्व्हिसेसने आज ट्रेडिंगचार्ट्सच्या लाँचची घोषणा केली. भारतातील ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांसाठी तळागाळापासून (ग्राउंड्स-अप) डिझाइन केलेला हा एआय-आधारित चार्टिंग प्लॅटफॉर्म आहे. ट्रेडिंगचार्ट्सची रचना आणि अभियांत्रिकी संपूर्णपणे इन-हाऊस करण्यात आली आहे आणि तो धनच्या मालकीच्या ट्रेडिंग इंजिन डेक्स्टशी आणि रेझच्या स्वतःच्या एआय पायाभूत सुविधेशी सखोलपणे जोडलेला आहे.
tradingcharts.co वर स्वतंत्र चार्टिंग प्लॅटफॉर्म म्हणून अत्याधुनिक चार्टिंग सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देत भारतातील लाखो ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांना प्रगत बाजारपेठ विश्लेषण आणि ट्रेडिंग साधनांची सुविधा देणे हे ट्रेडिंगचार्ट्सचे उद्दिष्ट आहे. २० हून अधिक चार्ट प्रकार, २०० हून अधिक मोफत इंडिकेटर्स, ८ हून अधिक चार्ट लेआउट्स, सेकंदांपासून दिवसांपर्यंत अनेक टाइमफ्रेम्स आणि ऑर्डर फ्लो, व्हॉल्यूम कॅण्डल्स, व्हॉल्यूम प्रोफाइल, डेप्थ ऑफ मार्केट व बार रिप्ले यांसारखी प्रगत बाजारपेठ विश्लेषण साधने (टूल्स) प्रदान करते. ब्रोकिंग प्लॅटफॉर्मशी जोडलेले असताना ट्रेडिंगचार्ट्स कोणत्याही स्वतंत्र चार्टिंग सबस्क्रिप्शनशिवाय एनएसई, बीएसई आणि एमसीएक्सच्या सक्षम विभागांमधून रिअल-टाइम, टिक-बाय-टिक मार्केट डेटा प्रवाहित करते. हा प्लॅटफॉर्म स्कॅल्पर, पॉवर स्कॅल्पर आणि मार्केट डेप्थ यांसारख्या वैशिष्ट्यांद्वारे ऑप्शन्स ट्रेडर्सना ट्रेड अंमलबजावणीसाठी देखील पाठबळ देतो.
धन ट्रेडिंगचार्ट्स समाविष्ट करणारा पहिला ब्रोकिंग प्लॅटफॉर्म ठरला आहे. रेझचा कालांतराने इतर ब्रोकरेज कंपन्या आणि बाजारपेठेतील सहभागींपर्यंत या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचा मनसुबा आहे. ट्रेडिंगचार्ट्स आता रेझच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर लाईव्ह आणि विनामूल्य उपलब्ध आहे, ज्यामध्ये धन (अॅप आणि वेब), ऑप्शन्स ट्रेडर (अॅप आणि वेब), डेक्स्ट टी३ ट्रेडिंग टर्मिनल, स्कॅनएक्स आणि नुकतेच लाँच झालेले गुंतवणूक अॅप मिलियन्स यांचा समावेश आहे.
“ट्रेडरसाठी सर्व गोष्टींची सुरुवात चार्ट्सपासून होते, जिथे संकल्पना, एन्ट्री, पोझिशन, एक्झिट, संपूर्ण ट्रेडिंग प्रवास चार्ट स्क्रीनवरच घडतो. गेल्या पाच वर्षांत धनने चार्ट्समध्ये अनेक उद्योग-प्रथम वैशिष्ट्ये सादर केली आहेत, ज्यात थेट चार्ट्सवर ट्रेडिंग, ड्रॅग अँड ड्रॉप पोझिशन्स, स्कॅल्पर्स, भारतासाठी विशिष्ट टाइमफ्रेम्स, बार रिप्ले आणि इतर अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे, जी आता उद्योगाची मानक बनली आहेत. असे असले तरी, काही वेळा आम्हाला ट्रेडर्सच्या सूचनांची अंमलबजावणी करणे शक्य होत नव्हते, कारण हे सोल्युशन्स थर्ड-पार्टी लायब्ररींवर आधारित होते आणि त्यावर आमचे नियंत्रण मर्यादित होते,” असे रेझ फायनान्शियल सर्व्हिसेसचे फाउंडर आणि सीईओ प्रविण जाधव म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आम्ही नेहमी आमच्या स्वतःच्या तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या स्टॅकची मालकी राखली आहे आणि आता ट्रेडिंगचार्ट्ससह आमच्याकडे आमचे स्वतःचे चार्टिंग सोल्युशन देखील आहे. भारताकडे आता चार्टिंग प्लॅटफॉर्म आहे, जो येथेच डिझाइन करण्यात आला आहे, भारतीय मार्केट डेटावर आधारित आहे आणि भारतातील ट्रेडर्सच्या गरजांभोवती गुंफला गेला आहे. आम्ही हा प्लॅटफॉर्म विनामूल्य देत आहोत, कारण भारतातील प्रत्येक ट्रेडरला कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता जागतिक दर्जाचे बाजारपेठ विश्लेषण आणि ट्रेडिंग साधने मिळण्याचा अधिकार आहे.”
ट्रेडिंगचार्ट्सने इंडिकेटर मार्केटप्लेस देखील सादर केले आहे, जिथे ट्रेडर्स मोफत इंडिकेटर्स वापरू शकतात आणि अनुभवी ट्रेडर्सनी विकसित केलेल्या प्रीमियम इंडिकेटर्सचे सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. इंडिकेटर क्रिएटर्स या मार्केटप्लेसद्वारे त्यांच्या स्ट्रॅटेजीज आणि इंडिकेटर्समधून कमाई करू शकतात, ज्यामुळे स्वदेशी ट्रेडिंग क्रिएटर्सच्या समुदायाला चालना मिळेल.
ट्रेडिंगचार्ट्स आपल्या मूळ तंत्रज्ञान स्टॅक आणि पायाभूत सुविधांची मालकी राखण्याच्या रेझच्या दृष्टिकोनातील नवीनतम पाऊल आहे. यापूर्वी २०२२ च्या उत्तरार्धात, धनने आपले स्वतःचे मालकीचे ट्रेडिंग इंजिन डेक्स्ट लाँच केले होते, ज्यामुळे स्वतःची ऑर्डर आणि रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम्स असलेला हा भारतातील एकमेव स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म ठरला. धनने आपल्या तंत्रज्ञान स्टॅकवर धनएचक्यू आणि धन क्लाऊड अंतर्गत स्वतःचे एपीआय आणि अल्गोट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स देखील सादर केले, ज्यावर आता २५,००० हून अधिक एपीआय-आधारित ट्रेडर्स आणि अनेक भागीदारांसह २०० हून अधिक तंत्रज्ञान एकत्रीकरण (इंटिग्रेशन्स) आहेत. रेझने त्यानंतर आपले स्वतःचे बॅक ऑफिस आणि डेटा प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म जर्नल, तसेच अर्थम नावाचे स्वतःचे स्मॉल लँग्वेज मॉडेल (एसएलएम) डिझाइन केले आहे, जे धन आणि रेझ परिसंस्थेतील बहुतांश एआय क्षमतांना साह्य करते, यामध्ये विशेषतः भारतातील भांडवली बाजारपेठेसाठी डिझाइन केलेले एआय को-पायलट फझचा समावेश आहे.
“तळागाळापासून चार्टिंग प्लॅटफॉर्म तयार करणे ट्रेडिंग तंत्रज्ञानातील सर्वात कठीण आव्हान आहे. त्याला टिक-बाय-टिक मार्केट डेटा घ्यावा लागतो, तो प्रत्येक स्क्रीनवर सुरळीतपणे दाखवावा लागतो, रिअल-टाइममध्ये त्याचे विश्लेषण करावे लागते आणि ट्रेडर्सना त्यांचे स्वतःचे ट्रेड्स किंवा ट्रेडिंग सेटअप कार्यान्वित करण्याचे स्वातंत्र्य द्यावे लागते. आमच्या टीमने ट्रेडिंगचार्ट्सचा प्रत्येक स्तर इन-हाऊस डिझाइन केला आहे आणि तो आमच्या स्वतःच्या ट्रेड एक्झिक्युशन इंजिन व आमच्या स्वतःच्या एआय पायाभूत सुविधेशी जोडला आहे. म्हणजेच, ट्रेडर्स आम्हाला सांगतात की, काहीतरी कमतरता आहे, तेव्हा आम्ही उत्तम सुविधा डिझाइन करू शकतो आणि काहीतरी अधिक चांगले होऊ शकते, तेव्हा आम्ही कोणत्याही थर्ड-पार्टी अवलंबित्वाशिवाय त्यात सुधारणा करू शकतो,” असे रेझ फायनान्शियल सर्व्हिसेसचे को-फाउंडर आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर अलोक पांडे म्हणाले.
ट्रेडिंगचार्ट्समध्ये अंतर्भूत असलेल्या फझ एआयमुळे ट्रेडर्स एकाच प्रॉम्प्टमध्ये साध्या शब्दांत वर्णन करून इंडिकेटर किंवा स्ट्रॅटेजी तयार करू शकतात. कोणत्याही कोडिंगशिवाय आणि कोणाचीही वाट न पाहता फझ एआय ते तयार करते आणि चार्टवर प्लॉट करते. स्वतःचे लॉजिक लिहायला आवडणारे ट्रेडर्स स्वतःच्या एन्ट्री आणि एक्झिट नियमांसह कस्टम इंडिकेटर्स आणि स्ट्रॅटेजीज कोड करण्यासाठी, स्क्रिप्ट तपासण्यासाठी आणि एका क्लिकवर चार्टवर जोडण्यासाठी चार्टस्क्रिप्ट एडिटर वापरू शकतात. ट्रेडर्स विनामूल्य अमर्यादित इंडिकेटर्स आणि स्ट्रॅटेजीज तयार करू शकतात, तसेच त्यांचे विद्यमान कस्टम इंडिकेटर्स इम्पोर्ट देखील करू शकतात. ट्रेडिंगचार्ट्सवर ५०,००० हून अधिक कस्टम इंडिकेटर्स आधीच लाईव्ह आहेत.
भारतातील ट्रेडर्स ज्या प्रकारे बाजारपेठेचा अभ्यास करतात त्यानुसार ट्रेडिंगचार्ट्स डिझाइन करण्यात आले आहे. चार्टवरील की मार्कर्स ट्रेडरचे मागील ट्रेड्स, बातम्या आणि घडामोडी, कॉर्पोरेट अॅक्शन्स, सर्किट लिमिट्स, ओपन हाय लो क्लोज मार्क्स आणि सपोर्ट व रेझिस्टन्स पातळी दर्शवतात. कॉर्पोरेट अॅक्शन्ससाठी चार्ट्स आपोआप समायोजित केले जातात आणि लाभांश, स्प्लिट्स, बोनस शेअर्स आणि कमाईचे आकडे एक्स-डेट, रेकॉर्ड डेट आणि रक्कम दर्शवणारे मार्कर्स म्हणून दिसतात. एकात्मिक सुपरस्कॅन्स चार्टवर चालतात आणि किंमत व व्हॉल्यूम सिग्नल्स, कॅण्डलस्टिक सिग्नल्स आणि एफअँडओ सिग्नल्ससह विविध समभागांवर रिअल-टाइम सिग्नल्स देतात.
ट्रेडिंगचार्ट्ससह, रेझ भारतात बाजारपेठेचे मूळ तंत्रज्ञान निर्माण करणे सुरूच ठेवत आहे, तसेच भारतातील ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांना भारतात, भारतासाठी डिझाइन केलेला जागतिक दर्जाचा चार्टिंग अनुभव प्रदान करत आहे.


